26/10/2024
शनिवार दि. २६ ऑक्टोबर २०२४ रोजी आरुणि विद्यामंदिर व नवीन मराठी शाळा,वाई. यांच्या संयुक्त विद्यमाने दीपोत्सव सोहळा आनंदात व उत्साहात संपन्न झाला. याचे औचित्य साधून शिक्षण विवेकच्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
पणत्यांचा उजेड आभाळाशी आणि एक ज्योत मनाशी. या कार्यक्रमाठी शालासमिती सदस्या मा. सौ. अंजली काणे कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून उपस्थित होत्या. सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्याध्यक्षा मा. सौ. मुग्धा वैद्य, आजन्मसेविका मा. सौ. विद्या राव , शालासमिती सदस्य मा. श्री . अविनाश जोशी आरुणि विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका मा. सौ.मेघा सातपुते , नवीन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. राजश्री शिंदे तसेच पालक प्रतिनिधी उपस्थित होते.
मा. मुख्याध्यापिका सौ. राजश्री शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. मा. मुख्याध्यापिका सौ. मेघा सातपुते यांनी सर्व विद्यार्थ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या मा. अध्यक्षा सौ. अंजली काणे यांनी मार्गदर्शनपर संदेश दिला.