07/12/2023
🏆🏆🏆 *स्वच्छतेबाबत आयोजित नमो करंडक स्पर्धेमध्ये रुणवाल सीगल सोसायटीला द्वितीय क्रमांक मिळालेला आहे.* 🏆🏆🏆
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत हडपसर भागातील अनेक सोसायटीचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये स्वच्छता, नागरिकांचा सहभाग, ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण, आणि इतर सर्व स्वच्छतेच्या निकषांवर आपल्या सोसायटीने अप्रतिम काम केले. 👌🏻👌🏻
हाउसकीपिंग पोर्टफोलिओवर विशेष काम केल्याबद्दल *श्री सूर्यकांत कुवळेकर, श्री लक्ष्मीकांत साबणे व श्री वरूण धुमे, व चेअरमन श्री राजविक्रम जाधव, खजिनदार श्री खटके काका* यांचे विशेष आभार. 🙏🏻🙏🏻
हाउसकीपिंग बद्दल मोठ्या सुधारण्या करण्यात जबाबदारी स्वीकारल्याबद्दल *श्री आशिष सुते, व सर्व हाउसकीपिंग टीमचे* विशेष अभिनंदन. 👏🏻👏🏻
कचऱ्याचे वर्गीकरण आणि नियमावली पाडल्याबद्दल सर्व रहिवाशांचे मनःपूर्वक आभार. हे पारितोषिक कोणा एका टीम अथवा एजन्सीचे नसून सोसायटीच्या हिताचे काम करणाऱ्या प्रत्येक संचालक सदस्य, हाउसकीपिंग स्टाफ व सर्व रहिवाशांचे एकत्रित आहे 🙏🏻🙏🏻
आपली,
टीम सीगल परिवार