गौमाता सेवा ट्रस्ट

  • Home
  • India
  • Pune
  • गौमाता सेवा ट्रस्ट

गौमाता सेवा ट्रस्ट Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from गौमाता सेवा ट्रस्ट, Real Estate, Gomata Seva Trust Regt. No. E-0009947(PUN)Office No. 201 2nd Floor, Mango Next Commercial Complex, Opposite Sell Petrol Pump, Pune.

08/08/2026

गोमाता सेवा ट्रस्टच्या वतीने
गोमातेची सेवा करताना मिळणारा आनंद शब्दांत सांगता येत नाही.

त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहिलं की वाटतं,
हीच खरी सेवा… आणि हाच आमचा विश्वास.

#गोसेवा #कामधेनु #हिंदुधर्म

वारी ही फक्त पायांची नसते, ती मनाची, श्रद्धेची आणि भक्तीची असते...विठ्ठल नामाच्या गजरात प्रत्येक भक्ताला सुख, शांती आणि ...
24/07/2026

वारी ही फक्त पायांची नसते, ती मनाची, श्रद्धेची आणि भक्तीची असते...
विठ्ठल नामाच्या गजरात प्रत्येक भक्ताला सुख, शांती आणि समाधान लाभो.
आषाढी एकादशीच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा!

04/06/2026

आजच्या काळात गोमातेची सेवा म्हणजे फक्त धर्म नाही,
तर आपल्या संस्कृतीचा आणि मानवतेचा सन्मान आहे… 🐄❤️
गोमाता आपल्या आयुष्याला समृद्धी, संस्कार आणि श्रद्धेची दिशा देते.
चला, गोमातेच्या रक्षणासाठी आणि सेवेसाठी कायम एकत्र उभे राहूया! 🚩✨

CowCare जयगोमाता गोभक्त भारतीयसंस्कृती goamatasevatrust

02/06/2026

काही व्यक्तींचा वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसतो...

तो असतो सेवाभाव, माणुसकी आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा उत्सव!

अनाथ बालकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे, वृद्धांच्या आयुष्यात आपुलकीची ऊब निर्माण करणे, गरजूंना मदतीचा हात देणे आणि गौमातांच्या सेवेत स्वतःला समर्पित करणे... हीच खरी जीवनयात्रा.

गौमाता सेवा ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष मा. नितीनभाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

काही माणसं पदामुळे मोठी होतात...
तर काही माणसं आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात कायमची जागा निर्माण करतात.

मा. नितीनभाऊ पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपले सेवाकार्य असेच निरंतर सुरू राहो, हीच सदिच्छा.
#गोसेवा

नम्र विनंती... एकदा नक्की वाचा! वाढदिवस तर प्रत्येकाचा येतो...पण एखाद्याच्या वाढदिवसानिमित्त अनाथ बालकांच्या चेहऱ्यावर ह...
02/06/2026

नम्र विनंती... एकदा नक्की वाचा!

वाढदिवस तर प्रत्येकाचा येतो...
पण एखाद्याच्या वाढदिवसानिमित्त अनाथ बालकांच्या चेहऱ्यावर हसू फुलत असेल, वृद्धांच्या अंगावर ऊबदार ब्लँकेट पडत असेल, अंध माता-भगिनींच्या हातात फळांचा आधार मिळत असेल आणि मुक्या गौमातांच्या पोटासाठी चाऱ्याची व्यवस्था होत असेल...

तर तो केवळ वाढदिवस राहत नाही, तो माणुसकीचा उत्सव बनतो...!

गौमाता सेवा ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष मा. नितीनभाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणारे हे सेवा उपक्रम म्हणजे समाजासाठी जगणाऱ्या एका व्यक्तिमत्त्वाला दिलेली खरी मानवंदना आहे.

आजच्या काळात केक कापून वाढदिवस साजरे करणारे अनेक जण भेटतील, पण दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण निर्माण करून वाढदिवस साजरा करण्याची भावना फार थोड्यांकडे असते.

चला... या सेवायज्ञाला सलाम करूया...

आपण सर्वांनी हे पोस्टर आपल्या स्टेटसला ठेवून, सोशल मीडियावर शेअर करून आणि आपल्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचवून या सेवाभावी उपक्रमाला साथ द्यावी, ही नम्र विनंती.

कारण काही व्यक्तींचा वाढदिवस साजरा होत नाही... तर त्यांच्या कार्याला समाजाचा सलाम मिळत असतो!

SocialService

सर्व मित्रपरिवार, हितचिंतक आणि गौमाता सेवा ट्रस्टच्या कार्यकर्त्यांना नम्र विनंती...गौमाता सेवा ट्रस्टचे* संस्थापक-अध्यक...
02/06/2026

सर्व मित्रपरिवार, हितचिंतक आणि गौमाता सेवा ट्रस्टच्या कार्यकर्त्यांना नम्र विनंती...

गौमाता सेवा ट्रस्टचे* संस्थापक-अध्यक्ष मा. नितीनभाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनाथ बालके, वृद्ध माता-पिता आणि गौमातांच्या सेवेसाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांमधून समाजाप्रती असलेली त्यांची निस्वार्थ बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.
या सेवाभावी कार्याला सलाम म्हणून आपण सर्वांनी हा संदेश, पोस्टर व स्टेटस आपल्या सोशल मीडिया माध्यमांवर शेअर करून नितीनभाऊंना शुभेच्छा द्याव्यात व त्यांच्या आनंदात सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.
सेवेला मान, समाजहिताला सलाम!

26/05/2026

गोमाता ही आपल्या संस्कृतीची ओळख, श्रद्धेचा आधार आणि सनातन धर्माची शान आहे… 🐄🚩
जिथे गोसेवा केली जाते, तिथे समृद्धी, शांतता आणि सकारात्मकता कायम नांदते.
गोमातेचं रक्षण आणि सेवा हीच खरी भारतीय संस्कृतीची परंपरा आहे! ❤️✨

IndianCulture जयगोमाता गोसेवा सनातन

गौमाता ही केवळ श्रद्धेचा विषय नाही, तर आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे… आज गौसंमान दिवस निमित्त, गौमाता सेवा ट्रस्ट चे अध्यक...
28/04/2026

गौमाता ही केवळ श्रद्धेचा विषय नाही, तर आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे…

आज गौसंमान दिवस निमित्त, गौमाता सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष नितीन पवार व सर्व विश्वस्त पदाधिकाऱ्यांच्या वतीने,
गौमातेला “राष्ट्रमाता” दर्जा मिळावा या मागणीसाठी,
पुणे जिल्हाधिकारी मा. श्री. जितेंद्र दुडी साहेब यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.
ही केवळ एक मागणी नाही…

👉 ही आहे आपल्या परंपरेचा सन्मान

👉 ही आहे संस्कृती जपण्याची जबाबदारी

👉 आणि ही आहे भावी पिढ्यांसाठी एक ठाम भूमिका
गौमाता ही आपल्या शेती, आरोग्य, अर्थव्यवस्था आणि धार्मिक जीवनाचा आधारस्तंभ आहे.

तिच्या संरक्षणासाठी आणि सन्मानासाठी आज उचललेलं हे पाऊल, उद्या एक मोठं जनआंदोलन ठरेल, यावर आमचा ठाम विश्वास आहे.
जय गौमाता 🚩 | जय हिंद 🇮🇳

IndianCulture Rashtramata SaveCow VertixMedia

Address

Gomata Seva Trust Regt. No. E-0009947(PUN)Office No. 201 2nd Floor, Mango Next Commercial Complex, Opposite Sell Petrol Pump
Pune
411041

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when गौमाता सेवा ट्रस्ट posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category