04/07/2022
🌽😋
Sunday Mood 😋
#चटपटीत crispy Corn 🌽 पॅटीस 😋
मस्त ढगाळ वातावरण.. रिमझिम पावसाच्या धारा 🌤️🌧️
त्यात आषाढ महिना म्हणजे शास्त्र आले तळणे 😋
ह्या season मध्ये छान टपोरी मक्याची कणसे 🌽🌽
येतात Market ला.. बघुन खुप. Receipy मनात येतं राहतात 😂
मग काय विचारता..😋😋
नेकी और पूछ पूछ 😍
लागा तयारीला 🌽
चटपटीत corn 🌽 पॅटीस from Nandini's kitchen 😋
साहित्य:
2 मक्याची कणसे, 2 बटाटे उकडून, 10- 12 Bread Slices 🍞, 7- 8 हिरव्या मिरच्या, 7- 8 लसूण पाकळ्या, 1 इंचं आले, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद पावडर, हिंग, अर्धी वाटी कोथिंबीर, 2 वाट्या बेसन पीठ, अर्धा चमचा ओवा, चवीपुरते मीठ
कृती:
प्रथम मक्याचे दाणे, मिरच्या, लसूण पाकळ्या, आले, थोडी कोथिंबीर मिक्सरमधून जाडसर भरड वाटून घ्यावे. आता त्यात 2 उकडलेले बटाटे कुस्करून घ्यावेत, ह्या मिश्रणात हिंग, गरम मसाला, अर्धा चमचा हळद पावडर आणि चवीपुरते मीठ घालुन मिश्रण तयार करुन घ्यावे.
Bread चे मधुन 2 त्रिकोणी slice करावेत. आता हे तयार मिश्रण bread ला लावून ठेवा आणि दुसरा slice ठेवून तो pack करून घ्या. असे सगळे slice मिश्रण लावुन ठेवून द्या.
एका बाऊल मध्ये 2 वाट्या बेसन, त्यात अर्धा चमचा हळद पावडर, ओवा ( हाताने चुरून), थोडी कोथिंबीर आणि किंचित मीठ टाकून हे Batter तयार करुन घ्या.
एका पसरट कढई मध्ये तेल घालून सगळे पॅटीस तयार बेसन Batter मध्ये घोळवून तेलात deep fry करून घ्या 👍
झाले तयार चटपटीत Sweet corn 🌽 पॅटीस खायला तयार 😋
©® सौ. नंदिनी नाखवा, अलिबाग
खोबऱ्याची चटणी अथवा टोमॅटो सॉस बरोबर serve करा 🍕🍕😋