17/12/2024
*मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रमातील निराधारांन करीता*
*दर्जेदार भोजन, निवास व इतर अत्यावश्यक सेवा*
ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली द्वारा संचालित मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम,भोकर येथे निराधार बेघर घरातून काढून दिलेले ज्यांना मुल मुली व इतर नातेवाईक असून सुद्धा त्यांना सांभाळू शकत नाही असे आजी आजोबा,यांना सर्व सुविधा देऊन मोफत संगोपन होत आहे. येथे असलेल्या निराधार वृद्धाना चांगल्या प्रकारचे भोजन, उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावे, मानवाच्या आयुष्याचा शेवटचा दिवस म्हणजे वृद्धपकाळ हा सुखद व आनंदमई जावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे यासाठी तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात विविध सामाजिक उपक्रम व बहुजन महापुरुष यांची जयंती व पुण्यतिथी साजरा करीत असतो. तसेच त्यांना इतर साधनांची उपलब्धता करुन देण्याची आवश्यकता आहे.
उदा. वेळोवेळी उच्च दर्जा चे भोजन उच्च शिक्षीत डॉक्टर यांचेकडून तपासणी, आवश्यकतेनुसार वृद्धाश्रमातील वृद्धाना मनमोकळे राहण्यासाठी सुसज्ज हाॅल तयार करणे, वैद्यकीय सेवे करिता ऍम्ब्युलन्स व्हॅन उपलब्ध करणे, सुदृढ आरोग्यासाठी नियमित ओषधी ठेवणे, अधुरे राहिलेले संडास बाथरूम चे काम पूर्ण करणे, टिन शेड चे अपूर्ण काम पूर्ण करणे, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय विषयाची ग्रंथसंपदा ग्रंथालयात उपलब्ध करून देणे, आरोग्य संवर्धनासाठी इत्यादी अनेक उद्देश पूर्तता करण्यासाठी अर्थ बळ आवश्यक आहे. बुद्ध फुले शाहू आंबेडकरी समाज स्वाभिमानी व पुरोगामी आहे. हा समाज पर प्रकाशित नाही. करीता याच आपल्या समाजाने निराधार बेघर वृद्धाच्या दर्जेदार सेवेसाठी या समाज उपयोगी मानवसेवा प्रकल्प मध्ये अर्थ दान हेच धम्म दान समजून भरभरून सातत्याने योगदान द्यावे असे विनम्रपणे आवाहन करीत आहोत.
👆फोन पे गुगल पे
8855850378, 9689331853
*विनित*
👆ऋणानुबंध समाज विकास संस्था, चिखली जिल्हा बुलडाणा द्वारा संचालित मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम, भोकर ता चिखली जिल्हा बुलडाणा