Sangeeta's Talk Fact

Sangeeta's Talk Fact A blog helping women to empower themselves and love who they are...

https://youtu.be/Q9wk602Aqsg?si=mnfZE8RS0CO8tRf-
20/06/2025

https://youtu.be/Q9wk602Aqsg?si=mnfZE8RS0CO8tRf-

आज सर्वत्र 'आंतरराष्ट्रीय योग दिन' उत्साहात साजरा केला जात आहे . योगासनाचं महत्व लोकांना पटवून देण्यासाठी आणि योग....

https://youtu.be/06xnUF60Z6o?si=xTwXMzje3m3EWkuI  #कुतूहल कोपरा  # कलात्मकतेतून पर्यावरण संवर्धन महाबळेश्वर हे फिरण्याच ...
10/06/2025

https://youtu.be/06xnUF60Z6o?si=xTwXMzje3m3EWkuI
#कुतूहल कोपरा # कलात्मकतेतून पर्यावरण संवर्धन
महाबळेश्वर हे फिरण्याच आवडत ठिकाण.. येथील गारवा, निसर्ग, धुकं, ढग, घाट रस्ते त्यांचाच एक वेगळा थाट असतो... याचं ओढीने प्रत्येक वर्षी सुट्टीला इथे जाण्याचा मला मोह आवरता येत नाही..
पण याच आवडत्या ठिकाणी एक कोपरा असाही कुतूहल जागवणारा अचंबित करणारा आजपर्यंत कसा नजरेतून सुटतं होता माहीत नाही.. आज तो कुतूहल कोपरा अगदी योगायोगाने भेटलाच...
महाबळेश्वर मार्केट मधील pure element या कॉस्मेटिक शॉपी च्या उजव्या बाजूचा आत जाणारा रस्ता टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंना संजीवन देणाऱ्या व जुन्या अडगळीत टाकलेल्या वस्तूंना बोलतं करणाऱ्या सौ पद्मा रांदड या छंद वेड्या व्यक्तीशी भेट झाली.. वासंती वाटिका अतिशय अप्रतिम कलाकृती येथे पाहायला मिळते.. कला छंद आणि निसर्ग याचा सुरेख संगम पाहायला मिळेल.. स्टोव्ह, सिलेंडर, शेगडी, पाईप, प्लॅस्टिक बॉटल, दुधाचे माप, किटली, तवा, पातेली, नारळाच्या करवंटी, कडी, टायर, बेसिन, अशा अनेक खराब झालेल्या अडगळीत पडलेल्या वस्तूंना कल्पना करू शकणार नाही इतकं सुंदर स्वरूप त्या अफाट कल्पनाशक्तीने देतात.. हा छंद आणि या कलाकृती मध्ये निसर्ग जतन करणे.. ही त्यांची आवड.. चक्क जिन च्या पँट ची झोळी शिवून त्यातही झाडे लावलेली दिसतात.. चीनिगुलाब, मनि प्लांट, आयुर्वेदिक वनस्पती, घरी लागणारे कांदा लसूण, कडीपत्ता आल्लं, कोथिंबीर असा खजिना ही पाहायला मिळतो..
जुन्या वस्तू पुढील पिढीला ही पाहायला मिळावी म्हणून ती अशी छान पद्धतीने जतन करून ठेवणं ही त्यांची तळमळ खरोखरच कौतुकास्पद..
एक न एक वस्तू नजरेतून सुटू नयेत असं वाटणं.. खरोखरच कुतूहल जागवणारा असा तो कुतूहल कोपरा आज खूप काही प्रेरणा देणारा होता.. सौ पद्मा रांदड यांना भेटून हा छंद जीवाला लावी पिसे याचीच प्रचिती आली.. त्यांच्या छंदवेड या पुस्तकाची अनोखी भेट मला मिळाली.. जाताना दारावर खडूने लिहलेल "आपण आलात आनंद झाला" या वाक्याने चेहऱ्यावर नक्कीच प्रेमळ हास्य उमलत.. एखाद्याच अचानक येणं ही इतकं आनंददायी असतं हा प्रेमळ संदेश तिथे होता.. सौ पद्मा रांदड यातर अगदी खूप जवळची मैत्रीण असल्यासारखं काही क्षणातच आमच्या झाल्या.. त्यांचं वागणं बोलणं आणि त्यांचा पाठीवरचा प्रेमळ हात मी कधीच विसरू शकणार नाही.. यातूनच आमची एक अनोखी मैत्री झाली .. पुढे पुण्यात त्यांच्या राहत्या घरी भेटीस गेले असतं आणखी एक काळविष्कार पाहायला मिळाला. त्यांचे कलात्मकतेतून पर्यावरण जतन करण्याचा अट्टहास अतिशय सुंदर मनाला भावणाऱ होते . अशा मोठी दुरदृष्टी असलेल्या पद्मा रांदंड यांची पर्यावरण दिनानिमित घेतलेली छोटी मुलाखत ..
✍️ संगीता.....©️

#कुतूहल कोपरा # कलात्मकतेतून पर्यावरण संवर्धन महाबळेश्वर हे फिरण्याच आवडत ठिकाण.. येथील गारवा, निसर्ग, धुकं, ढग, घाट...

17/10/2024

समाजासाठी झटणारी दुर्गा - सामाजिक कार्यकर्त्या वृषाली आफळे यांची खास मुलाखत....
सामाजिक कार्यकर्त्या वृषाली आफळे या विश्वस्त राजारामबापू ज्ञान प्रबोधिनी , माजी अध्यक्ष महिला मंडळ इस्लामपूर, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद इस्लामपूर, अध्यक्ष राजारांबापू वाचनालय साखराळे अशा विविध स्तरावर कार्यरत असलेल्या आणि समाजासाठी झटणाऱ्या दुर्गा आहेत .
https://youtu.be/SdksnlM6dhw?si=DWvEO5HFYWbdCgq0

15/10/2024

दिव्यांग मुलांच्या सुरक्षा आणि प्राधान्य याविषयीं वाटेगाव येथील तहसीन तांबोळी यांच्याशी केलेली बातचीत Sangeeta's TalkFact मध्यें पहा.. आवडले तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका🙏🙏

https://youtu.be/RlAYTHWLi0M?si=wjYDu4BUTLk4U72V

11/06/2023

Sangeeta's TalkFact - Bhagyashri Nerlekar - Islampur महिला उद्योजिका - सौ भाग्यश्री नेर्लेकर, इस्लामपूर यांनी एका वेगळ्या विचारातून व्यवसाय सुरू केला. आजच्या धावत्या युगात कौटुंबिक , सामाजिक आणि आर्थिक जबाबदारी संभाळत असलेल्या महिलांसाठी साजस फूड द्वारे तीच काम सहज करण्याचा प्रयत्न त्यांनी केंला आहे. दैनदीन स्वयंपाक घरातील तिची धावपळ कमी व्हावी आणि एक मिनिटांत कामे सोपी व्हावी या दृष्टीने केलेल्या प्रयत्न कौतुकास्पद आहे. त्यांच्याशी अनेक गोष्टी जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमात सौ भागयश्री नर्लेकर , सांजस फूड , इस्लामपूर
साजस फूड प्रॉडक्ट खरेदीसाठी संपर्क क्रमांक 8600074964
https://youtu.be/BWxQ2Zecijs

, ,

15/05/2023

Sangeeta's Talk Fact
मोठी दूरदृष्टी असलेल्या महिलांची छोटी मुलाखत
महिलांची मुलाखत - सौ. कमल पाटील
चौगुले टूर्स अँड ट्रॅव्हल्स इस्लामपूर

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्यानिमित्ताने मोठी दूरदृष्टी असलेल्या महिलांची छोटी मुलाखत हे प्रेरणादायी सदर Sangeeta's Talk Fact या नावे यूट्यूबच्या माध्यमातून मी सुरू केले आहे.
तुम्हाआम्हा सर्वांच्या वाचनात नेहमी येते की दूरदृष्टी असलेल्या महिला कुटुंबाला आणि राष्ट्राला सक्षम बनवितात आणि अशा कार्यक्षम महिला कोण आहेत ? त्यांचे विचार या टॉक फॅक्ट मधून जाणून घेण्यासाठी स्वराज्य फाउंडेशन या आमच्या सामाजिक संस्थेच्या अंतर्गत हा उपक्रम घेत आहोत.

आजच्या पाहुण्यां इस्लामपूर येथील चौगुले टुर्स अँड ट्रॅवल कंपनीच्या चालक सौ. कमल पाटील यांना निमंत्रित केले होते. त्यांनी मुलाखती द्वारे आपल्याशी हितगुज साधले आहे. त्यांच्या आयुष्यातील घडामोडी आणि समाजामध्ये स्थान निर्माण करीत असताना घेतलेले परिश्रम आपणास ऐकताना जरूर प्रेरणा मिळेल.


For Valuable Comments & Likes
YouTube Channel
https://youtu.be/-AY1di7IXio

04/04/2023

भगवान महावीर जन्म कल्याणक २०२3 - Sangeeta's Talk Fact Episode - 2

भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक निमित्त जैन संस्कार वाटिका संस्थापिका सौ. जयंती दिनेश पोरवाल आणि विनययश महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. जयश्री रमण शहा यांचा Sangeeta's Talk-Fact भाग - 2 मध्ये संवाद ...
चैत्र शुद्ध त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते. महावीरांची प्रवृत्ती लहानपणापासूनच चिंतनशील व वैराग्यशील होती. महावीरांनी वयाच्या तिसाव्या वर्षी गृहत्याग केला. पाहूया त्यांच्या विचारधारेवर आधारित सविस्तर माहिती.

https://youtu.be/F3o-zWEeELg

13/03/2023

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्यानिमित्ताने मोठी दूरदृष्टी असलेल्या महिलांची छोटी मुलाखत हे प्रेरणादायी सदर Sangeeta's Talk Fact म्हणून यूट्यूबच्या माध्यमातून मी सुरू करीत आहे.
तुम्हाआम्हा सर्वांच्या वाचनात नेहमी येते की दूरदृष्टी असलेल्या महिला कुटुंबाला आणि राष्ट्राला सक्षम बनवितात आणि अशा कार्यक्षम महिला कोण आहेत ? त्यांचे विचार या टॉक फॅक्ट मधून जाणून घेण्यासाठी आमच्या स्वराज्य फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या अंतर्गत हा उपक्रम सुरू केला आहे. आजच्या पाहुण्यां इस्लामपूर मधून राखी अंकुश शहा यांना निमंत्रित केले होते. त्यांनी मुलाखती द्वारे आपल्याशी हितगुज साधले आहे.
https://youtu.be/3CduVL7U-rU

Address

Islampur
415409

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sangeeta's Talk Fact posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category