23/04/2026
चारठाण्याला मिळणार अप्पर तहसील कार्यालय.
शिष्टमंडळाने पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर यांच्या नेतृत्वात महसूल मंत्री बावनकुळे साहेबांची घेतली भेट.
दि.22 एप्रिल 2026 बुधवार रोजी चारठाणा येथे अप्पर तहसील ची मंजुरी मिळविण्यासाठी चारठाणा येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली नानासाहेब राऊत यांच्या सोबत मंत्रालय मुंबई येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची भेट घेतली व चारठाणा येथे अप्पर तहसील ची मंजुरी देण्याची विनंती केली.
भेटी दरम्यान शिष्टमंडळाने महसुल मंत्री बावनकुळे साहेबांना चारठाणा महसूल मंडळाचे महत्वपूर्ण सामाजिक, भौगोलिक व निजामकालीन जुने परगणा असलेले महसुली दस्तावेज सादर केलेत. पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांनी आग्रही भूमिका घेत चारठाण्याचे भौगोलिक क्षेत्राचे महत्व महसूल मंत्र्यांच्या निदर्शनास आणुन दिले.
यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा केली व जिल्हाधिकारी परभणी व महसूल अप्पर सचिव श्री. विकास खारगे यांना परिपूर्ण प्रस्ताव स्वीकारून उचित कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत व चारठाणा येथे लवकरच अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्याचे स्पष्ट संकेत दिले.
यावेळी चारठाणा येथील शिष्टमंडळात भाजपा नेते नानासाहेब राऊत, पंचायत समिती सदस्य तहेसीन देशमुख, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष मतीन तांबोळी, दिपक भाग्यवंत, संदीप देशमुख, साबेर पठाण यांची उपस्थिती होती.
Nanasaheb Raut