01/10/2025
नमस्कार मंडळी, कसे आहात.. आशा करतो आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण गणेशोत्सव आणि नवरात्री चा जो उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला त्यात सर्वांनी मौजमज्जा केली असावी... या दोन्हीं उत्सवात ज्या काही स्पर्धा पार पाडण्यात आल्या त्या स्पर्धांचा निर्णय लावण्याची वेळ आली आहे आणि आम्हाला माहिती आहे की आपण सर्वजण पण ह्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असाल.
सर्वांना कळवण्यात आनंद होतो आहे की उद्या सायंकाळी आपण बक्षीस समारंभ साजरा करणार आहोत. तरी ज्या कोणी स्पर्धकाने वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता त्यांना विनंति आहे की उद्या सायंकाळी ठीक ८:०० वाजता मंडपात उपस्थित राहावे.
सांस्कृतिक कला क्रीडा मित्र मंडळ रौनक सिटी सेक्टर ३.