महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कल्याण - प.

  • Home
  • India
  • Kalyan
  • महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कल्याण - प.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कल्याण - प. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कल्याण - प., Property management company, Birla College Road, Kalyan, Opp Birla College, Kalyan.

सर्व विद्यार्थी/विद्यार्थींनी/पालक,सस्नेह नमस्कार,  आपला बारावीचा निकाल आत्ताच जाहीर झाला .अनेकांना अपेक्षित यश मिळालं अ...
09/06/2016

सर्व विद्यार्थी/विद्यार्थींनी/पालक,

सस्नेह नमस्कार,

आपला बारावीचा निकाल आत्ताच जाहीर झाला .अनेकांना अपेक्षित यश मिळालं असेल तर काहींना थोडं कमी. परंतु यश अपयश हे येत असलं तरी ठाम निर्णय घेऊन पुढे जाण सर्वात महत्वाचं ..

बारावी नंतर काय? याबद्दल मागील वर्ष भरात आम्ही अनेक सेमिनार घेऊन आपल्या ग्रामीण व शहरी भागात प्रचंड जनजागृती केली.तमाम पालक, शिक्षक, मुख्याध्यापक ,संचालक यांचे यासाठी अतिशय चांगले सहकार्य आम्हाला मिळाले..त्याचीच प्रचिती आम्हास ऍडमिशन साठी येणाऱ्या पालक वर्गाकडून येत आहे.. प्रत्तेक शाळा /कॉलेज मधे जाऊन केलेली तंत्रशिक्षणाची जागृतीच हे यश म्हणावं लागेल..

परंतु फक्त जनजागृती करून न थांबता मागील एक वर्षात विद्यार्थी हिताचे अनेक निर्णय घेत आरमाईट व्यवस्थापनाने अनेक महत्वकांक्षी निर्णय घेत मुलांचे शैक्षणिक कारकीर्द अधिकाअधिक कशी बहरेल या कडे देखील प्रचंड प्रमाणात लक्ष दिले.. यासाठीच दर्जेदार शिक्षक वर्ग, प्रत्तेक विषयासाठी उच्च दर्जाच्या नोट्स,१०० % प्रॅक्टिकल ,प्रत्तेक क्लास रूम मधे डिजिटल स्मार्ट बोर्ड,जवळ जवळ 35000 पुस्तकं असलेले वाचनालय, इ जर्नल, नियमित प्रश्नसंच, गेट एक्साम तयारीसाठी खास मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षांचे शिबीर अशा अनेक गोष्टी यशस्वी पणे राबविल्या..

या शैक्षणिक कारकीर्दी सोबत इतर कलागुणांना वाव मिळावा याकरिता देखील विशेष प्रयत्न केले गेले. या मधे सर्वात यशस्वी म्हणजे "आरमाईट कबड्डी लीग "व "आरमाईट क्रिकेट लीग".
कबड्डी मधे ६० संघ व क्रिकेट मधे ५० संघ यात सहभागी झाले.प्रो कबड्डी लीगच्या व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या उपस्थितीत हे सामने अतिशय उत्सहात पार पडले.आकर्षक बक्षिसांचा वर्षाव यामध्ये करून विद्यार्थ्याच मनोबल वाढविले.

शिक्षण ,खेळ या बरोबर अभियांत्रिकी महाविद्यालयात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे टेक्निकल डे "याच देखील शानदार आयोजन केल्याने ७० महाविद्यालये यात सहभागी झाली .जवळ जवळ २३ वेगवेगळे टेक्निकल इव्हेंट यात घेतले गेले.
ठाणे ग्रामीण मधे प्रथमच एवढा प्रचंड प्रतिसाद लाभलेला इव्हेंट आयोजित केला गेला.त्यामुळं विद्यार्थी मित्रांच्या आतील सुप्त तांत्रिक गुणांना वाव तर मिळालाच पण शिक्षणाची गोडी अजून वाढली.

आरमाईट व्यवस्थापन शिक्षणासोबत संस्कार देण्यात देखील त्याच जिकिरीचे प्रयत्न करते ..आई वडिलांचा सन्मान हाच सर्वोच्च सन्मान असतो हे विद्यार्थी मित्रांच्या मनात ठासून बिंबल गेलं पाहिजे याच उद्देशाने मागील अनेक वर्ष दरवर्षी आरमाईट व्यवस्थापन "मदर्स डे " च आयोजन करून वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळींना त्यांच्या आई सोबत निमंत्रित करून सत्कार करत असते .या मधे देखील सिनेसृष्टीतील गणेश आचार्य,शक्ती सिंग,श्री जगदीश पाटील, मृत्युंजय झा तसेच आय पी एस श्री विश्वास नांगरे पाटील,तर उद्योग जगतातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.

यासोबत मुलांच्या आयुष्यात कॉलेज जगतात थोडी मजा देखील करता यावी म्हणून आरमाईट उत्सव,आरमाईट स्पोर्ट्स,आरमाईट फूड फेस्टिवल,आरमाईट सेल्फी फेस्टिवल, यु ट्यूब फेस्टिवल,पास आऊट विद्यार्थी मित्रांचा निरोप समारंभ, जास्तीत जास्त कंपनी मधे भेट, पदवी प्रदान समारंभ,राज्य/देश/ व विदेशात देखील सहल याच देखील यशस्वी आयोजन करण्यात आलं..

विशेष म्हणजे सर्वधर्म ऐक्याच प्रतीक "राजा शिवछत्रपतींच्या" जयंतीदिनी माहुली गड ते आरमाईट अशी प्रचंड मोठी बाईक रॅली विद्यार्थ्यांमित्रांनी काढून शहापुर वासीयांची मन जिंकली..

मोनस्टर सोबत करार करत जवळ जवळ १५० हुन अधिक कंपनीना प्लेसमेंट साठी देखील आमंत्रित केल्याने विद्यार्थी मित्रांचा हुरूप वाढला तर अनेकांना चांगली नोकरी देखील मिळाली.

मुलांना येण्या-जाण्याकरिता कोणतीही अडचण नसावी या करीता देखील व्यवस्थापनाने आसनगाव, भिवंडी, मुरबाड, ठाणे, येथून बसेस ची उत्तम सोय केली आहे..

*विद्यार्थी मित्रांनी स्वतः अखंड अहोरात्र वर्षभर मेहनत करून तयार केलेली ऑफ रोड वेहीकल नवीन-मुलांचे व पालकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत..

आम्ही आमचे प्रयत्न असेच उत्तोरोउत्तर वाढवत राहणार आहोत. आरमाईटच्या प्रत्तेक मुलाला फक्त नोकरीच नव्हे तर प्रत्तेक मुलगा एका चांगल्या कंपनीचा मालक असावा या उद्देशाने "इंटरप्राईज डेव्हलपमेंट "सेल ची देखील स्थापना केली आहे..

मागील ८ वर्षाच्या कालावधीत असंख्य मुलांनी आरमाईटमधून यशस्वी शिक्षण पूर्ण केले व आज वेगवेगळ्या उच्च दर्जावर असे विद्यार्थी कार्यरत आहे. या सर्व विद्यार्थी मित्रांचा आरमाईट ला अभिमान आहे. पालकांनी दाखवलेला विश्वास व विद्यार्थी मित्रांची मेहनत याला आमचा सलाम .असाच विश्वास भविष्यात देखील रहावा.आपल्या विश्वासाला आरमाईट कोणत्याही प्रकारे तडा जाऊ देणार नाही.

संस्थेची हि घोडदौड चेअरमन डॉ .श्री .लवेंद्रजी एस बोथरा व मा.श्री.व्यंकटेशजी गुप्ता यांच्या मार्गदर्शना खाली चालू राहील..

आपणांस आपल्या भावी वाटचाली साठी आरमाईट तर्फे खूप खूप शुभेच्छा..
या आणि अवश्य भेट द्या.आपल्या सेवेत आम्ही सदैव तत्पर आहोत..

-राम परशुराम यादव
कॉर्पोरेट हेड, आरमाईट ,शहापुर
(८८०६५९०९७४/९६२३७१३२२२)

कल्याण मधील तरुण तडफदार राजकिय नेत्रुत्व,बंजारा समाजाचा हक्काचा माणुस, गरिबांचे कैवारी, अनाथांचे नाथ ,दांडगा जनसंपर्क अस...
31/08/2015

कल्याण मधील तरुण तडफदार राजकिय नेत्रुत्व,बंजारा समाजाचा हक्काचा माणुस, गरिबांचे कैवारी, अनाथांचे नाथ ,दांडगा जनसंपर्क असलेले आमचे परम मित्र तसेच भावी नगरसेवक
युवासम्राट मा. गणेश भाई नाईक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....
आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो. आपल्या हातून
नवनिर्मानाचे कार्य घडो,
झेप अशी घ्या की पाहणा- यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न
पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबीत व्हावा,
इतकी प्रगती करा की काळही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून
यशाचा लख्ख प्रकाश , तुम्ही चोहीकडे पसरवाल ह्याच
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!
आपला ,
-गौरव ठाकुर..

मराठी माणसांच्या हिताकरता, आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढणारा एकमेव पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच आहे, ...
09/07/2015

मराठी माणसांच्या हिताकरता, आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढणारा एकमेव पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच आहे, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं.
रेल्वे भरती बोर्डाच्या वतीने दि.२७/०६/२०१५ रोजी प्रकाशित केलेल्या परिपत्रकात SSE,JE तसेच इतर विविध पदांकरिता प्रकाशित परिपत्रकात २२०४ जागांपैकी फक्त २ जागा मध्य रेल्वेला देऊन मराठी मुलांवर अन्याय करण्याचा प्रयत्न होता, पण महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेने, रेल्वे भर्ती बोर्ड मुंबईच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेवून या प्रकाराचा तीव्र निषेध करून #मनसेस्टाईल आंदोलनाचा इशारा दिला.
संभाव्य तीव्र आंदोलनाचा इशारा लक्षात घेऊन प्रशासन नमलं आणि मंगळवार दि.०७/०७/२०१५ च्या महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रात मुंबई आणि महाराष्ट्रसाठी एकूण ४८७ जागांसाठी नवीन परिपत्रक प्रकाशित केले आहे.
या संपूर्ण आंदोलनाचा पाठपुरावा मा.राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष मा.श्री सुनील हर्षे यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस मा.श्री जितेंद्र पाटिल यांच्या नेतृत्वाखाली श्री प्रभाकर कदम (सरचिटणीस),श्री सुधीर मस्के(सरचिटणीस) श्री किरण पाटिल (चिटणीस)यांच्यासह मुंबई विभाग कार्यकारणी (मध्य आणि पश्चिम रेल्वे) पदाधिकारी यांनी केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेलं तीव्र शब्दांमधील निवेदन आणि आज नव्याने प्रकाशित परिपत्रकाची यादीची कॉपी देत आहोत.

18/06/2015

मनविसे ENGINEERING च्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाला निवेदन देणार आहे...त्यासाठी तुमचा पाठींबा असणं गरजेचं आहे
सविस्तर माहितीसाठी संपर्क करा...
7208888683...
पोस्ट लाईक नाही केली तरी चालेल मात्र शेअर जरूर करा...

...१४ जुन....-----))!!महाराष्ट्राच्या राजकारणातील एक नावाजलेले व्यक्तिमत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष श्र...
13/06/2015

...१४ जुन....
-----))
!!महाराष्ट्राच्या राजकारणातील एक नावाजलेले व्यक्तिमत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस...
!!राजसाहेब एक असं व्यक्तिमत्व ज्याने महाराष्ट्राच्या कोमेजलेल्या मराठी मनांना तजेला दिला.
!!हक्काची जाणीव करुन दिली त्यांच्यासाठी लढा उभा केला आणि यशस्वी पण करुन दाखवला.
!!एक असं व्यक्तिमत्व ज्याने लढायला शिकवलं, पराभव कसा पचवायचा याचं बाळकडु पाजलं कार्यकर्त्यांना, स्वतःचं अस्तित्व बनवायला शिकवलं..
!!एक असं व्यक्तिमत्व ज्यानं जातीपातीच्या राजकारणापलीकडे फक्त मराठी आणि महाराष्ट्र या दोन गोष्टींची जाणीव करुन दिली समस्त महाराष्ट्राला...
!!मला अभिमान नाही माज वाटतो मी अशा नेत्रुत्वासाठी झटतोय....
!!गर्व वाटतो मला महाराष्ट्राचा....
!! १०८ हुतात्मे सुद्धा आज समाधानी असतील की राज ठाकरे नावाचा राजा माणूस महाराष्ट्रात जन्माला आला...!!
----))
अशा या व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...!! —

काल 1'मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचेऔचित्य साधुन मनविसे पदाधिकारी गणेश नाईक,रुपेश भोईर, गौरव ठाकुर तसेच मनविसे कार्यक...
02/05/2015

काल 1'मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे
औचित्य साधुन मनविसे पदाधिकारी गणेश नाईक,
रुपेश भोईर, गौरव ठाकुर तसेच मनविसे कार्यकर्त्यांनी
नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणार्या
पोलीसांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.......

महाराष्ट्राची यशो गाथा,महाराष्ट्राची शौर्य कथा,पवित्र माती लावू कपाळी,धरती मातेच्या चरणी माथा….,महाराष्ट्र दिनाच्या हार्...
01/05/2015

महाराष्ट्राची यशो गाथा,महाराष्ट्राची शौर्य कथा,पवित्र माती लावू कपाळी,धरती मातेच्या चरणी माथा….,
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

30/04/2015
महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण शहरआयोजित.....॥भव्य रोजगार मेळावा॥01 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमीत्त....वेळ :सका...
25/04/2015

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण शहर
आयोजित.....
॥भव्य रोजगार मेळावा॥
01 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमीत्त....
वेळ :सकाळी 10 ते दुपारी 04 वाजेपर्यंत...
ठिकाण:बिर्ला काॅलेज कल्याण (प)
मिञांनो लाईक आणि कमेंट नाय केली तरि चालेल
पण शेअर जरुर करा....

सुप्रभात राजमावळ्यांनो....आता मनसेमध्ये कार्यकर्त्यांची संख्या वाढतेय...ज्यांनी मनसेतुन पक्षांतर केलं होत ते पुन्हा स्वग...
19/04/2015

सुप्रभात राजमावळ्यांनो....
आता मनसेमध्ये कार्यकर्त्यांची संख्या वाढतेय...ज्यांनी मनसेतुन पक्षांतर केलं होत ते पुन्हा स्वगृही परतले आहेत.आणि जे विधानसभेतील अपयशामुळे खचले होते ते पुन्हा जोमाने कामाला लागले आहेत...तरि ज्या कार्यकर्त्यांना मनसेत काम करण्याची ईच्छा असेल त्यांनी त्वरीत संपर्क करा...भ्रमणध्वनी:720888883
9768121693

।राज्य सरकारने सोमवारी ४४ टोलनाके रद्द करण्याची घोषणा केली हा निर्णय योग्य असला तरी आधी ६६ टोल नाके रद्द करण्यात येणार ह...
11/04/2015

।राज्य सरकारने सोमवारी ४४ टोलनाके रद्द करण्याची घोषणा केली हा निर्णय योग्य असला तरी आधी ६६ टोल नाके रद्द करण्यात येणार होते त्या यादींचं काय? असासवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर असून एका पत्रकारपरिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली.राज्य सरकारकडून ४४ टोलनाके रद्द करण्याची घोषणा झाली असली तरी मुळात राज्याचं टोल धोरण सरकार कधी जाहीर करणार, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. केवळ असे टोलनाके बंद करून प्रश्न सुटणार नाही. बर या आधी जे ६६ टोलनाके बंद करण्यात आले त्याचं काय? हा प्रश्न मी माझ्या आमदारांना अधिवेशनात विचारायला सांगितला आहे. तसेच मुख्यमंत्रांनी मला आश्वासन दिलं होतं की राज्य सरकारकडून नवं टोल धोरण आणणं जाईल, मात्र प्रत्यक्षात तसे काहीच झालं नाही. मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांकडे नाही. हे ४४ टोलनाके बंद करून राज्य सरकारने जनतेच्या तोंडाला पानं पुसण्यासारखं आहे. त्यामुळे या ४४ टोल रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाला असं म्हणावं लागेल की जो बुंदसे गयी वो हौदसे नही आती, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.कॅम्पाकोलावासियांना पाठिंबाकॅम्पाकोलावासियांचा विचार व्हायला हवा. मनपामध्ये काम करणारा अधिकारी वर्ग आणि बिल्डर यांच्यामुळे अनधिकृत बिल्डिंग उभी राहते आणि मग त्यात नाहक सामान्य नागरिकफसतो. लोकांना शिक्षा देण्यापेक्षा त्या प्रकरणात जबाबदार असलेल्या अधिकारी आणि बिल्डरवर कारवाई का करत नाही?, असा सवाल राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

🚂🚋🚋🚋🚋🚋🚋🚋

Address

Birla College Road, Kalyan, Opp Birla College
Kalyan
421301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कल्याण - प. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share