04/03/2026
क्रेडाई लातूर यांच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या यूडीपीसीआर (UDPCR) विषयावरील विशेष सेमिनारसाठी आपणास सादर आमंत्रण.
या सेमिनारमध्ये मार्गदर्शन करणार आहेत मा. श्री. प्रकाश भुकटे सर —
जे यूडीपीसीआर (एकसंध विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली) तयार करण्यात मोलाची भूमिका बजावणारे प्रमुख व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या अनुभवातून आणि मार्गदर्शनातून यूडीपीसीआरच्या नियमांचे सखोल ज्ञान, अंमलबजावणीतील बारकावे व प्रत्यक्ष कामकाजातील महत्त्वाचे मुद्दे जाणून घेण्याची ही सुवर्णसंधी आहे.
सर्व CREDAI लातूर मेंबर्स सह आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स सर्वांनी या सेमिनारचा लाभ घ्यावा.
ही एक उत्कृष्ट संधी आहे —
✔️ यूडीपीसीआर नियम समजून घेण्यासाठी
✔️ शंका निरसनासाठी
✔️ तज्ञांकडून थेट मार्गदर्शन मिळवण्यासाठी
आपली उपस्थिती नक्कीच आपल्या व्यवसायाशी संबंधित ज्ञानार्जन वाढवेल.
धन्यवाद! 🙏