Credai Malegaon

Credai Malegaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Credai Malegaon, Property developer, Malegaon.

✨ Stepping into 2026 with hope, harmony, and new beginnings. Wishing everyone a year filled with success and memorable m...
01/01/2026

✨ Stepping into 2026 with hope, harmony, and new beginnings. Wishing everyone a year filled with success and memorable moments. ✨

Wishing a very Happy Engineers Day to all the brilliant minds shaping our future!Today we salute the dedication, creativ...
15/09/2025

Wishing a very Happy Engineers Day to all the brilliant minds shaping our future!
Today we salute the dedication, creativity, and hard work of engineers who design, innovate, and build the world we live in.
Let’s keep building progress together! 🚧🏗️

*क्रेडाई महाराष्ट्र ने १ मे ते ७ मे २०२५ या काळात बांधकाम कामगार साठी कृतज्ञता सप्ताह वेगवेगळ्या शहरात साजरा केलेला*    ...
03/07/2025

*क्रेडाई महाराष्ट्र ने १ मे ते ७ मे २०२५ या काळात बांधकाम कामगार साठी कृतज्ञता सप्ताह वेगवेगळ्या शहरात साजरा केलेला*
*त्याच पद्धतीने आपल्या क्रेडाई मालेगाव ने ही १ मे २०२५ रोजी बांधकाम कामगार साठी कृतज्ञता सप्ताह साजरा केला*.
*क्रेडाई मालेगांव ने ५१ ते १०० सभासद असणाऱ्या शहरांमध्ये व्दितीय पारितोषिक मिळवले. या प्रसंगी क्रेडाई मालेगांवचे संस्थापक अध्यक्ष व क्रेडाई महाराष्ट्राचे सहसचिव श्री राजेंद्र भामरे, क्रेडाई मालेगांवचे माजी अध्यक्ष श्री दिपक मोदी, अध्यक्ष श्री विजय सोनवणे, सचिव श्री केतन भामरे, श्री दिनेश जैन, खजिनदार श्री विपुल बिरारी, युथ विन्ग को-अॅार्डिनेटर श्री शुभम छाजेड, श्री संतोष जाधव व श्री उदित हिरे आदी उपस्थित होते*.

*धन्यवाद क्रेडाई महाराष्ट्र*
*अध्यक्ष प्रफुल्ल जी तावरे साहेब, सेक्रेटरी आशिष जी पोखरणा , OB Team & All Members*🙏

🪴क्रेडाई मालेगाव च्या वतीने ग्रीन शेल्टर अभियानाची सुरवात🪴       🌴महाराष्ट्र क्रेडाई च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र भर वन...
09/06/2025

🪴क्रेडाई मालेगाव च्या वतीने ग्रीन शेल्टर अभियानाची सुरवात🪴
🌴महाराष्ट्र क्रेडाई च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र भर वन स्टेप टुवर्ड्स ग्रीन शेल्टर ५ जुन ते ३१ जुलै पर्यंत अभियान राबवण्यात येणार आहे. मालेगाव क्रेडाई च्या वतीने जळगाव चोंढी येथे मोकळ्या जागेवर वृक्ष लागवड करून अभियानाची सुरवात करण्यात आली🌴
🌿जळगाव चौढी येथे मालेगाव क्रेडाई च्या वतीने वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन केले जाईल. असे क्रेडाई मालेगाव चे अध्यक्ष श्री. विजय सोनवणे यांनी सांगितले. स्वछ मालेगाव व हरित मालेगाव हे अभियान क्रेडाई मालेगाव ने हाती घेतले असून याची सुरवात पर्यावरण दिना चे औचित्य साधून केले आहे. क्रेडाई मालेगाव, सामाजिक संस्था, व्यापारी संघटना यांच्या सहकार्यातून हरित मालेगाव करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.🌿
🍀या कार्यक्रमांस अध्यक्ष श्री विजय सोनवणे, सचिव श्री केतन भामरे, शुभम सोनवणे,आशिष छाजेड, दिनेश जैन, संतोष जाधव, इंद्रजित पवार, रोशन सोनवणे, विपुल बिरारी, शुभम छाजेड, विशाल पाटील, हितेश जैन, सिद्धार्थ मेहता, कृष्णा कलंत्री आदी सह क्रेडाई सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. सचिव श्री केतन भामरे यांनी आभार मानले.🍀

Congratulations 'Mr. Dipak Modi' On being elected as the Committee Convenor (Market Research & Exhibition) of CREDAI MAH...
09/06/2025

Congratulations 'Mr. Dipak Modi' On being elected as the Committee Convenor (Market Research & Exhibition) of CREDAI MAHARASHTRA for the term 2025-2027
Wishing you great success in your new role..!

*क्रेडाई मालेगावच्या दि.५ जुन २०२५ रोजी झालेल्या मासिक सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून मालेगाव महानगर पालिकेचे आयुक्त मा. श...
07/06/2025

*क्रेडाई मालेगावच्या दि.५ जुन २०२५ रोजी झालेल्या मासिक सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून मालेगाव महानगर पालिकेचे आयुक्त मा. श्री रविंद्र जी जाधव साहेब उपस्थित होते*
*या मासिक सभेत मा.आयुक्त साहेबांसोबत त्याच्या केलेल्या शासकीय नोकरीतील कार्यकाळाविषयी जाणून घेण्यात आले व मालेगाव शहराविषयी त्यांच्या दैनंदिन कामाचे नियोजन व भविष्यात मालेगाव शहर स्वछ व सुंदर कसे होईल या बाबत चे दूरदृष्टी या विषयी क्रेडाई मालेगाव मालेगाव चे माजी अध्यक्ष श्री. दिपक मोदी यांनी प्रस्ताविक केले तसेच सभेत मा. आयुक्त सोबत क्रेडाई सदस्यांच्या बांधकाम परवानगी, BPMS, व्यावसायिक प्रॅापर्टी कर, नगर रचना विभाग, मालेगाव हद्द वाढीतील गावांचे DP प्लॅन या विषयी अडचणी जाणून घेऊन त्या वर चर्चा करण्यात आले मा.ना.श्री दादाजी भुसे साहेब (शिक्षण मंत्री महा.राज्य), मालेगांव महानगरपालिका व मा आयुक्त श्री रविंद्र जी जाधव साहेब यांच्या पुढाकारणे मालेगाव शहर विकासाच्या प्रगती पथावर वाटचाल जलद गतीने करत आहे. क्रेडाई महाराष्ट्र च्या पुढाकारणे ग्रीन सिटी संकल्पना साठी खुली जागा उपलब्ध करून क्रेडाई मालेगाव करीता सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच अध्यक्ष श्री विजय सोनवणे, माजी अध्यक्ष श्री. दिपक मोदी, विवेक देवरे, सचिव श्री.केतन भामरे व क्रेडाई मालेगांव तर्फे मा. आयुक्ताचा सत्कार करण्यात आला या सभेसाठी क्रेडाई मालेगाव चे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते*

*क्रेडाई मालेगाव चा पदग्रहण सोहळा* *क्रेडाई मालेगाव चा दि. १३ एप्रिल २०२५ रोजी पदग्रहण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमास...
07/06/2025

*क्रेडाई मालेगाव चा पदग्रहण सोहळा*

*क्रेडाई मालेगाव चा दि. १३ एप्रिल २०२५ रोजी पदग्रहण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर प्रमुख अतिथी मंत्री महोदय मा. श्री दादाजी भुसे साहेब (शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य), कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी क्रेडाई महाराष्ट्र अध्यक्ष मा. श्री प्रफुल्ल जी तावरे, राज्य उपाध्यक्ष मा. श्री अनिस जी शाह, राज्य खजिनदार मा. श्री सुरेंद्र जी भोईटे राज्य सहसचिव मा. श्री राजेंद्र जी भामरे, मालेगांवातील डॅाक्टर, CA, इंजिनियर, व्यवसायिक, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी क्रेडाई मालेगांवच्या अध्यक्षपदी श्री विजय सोनवणे यांनी मावळते अध्यक्ष श्री विवेक देवरे यांच्या कडुन अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला*

*क्रेडाई मालेगांव चे कार्यकारिणी २०२५-२७ या दोन वर्षाकरिता पदाधिकारी यांची निवड करण्यात आली श्री विजय सोनवणे यांची अध्यक्षपदी व श्री केतन भामरे यांची सचिव पदी निवड करण्यात आली उपाध्यक्ष म्हणून श्री मधुसूदन काबरा व धर्मेश जहागीरदार यांची निवड करण्यात आली*
*शहर व तालुक्यातील विकासकामांच्या देखणेपणात 'मालेगाव क्रेडाई'ची भूमिका महत्त्वाची आहे. आगामी वर्षात विकासकामातून 'सुंदर मालेगाव शहर' साकारण्यात येणार आहे. या स्वप्नपूर्तीसाठी क्रेडाईच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले*
*या प्रसंगी सिन्नर क्रेडाईचे अध्यक्ष समाधान गायकवाड, मालेगाव क्रेडाईचे माजी अध्यक्ष अजय बच्छाव, विजय पोफळे, दीपक मोदी, रवींद्र शेलार युवा विंगचे अध्यक्ष शुभम छाजेड यांच्यासह शहर व तालुक्यातील क्रेडाईचे सभासद उपस्थित होते सूत्रसंचालन कुंदन चव्हाण, मधुकर काबरा यांनी तर केतन भामरे यांनी आभार मानले*

येथील क्रेडाई मालेगाव संघटनेतर्फे शहरातील बांधकाम कामगारासाठी कृतज्ञता सप्ताह राबविण्यात आला. दरवर्षी १ ते ७ मे या काळात...
02/06/2025

येथील क्रेडाई मालेगाव संघटनेतर्फे शहरातील बांधकाम कामगारासाठी कृतज्ञता सप्ताह राबविण्यात आला. दरवर्षी १ ते ७ मे या काळात राज्य क्रेडाई संघटनेतर्फे विविध शहरांतील बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी कृतज्ञता सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या सप्ताहात विविध कल्याणकारी प्रकल्प राबविण्यात येतात. त्या अनुषंगाने कामगार कल्याण मंडळाचे केंद्र प्रमुखांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी क्रेडाई महाराष्ट्रचे सहसचिव राजेंद्र भामरे उपस्थित होते. यावेळी कामगारांसाठी वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात डॉ. अभिजीत हिरे, डॉ. अमित पवार, डॉ. यशोदीप ठाकरे, डॉ. तुषार अग्रवाल यांनी कामगारांची वैद्यकीय तपासणी केली. या शिबिराचा ३५० हून अधिक कामगारांनी लाभ घेतला. तसेच ६५ क्रेडाई सदस्य कामगार बांधवांनी रक्तदान केले. यासाठी मालेगाव ब्लड बँक, रोटरी आय हॉस्पिटल यांनी निःशुल्क योगदान दिले. यावेळी जगदीश वडगे यांनी कामगार नोंदणी का केली पाहिजे व कामगार नोंदणीचे १८ ते ६५ वयापर्यंतचे अनेक फायदे यावर मार्गदर्शन केले.

यावेळी नाना निकम यांच्या सहकार्याने १०० पेक्षा जास्त नवीन कामगार नोंदणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणी शिबिराच्या यशस्वितेसाठी क्रेडाई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.

यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष विजय सोनवणे, माजी अध्यक्ष अजय बच्छाव, दीपक मोदी, विजय पोफळे, रवींद्र शेलार, विवेक देवरे, उपाध्यक्ष मधुसूदन काबरा, धर्मेश जहागीरदार, प्रोजेक्ट चेअरमन शुभम छाजेड, इंद्रजीत पवार, देवराम हिरे, सचिन शाह, योगेश दत्तानी, प्रसाद हिंगे, संदीप भुसे, सचिन जाधव, आशिष छाजेड, दिनेश जैन, विपुल बिरारी, विशाल पाटील, रोशन सोनवणे, संतोष जाधव, गुरूदास गावडे, शुभम सोनवणे, कृष्णा कलंत्री, अनुप पहाडे आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिव केतन भामरे यांनी आभार मानले.

*क्रेडाई मालेगाव चा पदग्रहण सोहळा * क्रेडाई मालेगाव चा दिनांक १७ मे रोजी पदग्रहण सोहळा संपन्न झाला यात 2025-2027 या दोन ...
02/06/2025

*क्रेडाई मालेगाव चा पदग्रहण सोहळा *
क्रेडाई मालेगाव चा दिनांक १७ मे रोजी पदग्रहण सोहळा संपन्न झाला यात 2025-2027 या दोन वर्षाकरिता पदाधिकारी यांची निवड करण्यात आली
यात श्री विजय सोनवणे यांची अध्यक्षपदी व श्री केतन भामरे यांची सचिव पदी निवड करण्यात आली उपाध्यक्ष म्हणून श्री मधुसूदन काबरा व धर्मेश जहागीरदार यांची निवड करण्यात आली.
शहर व तालुक्यातील विकासकामांच्या देखणेपणात 'मालेगाव क्रेडाई'ची भूमिका महत्त्वाची आहे. आगामी वर्षात विकासकामातून 'सुंदर मालेगाव शहर' साकारण्यात येणार आहे. या स्वप्नपूर्तीसाठी क्रेडाईच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले.
या प्रसंगी सिन्नर क्रेडाईचे अध्यक्ष समाधान गायकवाड, मालेगाव क्रेडाईचे माजी अध्यक्ष अजय बच्छाव, विजय पोफळे, दीपक मोदी, रवींद्र शेलार युवा विंगचे अध्यक्ष शुभम छाजेड यांच्यासह शहर व तालुक्यातील क्रेडाईचे सभासद उपस्थित होते सूत्रसंचालन कुंदन चव्हाण, मधुकर काबरा यांनी तर केतन भामरे यांनी आभार मानले.

"We, the entire Credai Malegaon family, are filled with immense joy and pride as our beloved mentor, Mr. Rajendra Bhamre...
26/05/2025

"We, the entire Credai Malegaon family, are filled with immense joy and pride as our beloved mentor, Mr. Rajendra Bhamre, has been selected as the Joint Secretary of CREDAI Maharashtra. His achievement is not only an inspiration to us all but also a proud moment for the entire Credai Malegaon community."

Address

Malegaon
423105

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Credai Malegaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share