26/09/2020
इव्हेंट्स ,लग्नसमारंभ , करमणुकीचे कार्यक्रम आणि कोरोना -२०२०
मार्च २०२० जगात कोरोनारूपी राक्षसाने थैमान घातलं . अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. ६ महिने झाले पण कोरोना काय थांबायचं नाव घेत नाहीये.
मार्च -एप्रिल -मे महिने लग्नसमारंभ,अनेक प्रकारचे करमणुकीचे कार्यक्रम, कॉर्पोरेट इव्हेंट्स, ,गावातील जत्रोत्सव, नाटक ह्यांचे महिने . अगदी बिसनेस च्या भाषेत बोलायचे झाले तर हे तीन महिने म्हणजे ह्या सर्व लोकांचे आणि पर्यायाने ह्या सर्व क्षेत्रात आपले योगदान देणाऱ्या लोकांचे कमवायचे दिवस. कोरोना आला आणि गेले ६ महिने हे सगळं ठप्प झाल. ना कुठले कार्यक्रम झाले ना कुठले भव्य दिव्या लग्न समारंभ झाले. चित्रपट, मालिका ह्यांची शूटिंग गेल्या २ महिन्यापासून सुरु झाली तेवढाच काय तो दिलासा. काही प्रमाणात लग्न समारंभ सुद्धा पार पडले. पण ते अगदी थोडक्यात. भारत सरकारने आता अनलॉक ४ ची घोषणा केली आहे. त्या मध्ये सर्व प्रकारचे कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याबाबत सकारात्मक पद्धतीने नियमावली सादर करण्यात आली आहे.
आपण ती नियमावली जरा नजरेखालून घालूया.
१. लग्न समारंभासाठी १०० व्यक्ती भाग घेऊ शकतात.
२. सर्वाना मास्क वापरणे हे अनिवार्य आहे.
३. सोशल डिस्टन्स चे पालन करणे अनिवार्य आहे.
४. सॅनिटाझर्स चा उपयोग करणे हे अनिवार्य आहे.
५. कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्व खुर्च्या, टेबलं , मंडप, आणि अन्य सर्व ठिकाणी निर्जंतुकीकरण ( sanitization ) करणे हे अनिवार्य आहे.
भारताची आकडेवारी जर आपण बघितली तर प्रति वर्षी अंदाजे लक्षावधी लग्नसमारंभ, लक्षावधी अनेक प्रकारचे कार्यक्रम होत असतात. गेले सहा महिने रखडलेले लग्न समारंभ ह्या पुढे नक्कीच सुरु होतील. काहीजण वरील सूचनांच पालन करतील काहीजण त्या सर्व सूचनांना केराची टोपली दाखवतील. कारण आपल्या देशात नियम हे मोडण्यासाठीच असतात. असो.
पण नियम पाळणाऱ्या आयोजकांपुढे नक्कीच काही प्रश्न उपस्थित होतील ते म्हणजे हे सर्व निर्जंतुकीकरण ( sanitization ) करायचे कसे, त्यासाठी आर्थिक नियोजन कसे करावे, सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटाझर्स चा उपयोग हे सर्व कसे करायचे? आपल्यासोबत आपल्या ग्राहकाची काळजी कशी घेयची? आपला कार्यक्रम हा सर्वाना कसा सुरक्षित वाटेल जेणेकरून आपले वेगळेपण सर्वासमोर सिद्ध होईल , हे सर्व प्रकार खर्चिक तर नाहीत ना? त्या साठी कोणत्या प्रकारचे केमिकल वापरले जाते? हे काम आपल्याला खात्रीशीर कोण करून देईल ? असे नानाविध प्रश्न हे आता आयोजकांना पडायला सुरुवात होणार.
प्रश्न अनेक पण उत्तर एकच
स्टॅटिग सोल्युशन्स, माशेल, गोवा
आम्ही आपल्याला सर्व प्रकारचे मार्गदर्शन करू. अगदी मास्क, सॅनिटाझर्स, निर्जंतुकीकरण ( sanitization ), नानाविध प्रकारचे इको फ्रेंडली उपाय, ते सरकारी गाईडलाईन संदर्भातील मार्गदर्शन. एकमेकांच्या साथीने परत हे क्षेत्र नव्याने उभारूया. आपल्या ग्राहक राजाच्या आरोग्याची काळजी आपणच घेयची आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
स्टॅटिग सोल्युशन्स, माशेल, गोवा
८४२१६३७२०१