Purvarang - Mulund East

Purvarang - Mulund East A luxurious home in Mulund East. One of the most popular Self Development Project in Mumbai

29/04/2024
गृहनिर्माण संस्थेच्या स्वयंपूर्णविकासाची पूर्व रंग गाथा :- स्वतः च्या मालकीचे घर हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक ह...
29/04/2024

गृहनिर्माण संस्थेच्या स्वयंपूर्णविकासाची पूर्व रंग गाथा :-

स्वतः च्या मालकीचे घर हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक हळवा कप्पा असतो . परंतु हेच घर जुने झाल्यानंतर रिडेव्हलपमेंट किंवा पुनर्विकासाच्या टप्प्यावर येऊन थांबतं तेव्हा सुरू होते मनातील विचारांची शृंखला. पुनर्विकास झाल्यावर आपल्या सध्याच्या घरापेक्षा अतिरिक्त जागेचे नवीन घर मिळेल का ? त्यासाठी अजून किती वर्ष लागतील ? चांगला विश्वासातील विकासक मिळेल का? प्रकल्प दिलेल्या वेळेत पूर्ण होईल का? विकासकाकडून वेळेवर भाडे मिळेल का ? विकासक नेमणूक नाही केली तर इतर पर्याय आहेत का? स्वयं पुनर्विकास तत्वावर विकास सहज शक्य आहे का? असे अनेक प्रश्न पुनर्विकासासाठी सज्ज असलेल्या गृहनिर्माण संस्थेतील प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबातील सभासदास भेडसावत असतात ,कारण स्व कष्टाने कमावलेल्या पुंजीतून उभे केलेले स्वतःच्या मालकीचे घर हे पुनर्विकासासाठी विकासकाच्या दावणीस बांधायला कोणाचेही मन भीतीपोटी धजवत नाही. आणि या भीतीला कारणीभूत असते, इतर सहकारी संस्थांच्या इमारत पुनर्विकासा दरम्यान आलेले काही बरे वाईट अनुभव.

या सर्व बाबींचा विचार करूनच पाच-सहा वर्षांपूर्वी राज्य सरकारकडून स्वयंपूर्ण विकास तत्त्वावर गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींची बांधणी करण्यासाठी प्रोस्ताहीत करण्यात आले . बऱ्याच संस्थांनी उत्सुकता दाखवली . स्वयंपूर्ण विकासातून इमारत बांधणी करण्यासाठी मिळणारे अर्थसहाय्य तसेच इतर अनेक फायदे मिळविण्यासाठी बहुसंख्य संस्था तयार झाल्या परंतु शासनाकडून योजनेची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे व इतर कारणास्तव आजपर्यंत काही ठराविक सहकारी संस्थांनीच स्वयंपूर्ण विकास तत्त्वावर आपल्या इमारतीची बांधणी केली. यातील बऱ्याच संस्थातील सभासदांनी एकत्र येऊन, बँकेतर्फे आर्थिक सहाय्य घेऊन , प्रकल्प सल्लागारामार्फत कॉन्ट्रॅक्टर नेमून, विक्री एजंट मार्फत सदनिका विक्री करून स्वयं पुनर्विकास तत्वावर इमारतींची बांधणी यशस्वी केली आहे.

हाच स्वयंपूर्ण विकासाचा मार्ग स्वीकारून थोडा वेगळ्या व अनोख्या पद्धतीने 23 मजल्याची 118 सदनिकांची इमारत बांधणारी संस्था म्हणजे मुलुंड पूर्व येथील पूर्व रंग.२५० कोटी बाजार भाव असलेली 87 कोटी प्रकल्प खर्च असलेली इमारत ३६ महिन्यात पूर्ण झाली. ते देखील कुठल्याही आर्थिक संस्थेकडून कर्ज न घेता .विश्वास नाही ना बसत?

हि किमया केली आहे पूर्वरंग सोसायटी ,मुलुंड पूर्व येथील 56 सभासदांनी . त्याचा हा थोडक्यात आढावा

2017-18 साली जेव्हा इमारत पुनर्विकास करण्याची प्राथमिक चर्चा सुरु झाली, तेव्हा मुलुंड पूर्व येथे बरेच खाजगी विकासकांचे प्रकल्प ठप्प झाले होते अथवा धीम्या गतीने काम सुरू होते . तसेच प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आठ दहा वर्षाचा सरासरी कालावधी लागत होता. अडकलेले प्रकल्प व त्रस्त झालेल्या सभासदांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून रेरा कायद्याची निर्मिती झाली परंतु त्याबद्दल फार कमी प्रमाणात माहिती उपलब्ध होती .
अशा वातावरणात इमारतीचा पुनर्विकास करावयाचा असल्यास आपले घर एखाद्या अनोळखी विकासकाच्या ताब्यात देण्याऐवजी आपणच पुढाकार घेऊन स्वयं पुनर्विकास कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास पूर्वरंग समितीने सुरु केला. इतर सर्व माहितीचा आढावा घेऊन इमारत बांधणीसाठी आवश्यक कायद्याचा वापर करून प्रकल्प सल्लागाराची नेमणूक करण्यात आली . सल्लागाराकडून फिजिबिलिटी रिपोर्ट प्राप्त झाल्यावर समितीने जाणकारांच्या मदतीने रिपोर्ट पूर्ण समजून घेतला. रिपोर्ट मधील कायदेशीर बाबी, आर्थिक जमाखर्चाची बाजू, सरकारी नियम यांचा पूर्ण अभ्यास केला. इमारत म्हाडा संस्थेच्या अधिपत्याखाली असल्याने संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडून माहिती गोळा केली व योग्य ते सहकार्य मिळविले. म्हाडा कडून प्रत्यक्ष पाठपुरावा करून प्रकल्प स्वयंपूर्ण विकास तत्वावर करण्यासाठी ऑफर लेटर मिळविले

तदनंतर इमारत बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या वास्तू विशारद व इतर सल्लागारांची नेमणूक करण्यात आली
वास्तुविशारदाने बनवलेल्या इमारत आराखडा इतर सल्लागारांना दाखविला .त्यांच्याकडून त्यातील त्रुटी जाणून घेऊ परिसरातील विक्रीचा अभ्यास करून अंतिम आराखडा संमत करण्यात आला. त्यासाठी मुंबईतील प्रख्यात वास्तु विशारद व स्वयंपूर्ण विकासावरील अभ्यासक श्री चंद्रशेखर प्रभू यांचे सहकार्य घेण्यात आले.

इमारत आराखडा बनविताना सध्या राहत असलेल्या परिसरातील सदनिका विक्री बद्दल अभ्यास करणे तसेच आपल्या सभासदांच्या गरजा विचारात घेणे खूप महत्त्वाचे असते. घराची रचना सुटसुटीत व हवेशीर असणे, कार्पेट एरियाचा योग्य वापर करता येणे या सर्व गोष्टी समितीने कौशल्याने हाताळल्या आणि म्हणूनच सुंदर इमारत आराखडा ,उच्च प्रतीचे बांधकाम साहित्य , उत्कृष्ट कामाचा दर्जा, अति उत्तम सुविधा व कुशल आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्यवस्थापनामुळे देखणी पूर्वरंग ची वास्तू, टाटा कॉलनी मुलुंड पूर्व येथे उभी राहिली आहे.अद्यावत सोयीसुविधा, उच्च दर्जाचे बांधकाम , घराचा ताबा वेळेवर मिळण्याची हमी, छुपी दरवाढ न करता कामाच्या दर्जाप्रमाणे आकारलेली विक्री किंमत यामुळेच ग्राहकांनी आम्हावर विश्वास दाखविला. प्रकल्पातील सदनिका ग्राहकांच्या पसंतीस उतरून सदनिका विक्री सहज सुलभ झाली. मुलुंड मधील कित्येक ग्राहकांनी सभासदांची एकजूट पाहून घर खरेदी केल्याची उदाहरणे आहेत.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सभासदांचा चाव्या सुपूर्द करताना फक्त पाच सदनिका विक्रीसाठी शिल्लक असणे हे प्रकल्पाच्या यशाचे प्रतीक आहे.

कुठलाही स्वयंपूर्ण विकास प्रकल्प करताना आर्थिक तरतुद अत्यंत महत्त्वाची बाब असते त्यासाठी आज काही जिल्हा सहकारी व नागरी सहकारी बँका पुढाकार घेत आहेत. पूर्व रंग प्रकल्पात बँकेकडून 20 करोड चे कर्ज तत्वतः संमत झाले होते परंतु त्या दरम्यान आरबीआय ने घातलेल्या निर्बंधानुसार बँकेकडून सदरहू कर्ज रद्द करण्यात आले. अशा कठीण परिस्थितीत संस्थेच्या प्रत्येक सभासदाने घर भाड्याची जबाबदारी संस्थेवर न टाकता स्वतःकडे घेतली. काही सभासदांनी अतिरिक्त जागा विकत घेऊन तसेच बँक मुदत ठेवीचे पैसे देऊन पुनर्विकास निधी उभारणीसाठी मदत केली. या निधीचा वापर संस्थेने प्राथमिक कामासाठी केला. तदनंतर प्रकल्पाची रेरा कायदा अंतर्गत रीतसर नोंदणी झाल्यावर प्रत्येक सभासदांनी व त्याच्या कुटुंबीयांनी सदनिका विक्री स्वतःची जबाबदारी समजून विविध समाज माध्यमांचा वापर करून प्रकल्पाचा प्रसार केला त्यामुळे सदनिका विक्री सुलभ होऊन प्रकल्पाची आर्थिक गणिते जुळून आली. सर्व सभासदांनी घेतलेल्या मेहनतीमुळे व केलेल्या आर्थिक सहकार्यामुळे आज हा प्रकल्प कुठल्याही बँकेच्या कर्ज सहाय्य शिवाय पार पडत आहे.

करोना सारख्या मोठ्या व इतर अनेक अडचणींवर मात करीत अथक परिश्रमातून व एकजुटीने इमारत बांधकाम पूर्ण झाले आहे. लवकरच आम्ही आमच्या स्वप्नातील घरात गृह प्रवेश करीत आहोत असे सांगताना अत्यंत आनंद व अभिमान वाटत आहे.

या यशस्वी वाटचालीत मागे वळून पाहताना प्रकर्षाने दिसून येते पूर्व रंगाच्या 56 सभासदांनी व त्यांच्या परिवाराने घेतलेली मेहनत व कार्यकारणी समितीवर दाखविलेला विश्वास आणि त्या विश्वासाला तडा न देता सर्व सभासदांना सामावून घेऊन कार्यकारणी समितीने पारदर्शकतेने व विचार विनिमय करून घेतलेले सर्व निर्णय . यातून निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा आपणास यशस्वी वाटचाल करण्यास मदत करते..

मध्यमवर्गीय नोकरदार वर्गातील 56 सभासदांनी एकत्र येऊन केलेला हा प्रकल्प आहे . यातील कुठल्या सभासदाला बांधकाम क्षेत्रातील अनुभव नसताना सल्लागार व बांधकाम क्षेत्रातील जाणकारांची मदत घेऊन हा प्रकल्प यशस्वी झाला . आज पर्यंत मराठी माणूस एकत्र येणे सोडा तर दुसऱ्याला पुढेही जाऊन देत नाही हा मराठी माणसाच्या माथ्यावरील शिक्का आमच्या 95% महाराष्ट्रीयन सभासद असलेल्या पूर्व रंग सोसायटीने खोडून काढला आहे.. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या तुकारामांच्या अभंगातील ओळींनुसार स्वयंपूर्ण विकासासाठी उत्सुक असलेल्या इतर सर्व सोसायटीतील सभासदांनी एकत्र येऊन मेहनत करण्याची तयार दाखवली तर स्वयंपूर्ण विकास कोणीही थांबू शकणार नाही
आज मुंबई, पुणे, ठाणे व नवी मुंबई येथील बऱ्याच गृहनिर्माण संस्था स्वयंपूर्ण विकासासाठी उत्सुक आहेत.Unity is strength म्हणजेच एकता ही शक्ती या शब्दप्रयोगात सहकाराचा मूलमंत्र आपणास सापडल्यास स्वयंपूर्ण विकास तत्त्वावर इमारत पुनर्बांधणी करणे इतर संस्थाना सहज शक्य आहे .

मिलिंद महाडिक, सचिव 9321906989
राकेश गायकवाड, कोर टीम सदस्य - 8450916966

28/04/2024

मराठी माणसाने अजूनही डोक्यावर बर्फ ठेवला तर किमान दोन पिढ्यांची कमाई होऊ शकते याचे हे छोटेसे उदाहरण आहे!

बिल्डरकडून फसवणुकीच्या भीतीपोटी स्वयंपुनर्विकासाचा धाडसी निर्णय घेतला. जुनी इमारत पाडली. नव्या इमारतीचे थाटात भूमिपूजन झाले. मात्र, १५ दिवसांत लॉकडाऊन लागले. दहा महिने करोनात वाया गेले. इमारत उभारणीसाठी बांधकाम साहित्य मिळेना. या संकटांच्या पार्श्वभूमीवर आज वर्षप्रतिपदेच्या मुहूर्तावर साडेचार वर्षांनी स्वतः ६२ सदनिकांची विनादलाल विक्री करून स्वतःच्याही घरांची चावी घेताना मुलुंडच्या पूर्वरंग सोसायटीतील सभासदांना आनंदाश्रू अनावर झाले होते. अशाप्रकारे १०० टक्के यशस्वी स्वयंपुनर्विकासाचा हा राज्यातील पहिला प्रयोग ठरला.

मुलुंड पूर्वच्या टाटा कॉलनीजवळील पूर्वरंग सोसायटी १९९९ची. त्यामध्ये ५६ सभासद आहेत. २०१९ मध्ये सोसायटीने स्वयंपुनर्विकासाचे नियोजन व ठराव केला. डिसेंबर २०१९मध्ये जुनी इमारत पाडली गेली. करोना संकटामुळे बांधकामाला विलंब झाला. मात्र, सभासदांनी एकी दाखवत, एक पाऊलही मागे न घेता, इमारतीचे आरेखन तयार करणे, म्हाडाकडून विनालाच परवानगी मिळविणे, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणे, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे, इमारतीसाठी आवश्यक असलेले प्रत्येक बांधकाम साहित्य स्वतः खरेदी करून आणणे व ते कंत्राटदाराला देणे, कामगारांची स्वतः नेमणूक करणे, रेराकडे रितसर नोंदणी करुन स्वतः फ्लॅट्सच्या विक्रीसाठी कठोर मार्केटिंगद्वारे ग्राहक आणणे, ही सर्वसामान्यांसाठी अवघड असलेली कामे या ५६ सभासदांनी स्वतः विभागून करीत 'पूर्वरंग' सोसायटीचा पुनर्विकास मार्गी लावला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सभासदांना चाव्या मिळाल्या. प्रत्येकाला दुपटीहून अधिक आकाराचे घर मिळाले.

सर्व सभासदांची एकी, हेच या यशाचे गमक असल्याचे या सोसायटीचे सचिव मिलिंद महाडिक यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला सांगितले. 'स्वयंपुनर्विकास करताना असंख्य प्रकारची क्लिष्ट कामे करावी लागतात. त्यासाठी आम्ही सर्व ५६ सभासदांच्या त्यांच्या व्यावसायिक अनुभवानुसार उपसमित्या स्थापन केल्या. त्यांचे समन्वयन सचिव या नात्याने मी करीत होतो. सर्व सभासद स्वःखर्चाने भाड्याच्या घरात राहत असल्याने करोनाकाळात काम थांबल्याने मोठे संकट ओढवले. मात्र रेरा नोंदणी मिळताच आम्ही धडाडीने मार्केटिंग सुरू केले. ६२ फ्लॅटची विक्री झाली. त्याच रकमेतून आम्ही इमारत तीन वर्षात उभी करून दाखवली, याचा आनंद आहे', असे त्यांनी सांगितले.

इमारत बांधकाम सुरू होण्याआधी वास्तूविशारद नेमण्यासह अन्य कामे असतात. त्याचा खर्च भरून काढण्यासाठी या ५६ सभासदांनी त्यांच्या नातेवाईकांना पुनर्विकसित इमारतीत फ्लॅट खरेदीचे आवाहन केले. त्याद्वारे १० कोटी रुपयांचे फ्लॅट खरेदी होणार, हे निश्चित झाले. त्या सर्वांकडून १० टक्के रक्कम आगाऊ घेतली. हा प्रारंभीचा निधी स्वयंपुनर्विकाचा आश्वासक असा श्रीगणेशा ठरल्याचे महाडिक यांनी सांगितले.

मुंबईत आज २५ सोसायट्यांनी यशस्वी स्वयंपुनर्विकास केला आहे. मात्र, विना कर्जाऊ रक्कम प्रकल्प यशस्वी झालेली 'पूर्वरंग' सोसायटी एकमेव आहे. सोसायटीने मुंबई जिल्हा बँकेकडून कर्ज मंजूर करून घेतले होते. मात्र रक्कम घेण्याची वेळच आली नाही. कर्ज रद्द होईल, म्हणून नाममात्र रक्कम उचलली व तीदेखील आता लवकरच फेडली जाणार आहे.

५८०० प्रकल्प ठप्प

'बिल्डरांनी फसवणूक केल्याने मुंबईतील ५८०० प्रकल्प ठप्प आहेत. त्यात मुलुंडमधील १४५ प्रकल्प आहेत. एकूण १ लाख २५ हजार ९७० कुटुंबे रस्त्यावर आहेत. चांगल्या घरात राहणारी ८ लाख लोकं हलाखीत जगत आहेत. या स्थितीत पूर्वरंग हे आदर्श उदाहरण आहे, असे मत ज्येष्ठ नगररचना तज्ज्ञ चंद्रशेखर प्रभू यांनी व्यक्त केले.

09/04/2024
पूर्व रंग स्वप्नपूर्ती सोहळा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर संपन्न झाला
09/04/2024

पूर्व रंग स्वप्नपूर्ती सोहळा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर संपन्न झाला

23/01/2024

Project video published by Yashma

*स्वप्नपूर्तीकडे यशस्वी वाटचाल !!*चार वर्षांपूर्वी आम्ही मुलुंड पूर्व येथील  पूर्वरंग सोसायटीमधील ५६ सभासदांनी स्वयं:पून...
21/01/2024

*स्वप्नपूर्तीकडे यशस्वी वाटचाल !!*

चार वर्षांपूर्वी आम्ही मुलुंड पूर्व येथील पूर्वरंग सोसायटीमधील ५६ सभासदांनी स्वयं:पूनर्विकास तत्त्वावर इमारत पुन:बांधणीस सुरुवात केली. करोना महामारी सारख्या अनेक अडचणींवर मात करीत, अथक परिश्रमातून व एकजुटीने इमारत बांधकाम पूर्ण झाले आहे .पुढील तीन महिन्यातच आम्ही आमच्या स्वप्नातील घरात गृह प्रवेश करीत आहोत असे सांगताना अत्यानंद होत आहे व आम्हा सर्वांना अभिमान वाटत आहे.

*सुंदर इमारत आराखडा ,उच्च प्रतीचे बांधकाम साहित्य , उत्कृष्ट कामाचा दर्जा, अति उत्तम सुविधा व कुशल आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्यवस्थापनामुळे आमच्या पूर्वरंगची देखणी वास्तू उभी राहिली आहे.*

२३ मजली इमारतीमधील ११८ फ्लॅटमधून सभासदांचे ५६ फ्लॅट वगळता इतर फ्लॅटची विक्री झाली आहे. विक्रीसाठी फक्त दहा फ्लॅट शिल्लक राहणे हे स्वयं:पूनर्विकास यशस्वी होण्याचे उत्तम उदाहरण आहे. प्रकल्पास मिळालेला प्रतिसाद पाहता उर्वरित फ्लॅट विक्रीची शाश्वती आहे.

अद्ययावत सोयीसुविधा, उच्च दर्जाचे बांधकाम , घराचा ताबा वेळेवर मिळण्याची हमी, छुपी दरवाढ न करता कामाच्या दर्जाप्रमाणे आकारलेली विक्री किंमत यामुळेच ग्राहकांनी आम्हावर विश्वास दाखविला आहे. मुलुंडमधील कित्येक ग्राहकांनी सभासदांची एकजूट पाहून घर खरेदी केल्याची उदाहरणे आहेत.
आज मुंबई, ठाणे, पुणे येथील गृहनिर्माण संस्था आमच्या प्रकल्पास प्रत्यक्ष भेट देऊन प्रशंसा करीत आहेत. आमचे कार्यकारणी समिती सदस्य त्यांना प्रकल्पाबद्दल माहिती देऊन स्वयं:पूनर्विकास मार्फत इमारत पुन:र्विकास करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहोत.
कुठल्याही बँकेकडून आर्थिक सहाय्य न घेता, विक्रीसाठी एजंट किंवा एजन्सीची मदत न घेता, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्प सल्लागाराची नेमणूक करून ११८ सदनिकांची २३ मजल्याची इमारत पूर्ण करणारी पूर्वरंग संस्था हे स्वयं:पुनर्विकासाचे एकमेव उदाहरण असेल.

आमच्या प्रकल्पाला आपणही भेट देऊन फ्लॅटची रचना व प्रकल्पाबद्दल इतर माहिती जाणून घ्यावी. तसेच आपल्या मित्रपरिवार व इतर नातेवाईकांस मुलुंड पूर्वेस फ्लॅट खरेदी करण्याची इच्छा असल्यास संपर्क साधावा.

*आपला अनिल हडकर* 9137011142
*अधिक माहितीसाठी* 9930994949, 9321906989, 8450916966
Please forward this message in other groups

Why PURVARANG Project is the best Home choice ?1) One of the most popular SELF REDEVELOPMENT PROJECT in Mumbai.2) Assura...
13/09/2023

Why PURVARANG Project is the best Home choice ?

1) One of the most popular SELF REDEVELOPMENT PROJECT in Mumbai.
2) Assurance for Quality Construction and Timely possession
3) Project is professionally managed by Cushman & Wakefield (Multi National Company)
4) Brilliant Team of Architects and Consultants
5) Well designed Floor plan providing optimum utilization of Carpet area
6) Iconic View and luxurious amenities like Terrace Garden, Gym, Kids play area, podium Garden
7) ECO Friendly approach – Green Building initiative, Electric Car Charging station ,Solar power ,Garbage chute etc
8) Cross ventilation with Balcony to each flat
9) Easy connectivity
10) Project is approved by SBI for home Loan
11) 90 % flats sold out
12) Assurance of Value for money
If you are looking for a cozy n luxurious home in Mulund East ,Then PURVARANG is your best choice.
So what are you waiting for!!!
You can contact for additional information.Contact 8450916966, 9321906989

Our Purvarang Society self Redevelopment project in today's Mumbai Mirror
23/07/2023

Our Purvarang Society self Redevelopment project in today's Mumbai Mirror

Our Purvarang self redevolpment project is published in Today's Mumbai Mirror
23/07/2023

Our Purvarang self redevolpment project is published in Today's Mumbai Mirror

Address

Veer Savarkar Marg, Tata Colony, Mulund East
Mumbai
400081

Alerts

Be the first to know and let us send you an email when Purvarang - Mulund East posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Purvarang - Mulund East:

Share