11/01/2026
मुंबईच्या रिअल इस्टेट बाजारात सध्या जुहूतील एका ऐतिहासिक बंगल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
जुहू बीचजवळ असलेला ‘लीला’ नावाचा आलिशान बंगला सुमारे २५० कोटी रुपयांना विक्रीसाठी काढण्यात आला आहे. हा बंगला प्रसिद्ध नानावटी कुटुंबाच्या मालकीचा असून, विलेपार्ले येथील Nanavati Hospital शी संबंधित कुटुंबाने ही मालमत्ता उभारली होती.
१९५० च्या दशकात आर्ट डेको शैलीत बांधलेला हा बंगला ग्रेड IIB वारसा मालमत्ता म्हणून नोंदणीकृत आहे. त्यामुळे या बंगल्याला ऐतिहासिक महत्त्वही आहे.
हा बंगला सुमारे १४,८५८ स्क्वेअर फूट भूखंडावर पसरलेला असून, त्याचे बांधकाम क्षेत्र सुमारे ८,४८० स्क्वेअर फूट आहे. ही ६ बीएचके मालमत्ता असून ग्राउंड प्लस दोन मजल्यांची रचना आहे. बंगल्यात दोन लिव्हिंग रूम, डायनिंग रूम, व्हरांडे, समुद्राकडे तोंड असलेल्या बाल्कनी आणि समुद्राभिमुख बाग आहे. तसेच कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र खोली, चार गाड्यांचे पार्किंग आणि मोठी टेरेसही उपलब्ध आहे.
मोक्याचे स्थान, समुद्राजवळील परिसर आणि ऐतिहासिक वारसा यामुळे अनेक मोठे विकासक आणि अतिश्रीमंत खरेदीदार या बंगल्यात रस दाखवत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जुहूतील ही ‘लीला’ प्रॉपर्टी सध्या मुंबईच्या लक्झरी रिअल इस्टेट मार्केटमध्ये केंद्रस्थानी आली आहे.
Source :- dnaindia