Sadhgruham Vastu Consultant

Sadhgruham Vastu Consultant Every Home is incomplete without vastu..let's convert your home into Vastu.

यथा वास्तू तथा सुखम!

18/12/2024
16/10/2024
Share ur house plan to us,we will convert it into VASTU!!
16/07/2024

Share ur house plan to us,we will convert it into VASTU!!

Send us your floor plan ,we will help you to select the best!
15/07/2024

Send us your floor plan ,we will help you to select the best!

Let your vastu as perfect as you!
15/07/2024

Let your vastu as perfect as you!

09/07/2024

वास्तु लेखनमाला 4

माझ्या मागील लेखा मध्ये आपण वास्तुचे प्रायमरी घटक पाहिले,त्यात एंट्रन्स,लिविंग रूम,बेडरूम ,किचन ह्यांचा उल्लेख आपण प्रायमरी घटक म्हणून केला होता,त्यात एंट्रन्स बद्दल मी थोडक्यात माहिती दिली होती,आता ह्या लेखात आपण लिविंग रूम म्हणजे हॉल ह्या वर बोलू.

लिविंग रूम किंवा हॉल ज्याला आपण म्हणतो,ती जागा म्हणजे संपूर्ण परिवाराने एकत्र वेळ घालवावा म्हणजेच quality time ज्याला आपण म्हणतो ती जागा,ह्याशिवाय पाहुण्यांची उठ बस,dining area, स्टडी टेबल्स ह्यांची जागा,..

ह्या सगळ्या क्षणांचा संबंध आनंदाशी आहे,समाधानाशी आहे,म्हणून लिविंग रूमची रचना ही मोकळी असावी,हवा खेळती असावी,ऊर्जेचा स्रोत तिथे भरपूर असावा अस सांगितलं आहे. आता लिविंग रूम हे एंट्रन्स ला जोडून च असत,.त्यामुळे एंट्रन्स जर नेगेटिव्ह असेल तर लिविंग रूम सुद्धा नेगेटिव्ह च होत,कारण ज्या घटकावर एंट्रन्स ची गुणवत्ता ठरवलेली आहे,त्याच घटकावर लिविंग रूम ची गुणवत्ता ही ठरलेली असते,त्यामुळे जर एंट्रन्स नेगेटिव्ह असला किंवा त्याचा दर्जा थोडा कमी असला तर लिविंग रूम चा दर्जा ही कमी होतो,ultimately,.. प्रायमरी घटकांपैकी 2 घटक नेगेटिव्ह होतात.
म्हणूनच एंट्रन्स हा पहिला आणि महत्वाचा घटक मानला जातो.

पुढच्या लेखात आपण किचन च महत्व जाणून घेऊ.

नवीन घर घेत असाल तर तुमच्या फ्लोअर प्लॅन ची प्रत नक्की पाठवा,

Call For Guidance
Vastu Consultant
Shalaka Apte

12/04/2024

वास्तु लेखनमाला लेख -3

नमस्कार!

माझ्या मागील लेखात आपण नवीन घर घेताना वास्तु का कराव? त्याचं नेमकं महत्व काय ? आपण हे पाहिलं,..त्या लेखात मी घरातल्या काही फॅक्टर्स चा उल्लेख केला होता ,.ते फॅक्टर्स म्हणजे प्रामुख्याने एंट्रन्स,लिविंग रूम,किचेन,वॉशरूम,बेडरूम.
ह्यांना आपण Primary Factors म्हणूया.
Secondary factors म्हणजे घरातील इतर गोष्टीची जागा, म्हणजेच स्टडी टेबल,वॉशिंग मशीन,शेगडी,मिक्सर,मेडिटेशन व्यायाम करण्याची जागा,हेल्थ कॉर्नर वैगैर.

तर वास्तु करण्या आधी सर्व साधारण घरात ह्या factors ची जागा ही त्या घराची कमी अधिक गुणवत्ता ठरवत...कस? तर आपण एक एक फॅक्टर्स च उदाहरणं घेऊन समजून घेऊ.

Primary Factors
एंट्रन्स:-
एंट्रन्स म्हणजे घराच प्रवेश द्वार.
म्हणजेच आवक- जावक ठरवणार घटक.
काय येणार,किती येणार आणि कस येणार हे घराच्या प्रवेश द्वारा वर अवलंबून आहे,.प्रत्येक दिशेतील प्रवेश द्वार हे त्या दिशे प्रमाणे कमी अधिक परिणाम देत असत म्हणून प्रवेश द्वार हे घरातील प्रमुख घटका पैकी एक आहे. साधारण पूर्व,ईशान्य,उत्तरे च प्रवेश द्वार शुभ मानलं जात. शुभ म्हणजे ह्या द्वारातून येणारी आवक ही चांगली असते,चांगल्या मार्गाने आलेली असते,इथे अपत्य चांगली घडतात,शिक्षण चांगल होत,एकंदरीत घराची ऊर्जा चांगली राहते,अश्या प्रकारे मूळ दिशा आणि उपदिशा ह्या मध्ये येणारे प्रवेश द्वार आणि त्यांचे वेगवेगळे प्रभाव ही असतात. त्यावर त्यांची गुणवत्ता ठरवली जाते.

प्रवेश द्वार आणि त्याची गुणवत्ता वेगवेगळ्या पद्धतीने दर्शवता येते. प्रवेश द्वार कुठे आहे,कोणत्या दिशेत आहे,हे पाहण्याची पद्धत वेगळी आहे,तेव्हा नुसताच अंदाज बांधून पूर्वे कडे,किंवा पश्चिमेकडे आहे असा समज करून घेऊ नये.पूर्व आणि पश्चिम ह्या पूर्ण विरुद्ध दिशा आहेत हे ध्यानात घ्यावे.
( बरेच लोक मला फोन वरच विचारतात की आमचं दार हे पूर्वे- पश्चिम आहे तेव्हा पूर्वे ला की पश्चिमेला असा प्रश्न विचारल्यास त्यांना सांगता येत नाही)

टिप:- कुठल्याही शास्त्राची अपुरी माहिती ही धोकादायकच,त्यामुळे वर वरच्या वाचनाने कुठल्याही निष्कर्षावर येऊ नये.माहिती हवी असल्यास तज्ञांना बोलवून त्यांच मत घ्यावे.

पुढील लेखात आपण पाहू लिविंग रूम ची माहिती.

वास्तु कन्सल्टट आणि रेकी मास्टर
शलाका आपटे.

15/03/2024

नवीन घर घेताना वास्तु का पाहावं?
लेखनमाला-2

माझ्या मागच्या लेखात ह्यावर थोडक्यात विचार मांडले होते, आता थोड पुढे जाऊया.
तर नवीन वास्तू बघताना सर्वसाधारणपणे आपण आपल्या प्राथमिक गरजा बघतो,म्हणजे लोकेशन,हवा,पाणी,उजेड,पार्किंग साठी जागा, लोन च्या दृष्टीने कागद पत्र,वैगैरे वैगैरे,..पण ह्या झाल्या आपल्या प्रॅक्टिकल गरजा.
आपण पाहतो ती एक जागा,पण त्या जागेला आपण आपलं घर म्हणून पाहत असू किंवा त्या घराच वास्तू मध्ये रूपांतर करायचं असेल तर फक्त हवा,पाणी,उजेड एवढच गरजेचं नाही,..ती एक परिपूर्ण वास्तू व्हावी ह्यासाठी महत्वाचे असतात ते काही factors.. म्हणजेच( सगळ्यांना कळेल म्हणून english terms वापरते) entrance, घराची SW आणि SE पोसिशन,सेन्टर पॉईंट,fire position,... हे आणि असे अनेक factors,ह्याच बरोबर एक घर म्हणून तिथे होणाऱ्या रोजच्या ऍक्टिव्हिटी,म्हणजेच वॉशिंग मशीन ची position,स्टडी टेबल,.मेडिटेशन,health corner,.. ह्या आणि अश्या बऱ्याच गोष्टी एका घराचा वास्तू म्हणून अभ्यास करताना विचार केला जातो आणि त्या प्रमाणे घराच इंटिरियर प्लॅन करण सोप्प जात.

आता ह्या प्रत्येक factors चा उपयोग किंवा खरोखर ह्याच महत्व वैगैरे आहे का? तर हे आपण पुढच्या लेखात पाहू,.

तूर्तास नवीन घर घेताना वास्तू का कराव हे आता लक्षात आल असेलच..

तर तुम्ही जर नवीन वास्तू घ्यायचा विचार करत असाल तर घर पाहताना जे प्रोजेक्ट किंवा फ्लोअर प्लॅन दिला जातो तो तुम्ही मला पाठवू शकता.

घर तयार असेल तर त्यातल्या त्यात उत्तम घर निवडून देण्यासाठी आपण वास्तू अभ्यास करून ते तुम्हाला सुचवू शकतो.

संपर्क:
वास्तू कन्सलटंट
शलाका आपटे
7506110588

13/02/2024

नवीन घर घेताना वास्तु का पाहावं?
मुळात वास्तु म्हणजे काय?
त्याने असा विशेष काय फरक पडतो ?
तर ह्या आणि अश्या बऱ्याच प्रश्नाची उत्तर मी इथे द्यायचा प्रयत्न करते,तर सुरुआत करताना वास्तु म्हणजे मुळात काय हे मी थोडक्यात सांगते.
" वास्तु" चा उल्लेख करताना मी नेहमीच पाठीचा कणा ह्याची उपमा देते,म्हणजेच पाठीच्या कण्यासारखा स्ट्रॉंग सपोर्टर म्हणजे आपली वास्तु,आता मला सांगा,जर पाठीचा कणाच थोडा कमजोर झाला किंवा त्याला दुखापत झाली तर आपल्याला उभ राहता येईल का? तर नाही,..अश्या वेळी आपले हात पाय,आपले बाकी ऑरगॅन्स कितीही चांगले असले तरी आपण पाठीच्या कण्या शिवाय नीट सर्व्हाईव्ह करूच शकत नाही,..
"वास्तु" सुद्धा अगदी तसचं आहे,
आणि वास्तु चा रोल सुद्धा आपल्या आयुष्यात तसाचं आहे..
It works as a strong supporter for entire family..
आपण बाकी अध्यात्मिक रित्या काय काय करतो,किंवा कर्म वैगैरे हे आहेच,पण जर वास्तु चांगली असेल तर कितीही चढ उतार आले तरी ते सुसह्य होतात.
म्हणूनच अगदी फार खोलात शिरायचं नसेल तरी थोडक्यात वास्तु चा आधार घेऊन घर निवडलं तर काय हरकत आहे,lifetime investment करत असतोच आपण मग आपल्या life चाच घर हा एक भाग आहे..तेव्हा घराच वास्तु हे व्हायलाच हव ना? 😊
आणि जर घर नवीन घेताय तर वास्तु प्रमाणे निवडूनच घ्या..म्हणजे अजून सोप्प होईल , नाही का?

अजून काही प्रश्ना सह भेटूया पुढील लेखात...

Vastu consultant and reiki master
Mrs Shalaka Apte

Every Home is incomplete without vastu.Let's convert your home into Vastu.यथा वास्तू तथा सुखं!
12/12/2022

Every Home is incomplete without vastu.
Let's convert your home into Vastu.

यथा वास्तू तथा सुखं!

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sadhgruham Vastu Consultant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category