12/10/2024
आज देव देवाघरी गेला....
आज देव देवाघरी गेला....
किती दिले त्यांनी सगळ्यांना
पण जरासुद्धा माज नाही केला
आज देव देवाघरी गेला....
एवढं कमावलं, वाढवलं
पण भोगलं नाही, फक्त देत गेला
आज देव देवाघरी गेला....
स्वतः पेक्षा देश मोठा, मानत राहिला
त्या करता झटत राहिला
तो देव आज देवाघरी गेला....
आल्या बऱ्याच अडचणी
शांत राहिला, संय्यमी राहिला...
तो देव आज देवाघरी गेला....
मोह, माया, द्वेष, मत्सर
कायम ह्यांच्या पल्ल्याड राहिला
तो देव आज देवाघरी गेला....
फाटकी त्याची झोळी, खरा फकीरच तो...
जेवढं जमलं सांडत गेला...
तो देव आज देवाघरी गेला....
आज कदाचित देवालाही
मनापासून नमस्कार करावासा वाटेल असा देवमाणूस हरपला....
तो देव आज देवाघरी गेला....
उठल्यापासून झोपेपर्यंत आपले जीवन सुखी करून गेला... भारताला आत्मनिर्भर करून गेला...
तो देव आज देवाघरी गेला...
आज देव देवाघरी गेला....
आज देव देवाघरी गेला....
रतन टाटा यांना भांवपुर्ण श्रंध्दाजली
🙏🙏🌹🌹🙏🙏