09/09/2020
अभिनंदन अभिमान वाटतो जेव्हा अलिबागकर जगात ओळखला जातो सलाम तुझ्या मेहनतीला.
एखादा रेल्वे अपघात घडला की मोठ्या प्रमाणात जीवितहानी, जैविक हानी, आर्थिक नुकसान होत असते. हे सर्व टाळण्यासाठी अलिबागच्या हर्षल मंगेश जुईकर या विद्यार्थ्याने आर्टिफिशल इंटलेजिन्स रेल्वे प्रोजेक्ट मॉडेल तयार केले आहे. लोकल, मेल या मल्टिपल रेल्वेट्रकवर विनाचालक धावणाऱ्या रेल्वेसाठी हे मॉडेल विकसित केले आहे. हर्षलने बनविलेले जगातील पहिलेच मॉडेल आहे. त्याचे हे मॉडेल बघून गुगलने फेलोशिप दिली असून केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयानेही त्याच्या या मॉडेलची दखल घेतली आहे. हर्षलच्या या प्रोजेक्टने अलिबागसह देशाचे नाव जगाच्या नकाशावर उंचावणार आहे.
हर्षल जुईकर हा अलिबागमधील जेएसएम कॉलेजच्या कम्प्युटर सायन्सच्या दुसऱ्या वर्गात शिकत आहे. पाहिल्यापासून त्याला कम्प्युटर विषयात रुची आहे. कम्प्युटरच्या माध्यमातून त्याने अनेक प्रोजेक्ट तयार केले आहेत. युनिव्हर्सिटीच्या प्रकल्पात त्याने आर्टिफिशल इंटेलिजन्स रेल्वे प्रोजेक्ट मॉडेल आपल्या मित्राच्या सोबतीने बनविला होता. त्याला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले होते. या त्याच्या मॉडेल साठी प्राचार्य अनिल पाटील, आयटी विभागप्रमुख सुरेंद्र दातार, शिक्षक सत्यजित तुळपुळे, सचिन भोस्तेकर, अवंती जोगळेकर, चैताली चौधरी यांनी सहकार्य केले होते.
आर्टिफिशल इंटेलिजन्स रेल्वे मॉडेल बनविण्यासाठी त्याने चर्चगेट येथे जाऊन मोटरमन, स्टेशन मास्टर, टीसी, रेल्वे कंट्रोल रूममध्ये जाऊन माहिती गोळा केली. त्यानंतर इटली येथून सेन्सर मागवून स्वतःचे मॉडेल तयार केले. गुगल फेलोशॉपी परीक्षेसाठी हर्षलने आपले मॉडेल पाठविले होते. तीन लाखमधून 47 हजार प्रकल्पाची गुगलने निवडले. 47 हजारतून फक्त नऊ प्रकल्प निवडले त्यात हर्षलचा प्रकल्प निवडला. हर्षलचा गुगल परीक्षेत देशातून दुसरा नंबर आला आहे. गुगलकडून हर्षलची तीन तास इंटरव्ह्यूव घेण्यात आला