31/05/2026
साई एलिट इमारत क्र. १५५, कन्नमवार नगर – भव्य भूमिपूजन सोहळा
कन्नमवार नगर येथील साई एलिट इमारत क्र. १५५ चा भव्य भूमिपूजन सोहळा बिल्डर हिमांशू वैषाली मंगेश सांगळे यांच्या पुढाकाराने उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या मंगल प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कॅबिनेट मंत्री श्री. आशीष शेलार, आमदार श्री. सुनील राऊत, माजी महापौर श्री. दत्ता दळवी, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस (कस्टम्स) कमिशनर श्री. मनोज दास, कॅप्टन दिलीप कोपीकर, श्री. विनय राऊत, श्री. दीपक दळवी, सौ. केतकी सांगळे, तसेच अभिनेते प्रणव रावराणे आणि अभिनेत्री कांचन पगारे उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी विधिवत भूमिपूजन करून प्रकल्पाच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले. कन्नमवार नगर परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ मंडळी आणि रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
साई एलिट यांचा "ईस्टर्न बे" हा प्रकल्प परिसराच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा विश्वास सर्व मान्यवरांनी व्यक्त केला. प्रकल्पाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
🙏 सांगळे परिवार 🙏✨