24/05/2021
BLOG #1 -
मानवाच्या आयुष्यात निवासाच्या गरजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अन्न-वस्त्र ह्या गरजा काही वेळेला भागू शकतात; परंतु निवाऱ्याचं मात्र तसं नाही. डोईवर छप्पर असावं म्हणून आयुष्यभर आटापिटा केल्यानंतर तर स्वप्नवत असणारं हक्काचे घर हातात येऊ शकतं. तथापि या संघर्षांत माणसान बरंच काही गमावलेलं असण्याची शक्यता असते. हौसेमौजेला मुरड घालून, आवडीनिवडींवर र्निबंध घालून, घर घेण्यासाठी काडी काडी जमवून शेवटी कुठे घराच्या चाव्या हातात पडतात. कुणाला हे घर चटकन लाभतं तर कुणाला आयुष्याच्या अगदी उत्तरार्धात नवीन घरात जाण्याचा योग येतो. काही असो पण घर किंवा स्वतःच्या हक्काचा मालकीचा जमिनीचा तुकडा असणं हे गोड स्वप्न आहे. सामान्य माणसापासून ते अगदी श्रीमंत व्यक्तीचे स्वप्न असते की स्वतःच छोटंसं का होईना पण घर असावं. एक छोटासा हक्काचा जमिनीचा तुकडा तुम्हाला तुमच्या भविष्यात नक्कीच मदतीचा ठरतो. ही मदत म्हणजे नेमकी काय? तर या मदतीला म्हणतात गुंतवणूक...! ही स्वतःच शिकायची असते.
सोने, चांदी, ट्रेडिंग यामध्ये होणारी गुंतवणूक फायद्याची आहेच पण जमीन किंवा घर ही गुंतवणूक पिढ्यानपिढ्या असते.
पण गेल्या वर्षीपासून सामान्य आणि श्रीमंत व्यक्ती फक्त जीव वाचवण्यासाठी धडपडतो आहे. कोविड19 महामारीमुळे अनेकांची स्वप्न धुळीस मिळाली. अनेकांनी भविष्याचे केलेले planning विस्कटले. पण संकटात हतबल न होता संकटाशी सामना करणारे लढवय्ये आपण आहोत म्हणूनच या संकटातही सामान्य माणसाचा विचार करणारे, त्यांच्या भविष्याची काळजी घेणारे कुशल जमीन व्यवसायिक,तुमची काळजी घेत आहेत, तुमच्या सोबत आहेत. तुम्हाला योग्य दरात जमीन मिळेल यासाठी नवनवीन योजना देत आहेत.
कोरोनाच्या महामारी ने घर काय असत? याची जाणीव करून दिली आहे. कित्येक मैलांचा प्रवास करणारे मजदूर, रोजंदारीवर काम करणारी माणसे ,त्यांच्या कुटुंबानी आपल्यासारख्या सामान्यापासून ते श्रीमंत व्यक्तीला घर नसल्याचे वास्तव किती भयंकर असते हे दाखवून दिले.
कदाचित आतापर्यंत ज्यांनी भविष्यातील गुंतवणूक ही बाब काळजीने घेतली नसेल ते आता तरी नक्कीच घेतील.
भूसंपत्ती हा विषय बारकाईने अभ्यास करण्याचा विषय आहे. कारण गुंतवणूक ही भविष्यात मिळणारा मोठा आधार आहे. जे आपणच स्वतःला देत असतो. हीच गुंतवणूक आणि स्वतःच घर ,जमीन घेण्यासाठी सदैव कार्यरत आहे तुमच्या हक्काचे सोबती लँड प्रोफेशनल@ महाप्रॉपर्टी ...! महाप्रॉपर्टी तुम्हाला तुमच्या हक्काची जमीन घेण्यास मदत करेल, तुमच्या प्रश्नांचे निरसन करेल आणि तुमच्या भविष्याचीही काळजी घेईल. चला तर घराचं ,जमिनीचं स्वप्न पूर्ण करूया महाप्रॉपर्टी सॊबत...!
पण प्रथमतः व्यक्तीने गुंतवणूक कशी करावी आणि त्यासंबंधी बाबतचे मुद्दे जाणून घेऊया पुढल्या ब्लॉग मध्ये.
लेखिका
आभा अभिजीत मुळे
प्रस्तुत
Maha Property
Visit - www.mahaproperty.in