19/07/2026
थिलोरी (ता. दर्यापूर, जि. अमरावती), दि. 17 जुलै 2026
दिव्यांग जनसंवाद फाउंडेशन, भारत यांच्या वतीने "दिव्यांग जनसंवाद – आपल्या समस्या, आपला संवाद, आपले समाधान" या विशेष उपक्रमाचे आयोजन दि. 17 जुलै 2026 रोजी सायंकाळी 4.00 ते 6.00 या वेळेत विठ्ठल मंदिर, मु. पो. थिलोरी, ता. दर्यापूर, जि. अमरावती येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश दिव्यांग बांधवांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील विविध समस्या, शासकीय योजना, दिव्यांग प्रमाणपत्र, यूडीआयडी कार्ड, पेन्शन, शिक्षण, रोजगार, आरोग्य, प्रवास सवलत, स्वावलंबन, कायदेशीर हक्क तसेच इतर विविध विषयांबाबत योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा होता.
कार्यक्रमामध्ये उपस्थित दिव्यांग बांधवांनी आपल्या समस्या थेट मांडल्या. त्यावर संबंधित विषयांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, प्रमाणपत्रे व विविध शासकीय सेवांबाबत सखोल माहिती देण्यात आली. यामुळे उपस्थितांमध्ये आपल्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण झाली.
या कार्यक्रमासाठी मा. अमोल देवाजी वाळके (राष्ट्रीय अध्यक्ष, दिव्यांग जनसंवाद फाउंडेशन, भारत) यांनी मार्गदर्शन करून दिव्यांग बांधवांनी संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी पुढाकार घ्यावा, स्वावलंबी बनावे आणि शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी पूर्वी चौरसिया (विभागीय अध्यक्ष, अमरावती विभाग), मा. मोहम्मद मुझम्मिल अब्दुल बशीर (विभागीय उपाध्यक्ष, अमरावती विभाग) तसेच गोकुळ सुरपाटणे (अध्यक्ष – थिलोरी) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमात मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव, पालक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले. उपस्थितांनी अशा प्रकारचे जनसंवाद कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले आणि "संवाद आज... समृद्ध उद्या" तसेच "हक्कांसाठी संघर्ष – सन्मानासाठी संवाद" या घोषवाक्यांसह सक्षम, स्वाभिमानी आणि सशक्त दिव्यांग समाज घडविण्याचा संकल्प करण्यात आला
#दिव्यांगजनसंवाद #दिव्यांगजनसंवादफाउंडेशन #दिव्यांग #शासकीययोजना #सामाजिकन्याय Ammol D Walkke Devendra Fadnavis Nitin Nabin Nitin Gadkari Atul Save Mohan Mate Sandip Joshi Ravindra Chavan Chandrashekhar Bawankule Narendra Modi