28/03/2020
LOCKDOWN DAY4
माननीय श्री पंतप्रधान यांनी 22 मार्च ला जाहीर केलेल्या 21 दिवसांचा लॉकडाऊन ला आपण पूर्णता समर्थन करुया. विषाणुं पसरू नये त्यासाठी हा संसर्ग टाळण्यासाठी योग्य ती सर्व काळजी घेऊया.
कोरोना मुक्तीचा संकल्प - आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडू अन्यथा कुठल्याही परिस्थितीत बाहेर पडायचे नाही. सुरक्षेचे नियम पाळूया, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून आरोग्याची काळजी घेऊया… चला, आपण संकल्प करूया की आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण स्वत: संक्रमीत होण्यापासून वाचूया आणि इतरांनाही वाचवूया.
ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये याची दक्षता घेउ. या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्नशील सरकारला सर्व मदत करू असे एक वचन घेउन उरलेले दिवस संयम ठेऊन आपल्या परिवार सोबत घरी राहु.