Gangavillage Co-op Housing Society LTD.

Gangavillage Co-op Housing Society LTD. Its a housing society in Hadapsar, Pune

02/08/2026

नमस्कार 🙏

*MRF नक्की आहे काय??*

*Major Repair Fund* की
*Major Repair Fraud*

हा व्हिडिओ नक्की पहा/ ऐका आणि सर्वांना पाठवा.

धन्यवाद 🙏
सत्यमेव जयते ⛱️

खरतर हौसिंग सोसायटीची निवडणूक वादात जायची तशी काहीच गरज नाही पण मग जिथे बेईमानी आली तिथे त्या बेईमानी आणि  अन्यायाविरुद्...
14/07/2026

खरतर हौसिंग सोसायटीची निवडणूक वादात जायची तशी काहीच गरज नाही पण मग जिथे बेईमानी आली तिथे त्या बेईमानी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठविणेही गरजेजे ठरते कारण त्या बेईमान लोकांना कायदेशीर प्रक्रिया नको असते!

सोसायटीतला एक जागरूक सभासद जेव्हा कायेदेशीर निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा आग्रह करतो तेथे जसे काही बेईमान आसतात तसेच काही घटक अन्याय झालेल्या लोकांना आपला मदतीचा हात पुढे करतात आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यात मोलाचे सहाय्य करतात.

धन्यवाद दै. सकाळ 🙏🙏🙏

Babasaheb Patil
Chetan Vitthal Tupe
Yogesh Tilekar
Digambar Hausare

सहकारी ग्रहरचना संस्थेची संचालक मंडळाची पंच वार्षिक निवडणूक  ही खरतर सभासधांच्या हक्काची आणि लोकशाही मार्गानी संचालक मंड...
12/07/2026

सहकारी ग्रहरचना संस्थेची संचालक मंडळाची पंच वार्षिक निवडणूक ही खरतर सभासधांच्या हक्काची आणि लोकशाही मार्गानी संचालक मंडळ निवडून संस्थेचे भवितव्य ठरविणारी एक अतिशय महत्त्वाची प्रक्रिया पण…

वाईट हेतूने, पैसे खाण्याचा एक मार्ग म्हणून याकडे पाहणाऱ्या नालायक लोकांना ती निवडणूक कायदेशीर रित्या होऊ नये म्हणजे आपला धूर्त हेतू साध्य करता येईल यासाठी सहकारातील काही भ्रष्ट प्रवृत्तीची लोक पकडून त्यांच्या मार्फत निवडणूक नियमावली पायदळी तुडवून गडबडीत निवडणूक उरकायची असते.

असाच प्रकार आमच्याही सोसायटीत चालू आहे, निवडणुकीची घाई का केली जात आहे हे न कळण्याइतके दुधखुळे सभासद आमच्याकडे नाहीत त्यामुळे आशा प्रवृत्तीच्या लोकांविरोधात आमची कायदेशीर मार्गाने चालू असलेली लढाई अखंडीतपणे चालूच राहील.💪

आमच्या याच कायदेशीर लढाईची दै. लोकमत ने आज दाखल घेतली, धन्यवाद दै. लोकमत.🙏🙏🙏

Babasaheb Patil
Chetan Vitthal Tupe
Yogesh Tilekar
Digambar Hausare

20/06/2026

“पेरलं ते उगवत” म्हणतात ते अस:

गंगाव्हिलेज चे तत्कालीन चेअरमन श्री कबीर भाई शेख आणि सेक्रेटरी श्री पोपटराव वाडकर, त्यांचे सहकारी श्री गणेश भाऊ वाडकर, श्री विकास भुजबळ, श्री बिजली साहेब आणि त्यावेळचे संचालक मंडळ यांनी आपली संस्थेप्रती असलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली, संस्थेचा ७/१२ संस्थेच्या नावे होण्यासाठी सर्व कागद पत्रांची पूर्तता केली आणि आज अनेक वर्षांनंतर जेव्हा शासन निर्णयाने ७/१२ संस्थेच्या नावे झाला तेव्हा त्यावार संस्थेच्या वतीने काम पाहिल्याबद्दल त्यांची नावे ७/१२ वर छापून आली! ही त्यांनी केलेल्या त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची पोहचपावतीच आहे.

तोच आनंद साजरा करताना आमची सध्याची टीम…

12/06/2026

आपण ज्या जागेवर राहतो ती जागा आता सामूहिकपणे आपल्या सर्वांच्या मालकीची झाली त्याबद्दल गंगव्हिलेज च्या सर्व सभासदांचे हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉

पोपट वाडकर साहेब आणि अॅड. कबीर शेख साहेब यांनी कसलाही गाजावाजा न करता सोसायटीच्या प्रति असलेली आपली जबाबदारी चोख पार पाडल्याबद्दल त्यांचे खूप आभार आणि अभिनंदन 💐💐💐🎉🎉🎉

रोहिदास उर्फ नाना सायकर यांनी तलाठी कार्यालयाशी सतत संपर्क ठेवून सलग २ वर्ष पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार 🙏💐💐

गंगाव्हिलेज को ऑफ हौसिंग सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त झाले, चेअरमन, सेक्रेटरी आणि खजिनदार यांची हकालपट्टी….
24/05/2026

गंगाव्हिलेज को ऑफ हौसिंग सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त झाले, चेअरमन, सेक्रेटरी आणि खजिनदार यांची हकालपट्टी….

03/06/2025

भावानी काहीतरी मोठ्ठा लोचा केलाय…

आमच्या कॉर्पोरेट सेक्टर मधे एखाद्या एम्प्लॉयीनी काही फ्रॉड केला आहे का हे ओळखण्यासाठी Behavioral Red Flag नावाचे प्रशिक्षण मॅनेजर लोकांना दिले जाते, यामध्ये एम्प्लॉयी च्या राहनिमानात थोड्या काळात झालेल्या बदलाचे निरीक्षण करून त्याचा अंदाज घ्यायचा असतो. या निरीक्षणामध्ये जर एखाद्या एम्प्लॉयी नी आचानक महागडे कपडे, घड्याळे, महागडे बूट, महागड्या सहली, नवीन गाडी, नवीन घर, नवीन दागिने, ऑफिस मध्ये जास्त वेळ थांबणे, सुट्याच न घेणे किवा जास्त सुट्या घेणे असे काही आचानक दिसायला लागले की त्याला मॅनेजर आणि HR आपल्या रडार वर घेतात आणि तिथून पुढे सुरू होते चौकशी! या चौकशी मधे त्या एम्प्लॉयी ने मागच्या काही महिन्यात ऑफिस च्या कामाशी संधारबात जे जे निर्णय घेतलेत ते सीक्रेटली बारकाईने तज्ञांची मदत घेऊन तपासले जातात कारण संशय असतो की भावाने काहीतरी मोठ्ठा लोचा केलाय मग काही आठवड्यांच्या/महिंन्यानच्या चौकशी नंतर कळते की नक्की भावाने लोच्या काय केलाय. याचे कारण हे असते की कोणाच्याही राहनिमानात आचानक कधीही बदल होत नसतो, ती एक हळुवार पणे चालणारी प्रक्रिया आहे.

मला वाटते कॉर्पोरेट सेक्टर मधील ही पद्धत सहकारी संस्थेत काम करणाऱ्या पधाधिकाऱ्यांसाठी सुद्धा फार गरजेची आहे, कारण एखाद्या पदाधिकाऱ्यामध्ये जर आचानक काही मोठ्ठे बदल झाले असतील आणि कागद पत्रांची लपवाझपवी चालली असेल तर वोळखावे की भावाने काहीतरी मोठ्ठा लोच्या केलाय याठिकणी कॉर्पोरेट मध्ये पुरावे शोधणे सोप्पे असते कारण ते कंपनीच्या हातात आसतात मात्र सहकारात भावाच पदाधिकारी असल्यामुळे तो पुरावे दाबून ठेवतो, लपवतो, तो ते दाखवण्याची प्रक्रिया अवघड करतो. मग यावर मार्ग काय? आपण जागरुक असले पाहिजे, भावाच्या गोड बोलण्यावर विश्वास न ठेवता बरकायीने निरीक्षण केले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणचे सत्ता कोणा एकाच्या हातात कधीही दिली नाही पाहिजे कारण कारण एकहाती सत्ता चांगल्या माणसालाही भ्रष्ट बनवते.

सहकारातल्या पदाधिकाऱ्यांनी या चार ओळी सतत गुणगुणल्या पाहिजेत-

नको आम्हाला उंच माडी,
नको आम्हाला लांब गाडी,
नको आंम्हाला हीरे जवारात रजवाडी,
जनाची नाहीतर किमान मनाची तरी लाज ठेऊ थोडी,
आणि कारभारात लावू पारदर्शकतेची गोडी.

धन्यवाद,

मोहन मोरे
संचालक, गंगाव्हिलेज

Address

Gangavillage, Handewadi Road, Hadapsar
Pune
411028

Telephone

+919922759071

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gangavillage Co-op Housing Society LTD. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Gangavillage Co-op Housing Society LTD.:

Shortcuts

Share