28/04/2023
दोन दिवसीय भव्य वरद प्रॉपर्टी फेस्टिवल ला उस्फूर्त प्रतिसाद.
वरद प्रॉपर्टी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड तर्फे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील व दिग्गजांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचा महासंकल्प, पुणे रिअल इस्टेट काँक्लेव" परिसंवादाने महोत्सवाचा समारोप
पुणे -वरद प्रॉपर्टी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड तर्फे पुण्यातील पंडित फार्म व बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड येथे दोन दिवसीय वरद प्रॉपर्टी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूडच्या माजी आमदार व भाजप राष्ट्रिय महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते पंडित फार्म येथे फेस्टिवल चे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी वरद प्रॉपर्टी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक व वरद प्रॉपर्टी फेस्टिव्हलचे आयोजक महेश कुंटे, अपर्णा कुंटे, विजय कुंटे उपस्थित होते. हा महोत्सव म्हणजे पुण्यात फ्लॅट अथवा जमीन खरेदी करण्यास इच्छूक ग्राहकांसाठी एक पर्वणी ठरला. २०० पेक्षा जास्त रेसिडेन्सीयल व कमर्शियल प्रोजेक्ट या वरद प्रॉपर्टी फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले होते.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी प्रदर्शनास भेट देऊन सहभागी झालेल्या व्यावसायिकांशी संवाद साधला. महोत्सवाचा समारोप 'महाराष्ट्राचा महासंकल्प, पुणे रिअल इस्टेट काँक्लेव" या परिसंवादाने करण्यात आला. वेगाने विस्तारणाऱ्या पुणे जिल्हयाच्या सर्वांगीण प्रगतीत गृहनिर्माण क्षेत्राचे योगदान मोठे आहे. त्यामुळेच गृहनिर्माण क्षेत्राची पुढील वाटचाल, आव्हानं, दिशा, पुणेकर नागरिकांची सुरक्षितता, आरोग्य, वाहतूक व्यवस्था, कचरा समस्या, प्रदूषण, पुणे शहर विकास, भावी विकास प्रकल्प अशा विविध विषयांवर दिलखुलास चर्चा करण्यात आली. या चर्चेमधे महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार महेश लांडगे, आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी आमदार व भाजप राष्ट्रिय महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेवक वसंत मोरे, नरेडको माहि व्यवस्थापकीय संचालक, एमएसपीएल ग्रुप च्या उपाध्यक्षा, स्मिता पाटील, ख्यातनाम वकील आणि सामाजिक कार्यकर्ते ॲड. मकरंद आडकर, पिनाक कन्सल्टिंग प्रा. लि. चे संचालक दिनेश वसंत चंद्रात्रे आणि वरद प्रॉपर्टी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक व आयोजक महेश कुंटे सहभागी झाले होते.