06/12/2021
मालक शंकरमहाराज कृपाप्रसादाने या वास्तूमध्ये चैतन्य, सुख, शांती आणि समृद्धी वसावी, या वास्तूमधील व्यक्तींना उत्तम आरोग्य लाभावे, या वास्तुत निवास असणाऱ्या सर्वांना सर्वच स्तरावर आणि सर्वच पातळीवर यश मिळावे, ते कधीही अपयशी होऊ नयेत, या वास्तुत सदैव सकारात्मकता असावी, त्या सकारात्मकेने या वास्तुची सदैव भरभराट व्हावी.. या वास्तुतील सदस्यांचे नातेसंबंध सदैव घट्ट आणि टिकून राहावेत.. आणि या सगळयाचा एकत्रित दिसणारा परिणाम म्हणून वास्तूमध्ये आनंदाचे आणि हर्षोल्लासाचे वातावरण असावे.. म्हणून आम्हाला म्हणजे गृह निर्माण संबधित लोकांना जे काही दृश्य, अदृश्य, तंत्र, मंत्र, साधना कराव्या लागतात त्याला म्हणतात वास्तूशास्त्र..
कृपया तंत्र मंत्र साधनेचा अर्थ कुणी केवळ धार्मिक विधी असा घेऊ नये.. तो ही एक भाग आहेच त्या व्यतिरिक्त उत्तम अस इंजिनीरिंगच तंत्र, उत्तम आर्क्टिटेक्चरल तंत्र, त्यातल्या साधना, सनातनी वैदिक गृह रचना तंत्र, वास्तू शास्त्र त्यातील वेगवेगळे विषय तज्ञ त्यांचे सारसारविवेकी अनव्यार्थ अश्या सगळ्यांचा सारासारविवेकी विचार करून मग त्यानुसार आचरण करावं लागतं...मोठा आवाका असतो.
बघा, अखिल मानव समूह हा आपला बहुतांशी वेळ हा ‘घरी’ घालवत असतो. स्वाभाविक आहे वास्तूतील उर्जेच्या सुयोग्य असण्याचा दृश्य अदृश्य परिणाम आपल्यावर होत असतो त्या मुळे त्या घरात ऊर्जेचा योग्य तो ताळमेळ घालण्यावर लक्ष केंद्रित करण गरजेचं असतंय जेणेकरून आपण आणि आपले कुटुंब प्रगतिशील आणि समृद्ध जीवन जगू शकू..
असो, मालक शंकरमहाराज कृपाप्रसादाने या वास्तूमध्ये चैतन्य, सुख, शांती आणि समृद्धी वसावी, वास्तूमधील व्यक्तींना उत्तम आरोग्य लाभावे, या वास्तुत निवास असणाऱ्या सर्वांना सर्वच स्तरावर आणि सर्वच पातळीवर यश मिळावे, ते कधीही अपयशी होऊ नयेत, या वास्तुत सदैव सकारात्मकता असावी, त्या सकारात्मकेने या वास्तुची सदैव भरभराट व्हावी.. या वास्तुतील सदस्यांचे नातेसंबंध सदैव घट्ट आणि टिकून राहावेत.. आणि या सगळयाचा एकत्रित दिसणारा परिणाम म्हणून वास्तूमध्ये आनंदाचे आणि हर्षोल्लासाचे वातावरण असावे.. हीच मालकांच्या चरणी प्रार्थना !!
प्रार्थना सिद्धीस मायबाप मालक समर्थ !! #जयशंकर