29/10/2024
दिवाळी 24 🌱🪔
every magic till its not happened is hailed as foolishness..🌹🌹
*ही दिवाळी टुगेदरनेसवाली !*
"दिवाळी हा सण फक्त नवीन वस्तूंची खरेदी करणे आणि फराळ बनवण्यासाठी नाही, तर आपापसातील भेदभावांच्या भिंती पाडण्यासाठी आणि नात्यांचे पूल बांधण्यासाठी सुद्धा आहे."...
दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी, एकात्मतेचे पूल बांधण्यासाठी सर्वोत्तम सण आहे! आजच्या स्वार्थी राजकारणाच्या काळात, आपल्या समाजामध्ये शाळांमधील प्रवेशापासून ते निवडणुकांपर्यंत सर्वत्र अनेक भिंतींचा प्रभाव आहे. या अदृश्य भिंती जात, धर्म, व्यवसाय, संस्कृती, प्रदेश आणि अशा अनेक गोष्टींनी बनलेल्या आहेत, आणि या भिंतीच समाजातील काही मुठभर लोकांच्या फायद्यासाठी आपल्यात फूट पाडतात आणि दुरावा निर्माण करतात!
मित्रांनो दिवाळीच्या तेजानेच आपल्यातील या भिंती नष्ट होतील . त्यासाठी एक छोटा प्रयत्न म्हणजे फक्त थोडे प्रेम, चांगुलपणावर विश्वास आणि दयाळूपणा दाखवणे आवश्यक आहे. त्यामुळे आज गरज आहे यासाठी पहिले पाऊल उचलण्याची आणि या दिवाळीत आपापसातील ह्या सगळ्या अदृश्य भिंती पाडून नात्यांचे भक्कम पूल बांधण्याची; त्यासाठी ही *दिवाळी टुगेदरनेसवाली* करुयात , खुप शुभेच्छा!!🪔🌱
https://visonoflife.blogspot.com/2024/10/ye-diwali-togethernesswali-2024.html
टीम संजीवनी
www.sanjeevanideve.com
www.junglebelles
Happy Diwali !
Diwali
...!