पुण्यात फ्लॅट बुक करण्याआधी माझ्याशी बोला

  • Home
  • India
  • Pune
  • पुण्यात फ्लॅट बुक करण्याआधी माझ्याशी बोला

पुण्यात फ्लॅट बुक करण्याआधी माझ्याशी बोला मी रवी करंदीकर पुण्यात फ्लॅट बुक करण्?

लहान मुलांना घेऊन सिंहगड चढणारे आईबाबा भेटले की मला आनंद होतो. मुलांच्या करता काबाडकष्ट करण्याचे माझे दिवस संपले याचा आन...
03/02/2024

लहान मुलांना घेऊन सिंहगड चढणारे आईबाबा भेटले की मला आनंद होतो.

मुलांच्या करता काबाडकष्ट करण्याचे माझे दिवस संपले याचा आनंद होतो.

सांसारिक जबाबदाऱ्यांतून मी मुक्त झाल्याचा आनंद होतो.

स्वतः करता जगण्याचं स्वातंत्र्य किती सुखद असतं!

हे स्वातंत्र्य उपभोगायचं.

मुलांच्या संसारात अजिबात लुडबूड करत बसायचं नाही.

आकाशात स्वच्छंद भरारी घ्यायची.

पाळलेल्या पोपटासारखं - परत पिंजऱ्यात जाऊन बसायचं नाही.

या निर्धाराची ते तरुण आईबाबा मला आठवण करून देतात.
#रवीकरंदीकर #सिंहगड #पालक #मुलांचेसंगोपन #संगोपन #संस्कार

*बिल्डरांच्या चांडाळ चौकडीला मान द्या*कुछ तो गडबड है, दया! - हे पोस्ट टाकल्या टाकल्या एक फोन आला. “हे तुम्हाला कोणी सांग...
19/01/2024

*बिल्डरांच्या चांडाळ चौकडीला मान द्या*

कुछ तो गडबड है, दया! - हे पोस्ट टाकल्या टाकल्या एक फोन आला.

“हे तुम्हाला कोणी सांगितलं ते मला माहितेय. करणं ते माझ्या सोसायटीत घडलंय” - फोन करणारा म्हणाला.

“मी अभिमानाने सांगतो की - मीच तो अरेरावी करणारा भ्रष्ट चेअरमन आहे. तो खोटारडा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट माझा साथीदार आहे,” - अशी त्या फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख करून दिली.

“छान! मग आता त्या बिल्डरचेही नांव सांगून टाका आणि त्याच्या बरोबर तुमचं काय साटंलोटं आहे तेही सांगा,” - मी विनंती केली.

“आमची नांव तुम्ही लिहिलं तरी आम्हाला काहीच problem नाहीये! पण जरा society members चा विचार करा - त्यांच्या भोळ्या भाबड्या कोवळ्या मनाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होतील,” - चेअरमन म्हणाले.

“का त्यांना शंका नाहीये?,” - मी विचारले.

“शंका? त्यांना खात्री आहे! ते बोलत नाहीत - कारण ते practical आहेत.

PMC - Project Management Consultant - सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी - आणि बिल्डर यांची भ्रष्ट युती - corrupt nexus असतो - ही आज - आम बात - सर्रास गोष्ट आहे - हे त्यांना माहीत आहे - त्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही - हे त्यांनी आनंदाने स्वीकारले आहे,” - चेअरमन म्हणाले

“का स्वीकारलंय?,” - मी विचारले.

“सांगतो. सविस्तर सांगतो. मधे मधे बोलू नका. माझं नीट लक्ष देऊन ऐका‌,” - असं म्हणून चेअरमननी आपली बाजू मांडायला सुरुवात केली -

आम्हा तिघांची भ्रष्ट युती असते. आम्ही society members ना लुटतो - लुबाडत असतो. याला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत. हे माझ्या सगळ्या सोसायटी मेंबर्सना माहीत आहे.

माझ्याच काय - कोथरूड मधल्याच नाही तर आख्या पुण्यातल्या - सगळ्यांना माहितैय.

कारण हे त्रिकालाबाधित सत्य आहे. काँग्रेसच्या राज्यात ज्यांची जिंदगी गेली त्या सभ्य सुसंस्कृत सुशिक्षित वयस्कर सभासदांच्या भ्रष्टाचार अंगवळणी पडला आहे. त्यात त्यांना काही वावगे वाटत नाही. ‌

त्यांना माहीतीय की बिल्डरगिरी - घरे बांधणे - हा कधीच व्यवसाय नव्हता.

३० - ४० वर्षांपूर्वी - जेंव्हा आपण फ्लॅट घेतला तेंव्हाही तो criminal enterprise होता‌.

आजही तो क्रिमिनल एन्टरप्राईझ आहे.

जमिन बळकावणे - जमीन मालकांना धमकावणे - ही basic qualifications आवश्यक असल्याने - गुंड - माफिया डॉन - हे त्या काळी मोठ्या प्रमाणात बिल्डर व्हायचे. आजही होतात.

पण पुण्यात परिस्थिती थोडी वेगळी आहे.

पूर्वी पुण्यात - जुने वाडे पाडून इमारती बांधल्या जायच्या. तेंव्हा पासून गुंडांच्या बरोबरीने भामटे लोक पुण्यात बिल्डर व्हायला लागलेत.

हे पुणेरी बिल्डर - भामटे - white coloured criminals - आहेत.

फसवणे - भामटेगिरि - कायदे धाब्यावर बसवणे - विश्र्वासघात करणे - unfair practices - cheating - fraud - corruption - हे गुन्हे हे पुणेरी बिल्डर आज अतिशय sophisticatedly करतात याचं सोसायटी मेंबर्सना कौतुक आहे.

हे गुन्हे केल्याशिवाय बिल्डर होता येत नाही - बिल्डिंगा बांधता येत नाहीत - प्रोजेक्ट पूर्ण होत नाहीत - अशी या पुणेरी भामट्या बिल्डरांची जशी ठाम धारणा आहे - तशीच ती सोसायटी मेंबर्सची सुद्धा आहे.

इतकी ठाम धारणा आहे हे की हे बिल्डर - सभ्य सुसंस्कृत सुशिक्षित वयस्कर - Chairman Secretary नां - आपल्या जाळ्यात ओढतात. त्यांच्या सारखे भ्रष्ट भामटे करून टाकतात.

तुमची काय अपेक्षा आहे ते सांगा - आमच्या व्यवसाय सगळ्यांचा मानपान करण्याची प्रथा आहे - कॅश हवी का एरिया का स्पेसिफिकेशन्स ते आत्ता सांगा - काहीही संकोच न करता बिल्डर चेअरमन सेक्रेटरीला offer देतात. मलाही दिली होती.

Society ची Redevelopment करायची असं ठरल्या ठरल्या - आमचं पुण्याले सर्व सोसायटी मेंबर्स - हा criminal enterprise आहे हे अचानक विसरून जातात. बिल्डर त्यांना देवदूत वाटायला लागतो‌.

ही त्यांची घोडचूक होते आणि तिथेच ते गाळात जातात.

पुण्यात पहिल्यांदा फ्लॅट बुक करणाऱ्या तरुणांना बिल्डर भामटे बदमाश अप्रामाणिक विश्र्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत हे माहीत असते.

पण त्यांच्या - गेली ३० - ४० वर्षे flat owner असलेल्या - सोसायटी मेंबर असलेल्या - बापाला, काकाला, सासऱ्याला - बिल्डर कसे असतात याचा विसर पडतो - ही क्रूर वस्तुस्थिती आहे.

तरी बरं - बिल्डर सोसायटी मेंबर्सना लुटतात - हे सरकारमान्य सत्य आहे.

तरी बरं - सोसायटी मेंबर्सना लुटण्यासाठी - बिल्डरांना चेअरमन सेक्रेटरी आणि कमिटी मेंबर्स साथ देतात - हे सरकारमान्य सत्य आहे.

हे जुनं सत्य आहे.
२००९ सारी सरकारला या सत्याचा साक्षात्कार झाला‌.
म्हणजे हे किती जुनं सत्य असेल ते बघा!
कदाचित sixteej मध्ये झालेल्या Co-Operative Housing Society च्या Act इतकं जुनं असेल!

या सत्याचा साक्षात्कार झाल्यावर सहकार खात्याने ही गुन्हेगारी थांबण्यासाठी मार्गदर्शक तत्वे सक्तीची केली.
Project Management Consultant ची appointment नेमून त्यांच्या मार्गदर्शनाखाली redevelopment करण्याची सक्ती केली.

सहाय्यक निबंधकांच्या उपस्थितीत redevelopment चा ठराव आणि बिल्डरची निवड करणं सक्तीचं केलं.

पण आम्ही सरकारचा डाव हाणून पाडला. बिल्डरांनी आर्किटेक्ट आणि वकिलांना आपल्या टोळीत सामील करून घेतले.

भोंदू प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट तयार केले‌. त्यांच्या मार्फत आम्हा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना आपलेसे केले.

आज आम्ही सगळे मिळून - सहकार खात्याने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आपण काम करतो आहोत - असं बेमालूम ढोंग वठवत असतो.

बिल्डरांना सोसायटी मेंबर्सना लुटण्यासाठी साह्यक म्हणून आम्ही राजरोस काम करत असतो.

तुमच्या त्या कुछ तो गडबड है या अनुभवात हे स्पष्ट दिसते. पण फक्त एकाला‌. बाकीच्या सोसायटी मेंबर्सना हे दिसत नाही. हे आमचे यश आहे.

तुमच्या सारखे नतद्रष्ट लोक अधूनमधून आरडाओरडा करतात -
सभ्य सुसंस्कृत सुशिक्षित वयस्कर सभासद असं का वागतात?

नविन फ्लॅटच्या मोहापायी ते इतके आंधळे कसे होतात?

फुकटात फ्लॅट मिळणार - ही या बिल्डर प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट आणि चेअरमन सेक्रेटरी या सगळ्यांच्या चांडाळ चौकडीने मिळून आपल्याला फसवण्यासाठी मारलेली थाप आहे हे या सोसायटीत मेंबर्सना कळत कसं नाही?

आमच्या शेटजींना १२ वर्षांनी मुलगा झाल्याच्या निमित्ताने - ते गरीब महिलांना फुकट साड्या वाटतायत - तर लवकर जा - नाहीतर संपतील - हां आणि एक काम करा - तुम्ही गरीब आहात असं वाटावं म्हणून - तुमच्या अंगावरचे दागिने आमच्याकडे आत्तापुरते ठेवून जा - आणि परत जाताना घेऊन जा - असं सांगून साळसूदपणे फसवणाऱ्या सराईत गुन्हेगारांचे हे टोळकं आहे - हे सभ्य सुसंस्कृत सुशिक्षित वयस्कर society members ना कसं कळतं नाही?

कसलाही विचार न करता - without any due diligence - वकिलांचा सल्ला न घेता - हे सभ्य सुसंस्कृत सुशिक्षित वयस्कर सभासद builder ची निवड कशी करतात? MOU - Memorandum of Understanding वर सह्या कशा करतात?

अंगावरचे दागिने काढून चांडाळ चौकडीला देऊन फुकट साडी घ्यायला धावणाऱ्या बायकांच्या सारखा मूर्खपणा - आमचे हे कोथरूडमधले सभ्य सुसंस्कृत सुशिक्षित वयस्कर सोसायटी मेंबर्स कसे काय करतात?

आम्ही मंडळी तुमच्याकडे लक्ष देत नाही.

कारण आम्हाला माहीत आहे की - Redevelopment process करताना बिल्डरने फसवणूक करायला तूम्ही society members responsible आहात
- तुमचा बेजबाबदारपणा
- तुमचा मूर्खपणा
- your greed
- तुमचा नाकर्तेपणा
- आम्हाला संधी देतो
- स्फूर्ती देतो
- तेंव्हा उगाच इतरांना दोष देऊ नका.

- आम्ही कसेही असलो तरी आमच्यामुळे तुम्हाला जुन्याच्या बदली नवं घर मिळतं - ते ही फुकटात - उगाच दोष दाखवून कृतघ्नपणा करू नका.

तावातावाने बोलून ते चेअरमन थांबले.

“सगळं पाप तुम्ही सोसायटी मेंबर्सच्या ओटीत घालून मोकळे झालात - हे म्हणजे कसं झालं - जिच्यावर बलात्कार झाला आहे - तीच बलात्काराला जबाबदार आहे - करणारा नाही - victim बद्दल तुम्हाला आजिबात सहानुभूती नाहिये - हे काही मला आवडलं नाही” - मी म्हटलं‌.

आवडलं नसलं तरी पटलं नां? - चेअरमन म्हणाले.

तुम्हाला पटलं का? Redevelopment करताना सोसायटी मेंबर्सवर होणाऱ्या अन्यायाला - फसवणूकिला - कोण जबाबदार आहे?

बिल्डरची चांडाळचौकडी का सोसायटी मेंबर्स?

तुमचं मत, प्लिज, काॅमेंटमध्ये लिहा.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे - सोसायटी मेंबर्सवर अन्याय होऊ नये - बिल्डरने फसवू नये म्हणून काय करावे - ते सुचवा‌‌.

तुमची कोथरूड मधली सोसायटी जर फसवली गेली असेल - तर मला WhatsApp वर video call करून सांगा.

प्रत्यक्ष भेटून सांगायचं असेल तर 9860044110 वर फोन करून वेळ ठरवा.

तुमचा अनुभव नांव न घेता
शेयर करून मी इतरांना सावध करेन‌

माझा प्रयत्न Redevelopment करताना भेडसावणारे problems आणि त्यावरील solutions शोधण्याचा आणि त्याविषयी जागृती निर्माण करणे हा आहे.

कुणालाही नांव ठेवण्याचा - दोष देण्याचा - दुखावण्याचा हेतू अजिबात नाहीये‌.

अनुभव शेयर करणारा रागाच्या भरात अतिशयोक्ती over generalization करतो - ते त्यांचे मत असते - माझे नाही - याची नोंद घ्यावी ही विनंती.

या बोलण्यावरून आपल्या व्यवसायात सुधारणा करायला वाव आहे हे लक्षात घ्यावं ही माझी तुमच्या सगळ्यांच्या कडून अपेक्षा आहे‌.

‌धन्यवाद 🙏

#रवीकरंदीकर #सोसायटीचापुनर्विकास #रिडेव्हलपमेंट #कोथरुड #पुणे #पुणेकर #पुणेशहर #पुनर्विकास #पुणेबिल्डर #बिल्डर #आर्किटेक्ट #कोथरुडकर

*"कुछ तो गड़बड़ है दया" *सोसायटीच्या रीडेव्हलपमेंट बद्दलचा एक अनुभव ऐका. -४ बिल्डरांनी tender भरली.चौघांनी presentations...
16/01/2024

*"कुछ तो गड़बड़ है दया" *

सोसायटीच्या रीडेव्हलपमेंट बद्दलचा एक अनुभव ऐका. -

४ बिल्डरांनी tender भरली.
चौघांनी presentations दिली.
४ पैकी ३ बिल्डरांच्या साईटसना visits दिल्या.

पुढच्या रविवारी general body meeting झाली.

Project management consultant म्हणाला की ४ पैकी ३ बिल्डरांना interest नाहीये.

फक्त एकालाच आहे. त्यानं revised offer दिली आहे.

त्यामुळे फक्त त्याच्या revised offer वर चर्चा करून निर्णय घेऊ.

लेखी revised offer कुठंय? - मी विचारले.

माझ्या ऑफिसमध्ये आहे.
Site visit च्यावेळी त्या बिल्डरने तुम्हाला ती offer सांगितलेली आहे म्हणून आणली नाही.

बाकीच्या ३ बिल्डरांनी interest नाही असं त्यांनी in writing कळवलं आहे का? - मी विचारलं.

नाही - तोंडी सांगितलं आहे - PMC म्हणाला.

त्यामुळे आता या एका बिल्डरची offer स्वीकारण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही - PMC म्हणाला.

का? आपल्या शेजारच्या २ सोसायट्यांची redevelopment 2 नामवंत बिल्डर करतायत - त्यांच्याकडून offer घेऊया - एक जण म्हणाला.

आपली tendering ची process पूर्ण झाली आहे - त्यामुळे कायद्यानुसार - तसे करता येणार नाही - PMC म्हणाला.

कुठला कायदा? कूठलं कलम? - मी विचारले.

तुम्ही गप्प बसा - शहाणपणा बंद करा - काड्या करू नका - फाटे फोडू नका - Chairman Secretary आणि दोन चार members उठून आरडाओरडा करू लागले. एक तर माझ्या अंगावर धावून आला.

४ पैकी ३ interested नाही म्हणतात - तर राहिलेल्या एका बिल्डरला काम देण्याची सक्ती कुठला कायदा करेल? पर्याय शोधायला बंदी कुठला कायदा घालेल? - असे मीही तावातावाने बोलत राहिलो.

पण ते सगळे आरडाओरडा करत राहिले.

शांत व्हा - वाद घालू नका - तुम्हाला ब्लडप्रेशरचा त्रास आहे - चला - असं म्हणत बायको मला हाॅलच्या बाहेर घेऊन गेली.

तुलाही माझं म्हणणं चुकीचं वाटतं का? - मी तिला विचारलं.

No. Not at all. You were right. कुछ तो गड़बड़ है दया" - ती म्हणाली.

रवी करंदीकर, तुम्हाला काय वाटतं?
कुछ तो गड़बड़ है? - आपला अनुभव सांगून - त्यांनी मला विचारलं.

उघड आहे! कुछ तो गडबड हैच़!!- मी त्यांना सांगितले.

तुमचं मत काय आहे?
Project management consultant - Chairman - Secretary - यांचं त्या बिल्डर बरोबर काही साटंलोटं setting असेल का?
काॅमेंट वरून जरूर सांगा.

Redevelopment of Co-Operative Housing Society च्या Redevelopment ची Process करताना तुम्हाला असे काही अनुभव आले असतील तर 9860044110 वर फोन करून किंवा WhatsApp वर video call करून मला सांगा.

तुमचं - तुमच्या सोसायटीचे - Project management consultant चे - बिल्डरचे नाव न घेता मी - वरील अनुभवा प्रमाणे - शेयर करेन.

कुणालाही नांव ठेवण्यापेक्षा महत्वाच्या मुद्दांकडे लक्षवेधणे हा माझ्या उद्देश आहे.

या प्रश्नांकडे लक्ष वेधून जास्तीत जास्त सोसायटी मेंबर्समध्ये जागृती निर्माण करून तुमच्या Co-Operative Housing societyची Redevelopment हा फायद्याचा सौदा व्हावा हा माझा प्रयत्न आहे .

आपला,
रवी करंदीकर
माझ्याशी connect होण्यासाठी, प्लिज, खालील QR Code Scan करा.
#रवीकरंदीकर #कोथरुड #रिडेव्हलपमेंट #पुनर्विकास #सोसायटी #सोसायटीचापुनर्विकास

*तिळगुळ घ्या गोड बोला*साखर खाणं केंव्हाच बंद केलंय.गुळाचा चहा प्यायला सुरुवात करून खूप काळ लोटला आहे. पण अजूनही गोड सहजप...
14/01/2024

*तिळगुळ घ्या गोड बोला*

साखर खाणं केंव्हाच बंद केलंय.
गुळाचा चहा प्यायला सुरुवात करून खूप काळ लोटला आहे.
पण अजूनही गोड सहजपणे बोलता येत नाही.

पूर्वी यायचं. खूप पूर्वी.
रियल इस्टेट सेल्समन असताना.
जाहिरात एजन्सीचा मालक असताना.

पण कधी तरी - बहुदा सल्लागार झाल्यावर - गोड बोलणं कमीपणाचं वाटायला लागलं.
तिखट बोलणं रुबाबदार वाटायला लागलं.

त्याही पुढे जाऊन कडू बोलून विचारणाऱ्याला दुखावण्याचा आनंद हवा हवासा वाटायला लागला.

सल्लागार - मार्गदर्शक या व्यवसायात कडू बोलून विचारणाऱ्याचे डोळे उघडणे हे माझं कर्तव्य आहे असे वाटायला लागले.

शब्दांचे फटके फक्त झोंबतात. वण उठतात. सहन न होऊन विचारणारा डोळे आणखी घट्ट मिटतो. हे लक्षात यायला खूप वेळ लागला.

यापुढे गोड बोलून मन वळवण्याचा प्रयत्न करायचा असं ठरवलं.

तेंव्हा एक गोष्ट लक्षात आली.
गोड बोलणं अवघड असतं.
विचार करून मग बोलावं लागतं. शब्दांच्या फैरी झाडून चालत नाहीत. हार माळा करून गळ्यात घालाव्या लागतात. त्यामुळे ३० - ४० मिनिटं बोलूनही मी दमतो.

रवी करंदीकर, तोंडाला येईल ते बोलू नकोस. ते सोपं असलं तरी. गोड बोल. ते अवघड असतं. पण परिणामकारक असतं. म्हणून आवश्यक असतं. असं मी मला सांगत असतो.

कधीतरी 9860044110 वर फोन करून माझी परीक्षा घ्या.
#रवीकरंदीकर #कोथरुड #पुणेकर #पुणेशहर #पुणे #संक्रांत #मकरसंक्रांत #तिळगूळ #बोलण #बोलणं #संवाद

*Scan Me!*I love you - असं यापुढे कुणालाही म्हणणार नाही. आज पहाटे शपथ घेतली.आजपासून मी म्हणणार - Scan Me! कारण मी माझा Q...
13/01/2024

*Scan Me!*

I love you - असं यापुढे कुणालाही म्हणणार नाही.
आज पहाटे शपथ घेतली.
आजपासून मी म्हणणार - Scan Me!
कारण मी माझा QR Code “निर्माण” केला आहे.

टेकडीवर फिरणाऱ्यांनी गुड मॉर्निंग केलं की मी म्हणणार Scan Me!

पौड रोडवर कुणी चालताना दिसला की त्याला थांबवून मी म्हणणार - Scan Me!

बसमध्ये शेजारी बसलेल्या मुलीला मी म्हणणार - Scan Me!

गोपारामच्या दुकानात भाजी घ्यायला आलेल्या गृहिणीला मी म्हणणार - Scan Me!

संध्याकाळी बस स्टॉपवर जमलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या घोळक्यात शिरून मी त्यांना म्हणणार - Scan Me!

नुसतं म्हणणार नाही तर माझ्या मोबाईलवरचा QR Code मी त्यांना Scan करायला लावणारं.

ते ही आनंदाने करणार.
करताना म्हणणार - आज पर्यंत पैसे द्यायला QR Code Scan केले. पहिल्यांदा कमावण्यासाठी करतोय. रवी करंदीकर, I love you ❤️

असं काय खास आहे माझ्या QR Code मध्ये?
Scan Me! तुम्हीही खूष व्हाल 👍
#रवीकरंदीकर #कोथरुड #पुणे #पुणेशहर #पुणेकर

*चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आल्यामुळे माझं आयुष्य फार बोअरिंग होत चाललंय‌.*पैसा नसला किंवा कमी असला तर  पावलोपावली...
12/01/2024

*चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आल्यामुळे माझं आयुष्य फार बोअरिंग होत चाललंय‌.*

पैसा नसला किंवा कमी असला तर पावलोपावली किती चॅलेंजेस् - आव्हानं - असतात.

या आव्हानांना सामोरे जाण्यात प्रचंड थ्रिल असतं‌. त्यामुळे आयुष्य थ्रिलिंग - एक्सायटिंग होतं‌.

*आयुष्य कसं असावं?*

सुखी समृद्ध संपन्न आयुष्य जगण्यापेक्षा - मला आयुष्य फुल्ल ऑफ चॅलेंजेस् - असावं - थ्रिलिंग एक्साइटिंग असावं असं वाटतं.

त्यामुळे - I am born with a silver spoon in my mouth - हे विसरून जगण्याचा मी सतत प्रयत्न करत असतो.

आता हेच बघा ना - माझा डेस्कटॉप निकामी झाल्यामुळे टाकून द्यावा लागला. पण लॅपटॉप असल्यामुळें माझी काही अडचण झाली नाही. पण तोही बिघडला. तर लगेच मी केविलवाणा - miserable - झालो.

माझ्या काॅम्पुटर कन्सल्टंटने लगेच काही उपाय सुचवले -

१) १० - पंधरा हजार खर्च करून आहे तो लॅपटॉप दुरुस्त करता येईल.

२) ३० एक हजारांत refurbished laptop मिळेल.

३) ५० हजार ते दीड एक लाखात नवीन घेता येईल.

किती सोपं आहे!
पैसे फेकले की आव्हान संपुष्टात येणार.
केविलवाणा झालेला रवी करंदीकर शक्तीमान बलवान होणार.

यात काहीच मजा नाही.
माझ्याकडे असलेल्या वस्तूंवर - resources वर - माझा आनंद सूख यश अवलंबून कसं असू शकतं?

*There is no correlation between creativity and equipments*

मला जे करायचं आहे त्याकरता डेस्कटॉप आणि लॅपटॉप आवश्यक आहे हे खरं आहे.

पण या दोन्ही गोष्टी माझ्याकडे नाहीत.
पण माझ्याकडे एक गोष्ट आहे.
माझ्याकडे मोबाईल फोन आहे!

पैसे फेकून या आव्हानावर मात करण्यापेक्षा मोबाईल चा उपयोग करून मला जे करायचं आहे ते करणं हे चॅलेंजिंग एक्साइटिंग थ्रिलिंग आहे!

तुम्हाला काय वाटतं?
Redevelopment of Co-Operative Housing Societies in Kothrud या विषयावर माझ्या गुगल पिक्सेल 4a फोनवर ब्लॉग लिहणं - व्हिडिओ करणं थोडं अवघड जाईल पण अशक्य अजिबात नाहीये. हो की नाही?

प्लीज, काॅमेंट करून किंवा 9860044110 वर फोन करून तुम्हाला काय वाटतं ते सांगा. धन्यवाद 🙏

#रवीकरंदीकर #कोथरुड

*हल्ली मी गुगल बार्ड चा उपयोग जास्त करतो*माझी गुगल सर्च करण्याची इतक्या वर्षांची सवय मोडून गेली आहे.गुगल सर्च केल्यावर ह...
11/01/2024

*हल्ली मी गुगल बार्ड चा उपयोग जास्त करतो*

माझी गुगल सर्च करण्याची इतक्या वर्षांची सवय मोडून गेली आहे.

गुगल सर्च केल्यावर हल्ली जरी Generative AI सविस्तर माहिती देत असला तरीही मी गुगल बार्ड - bard.google.com - जास्त वापरतो.

*मी गुगल बार्ड का वापरतो?*

मला माहिती फक्त माहितीसाठी नको असते. मिळालेल्या माहितीचा उपयोग मला कशासाठी तरी करायचा असतो.

गुगल बार्डला मी माझा माहिती मागण्यामागचा उद्देश सांगू शकतो. तो त्या प्रमाणे ती माहिती माझ्या समोर मांडतो.

बहुदा गुगल बार्डने दिलेली माहिती बरोबर असते. त्यामुळे मला तो वापरावासा वाटतो.

*गुगल बार्डच्या उपयुक्ततेचे उदाहरण*

उदाहरणार्थ - मी बार्डला सांगितले की १२० शब्दात भैरव रागावर निबंध लिहून दे - तर बार्डने मला हे दिलं -

*भैरव राग*

भैरव राग हा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील एक महत्त्वाचा राग आहे. हा राग प्राचीन आहे आणि कदाचित हिंदुस्तानी संगीतातील सर्वात जुना राग आहे. काही दंतकथांनुसार, भैरव रागाची निर्मिती भगवान शिवांनी स्वतः केली होती.
भैरव राग हा एक सातस्वर राग आहे आणि तो भैरव थाटाचा आश्रय राग आहे. या रागात सप्तकातील सर्व सात स्वर वापरले जातात. तथापि, या रागाची ओळख कोमल ऋषभ आणि कोमल धैवत या दोन स्वरांमुळे होते. या स्वरांमुळे रागाला एक विशिष्ट गांभीर्य आणि तीव्रता प्राप्त होते.
भैरव राग हा एक शक्तिशाली आणि राजसी राग आहे. तो शौर्य, भक्ति आणि आध्यात्मिकता या भावनांना व्यक्त करतो. भैरव राग सकाळच्या वेळी गायला जातो. हा राग धार्मिक विधी आणि आध्यात्मिक सरावांसाठी देखील लोकप्रिय आहे.
भैरव रागावर अनेक सुंदर रचना आहेत. यापैकी काही प्रसिद्ध रचना म्हणजे "भैरवी बाहार", "मियाँ की टोडी" आणि "भैरव". या रचनांमधून भैरव रागाच्या शक्तिशाली आणि भावपूर्ण स्वरूपाचा अनुभव येतो.
उदाहरणार्थ, "भैरवी बाहार" ही एक प्रसिद्ध भैरव रागाची रचना आहे जी पंडित भीमसेन जोशी यांनी गायली आहे. या रचनेत भैरव रागाच्या गांभीर्य आणि तीव्रतेचा उत्तम वापर केला आहे.
भैरव राग हा एक बहुआयामी राग आहे जो विविध भावना व्यक्त करू शकतो. हा राग हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील एक मौल्यवान ठेवा आहे.

त्यामुळे पंडित भीमसेन जोशींचा हा व्हिडिओ मला भावला -
https://youtu.be/VBGK1a1Qya4?si=jtjOrpq_3kGYZz1w

तुम्ही गुगल बार्ड वापरता का? असल्यास कशा करता - हे प्लिज लिहून किंवा 9860044110 वर फोन करून मला जरूर सांगा.

#रवीकरंदीकर #कोथरुड #हिंदुस्तानीशास्त्रीयसंगीत #गुगुल #सर्च #गुगुलसर्च #गुगुलबार्ड #जनरेटेव्हसर्च #गुगुलजनरेटेव्हसर्च

Discover more about Bard, a collaborative AI tool developed by Google to help bring your ideas to life.

*उस्ताद रशीद खान गेले.*आज पहाटे उठल्यावर ॐकारचा जप ऐकायला YouTube उघडलं. नजरेला पडलं मोदींचं पोस्ट. पद्मभूषण उस्ताद रशीद...
10/01/2024

*उस्ताद रशीद खान गेले.*
आज पहाटे उठल्यावर ॐकारचा जप ऐकायला YouTube उघडलं. नजरेला पडलं मोदींचं पोस्ट. पद्मभूषण उस्ताद रशीद खान यांना श्रद्धांजली वाहणारं.
वयाच्या अवघ्या 55 व्या वर्षी
प्रोस्टेट कॅन्सरने उस्ताद गेले.
चौकशी केली तर कळलं.
वाईट वाटलं.

*उस्ताद रशीद खान आणि भीमसेन जोशी*

श्रद्धांजली वाहण्याकरता त्यांची आणि भीमसेन जोशींची जुगलबंदी लावली. २००१ मध्ये दूरदर्शने प्रसारित केलेली. https://youtu.be/g6GLWH88p14?si=kQebWB3UDpkSir8R

या जुगलबंदीमुळे उस्ताद रशीद खान मला माहित झाले. आवडायला लागले.

तोपर्यंत मला भीमसेन जोशींनी डॉक्टर बाल मुरली कृष्ण आणि पंडित जसराज यांच्याबरोबर गायलेल्या जुगलबंदीच माहिती होत्या.

2001 मध्ये वयाच्या जवळ जवळ 80 व्या वर्षी भीमसेन या 30 - 32 वर्षाच्या तरुणा बरोबर जुगलबंदी गायला का तयार झाले? असा प्रश्न पहिल्यांदा ही जुगलबंदी ऐकली तेंव्हा पडला होता.

जुगलबंदी ऐकल्यानंतर उत्तर मिळालं. पंडितजींना उस्ताद रशीद खान हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे भविष्य आहे असं वाटायचे!

*संस्मरणीय जुगलबंदी*

साधारणतः तासाभराच्या जुगलबंदीत दोघांनी चार राग सादर केले आहेत.
१) मियां की थोडी
२) दरबारी
३) शंकरा
४) ठुमरी तिलंग

एकट्याने तासभर गायलेले हे राग या दोघांनी या मैफलीत दहा पंधरा मिनिटात सादर केले आहेत. त्या रागांचं सौंदर्य कुठेही कमी होऊ न देता.

व्हिडिओ बघताना दोघांचा एकमेकांबद्दलचा आदर आणि स्नेह जाणवतो.

पहिल्यांदा ही जुगलबंदी बघितली तेंव्हा मावळता आणि उगवता सूर्य एकाच वेळी बघतोय असं वाटलं होतं.

आज सकाळी सगळीकडे अंधार पसरला आहे असं वाटून गहिवरून गेलो.


#रवीकरंदीकर #कोथरुड #श्रद्धांजली #भिमसेनजोशी #पंडितभिमसेनजोशी #भीमसेनजोशी #शास्त्रीयसंगीत #हिंदुस्तानीशास्त्रीयसंगीत

Pt. Bhimsen Joshi & Ustad Rashid Khan ~DD National

मी इंग्रजीत २ ईमेल लिहिली! खूप वर्षांनी लिहिली. तरी सहज लिहिली. नेहमीप्रमाणे गुगल डाॅकवर लिहली‌. लिहिली म्हणजे व्हॉइस टा...
09/01/2024

मी इंग्रजीत २ ईमेल लिहिली!

खूप वर्षांनी लिहिली. तरी सहज लिहिली.

नेहमीप्रमाणे गुगल डाॅकवर लिहली‌. लिहिली म्हणजे व्हॉइस टाईप केली.
त्यामुळे स्पेलिंग आठवाव़ं - शोधावं - दुरुस्त करावं लागलं नाही.

मी एकेक वाक्य बोलत गेलो. गुगल डाॅकवर ते टाईप होत गेलं. झालं. इमेल लिहून झालं!

Active voice. छोटी वाक्य. तीन चार ओळींंचा एक परिच्छेद. Sub headings. चार परिच्छेद‌. 90 - १०० शब्द. सगळं व्यवस्थित.

माझ्या संपादक बाईंना वाचायला दिलं. जमलंय - जवळजवळ पूर्वीसारखं - फक्त जरा हे बदल - हे ऐकून आनंद झाला.

Hemingway Editor App वर पेस्ट केलं. एकही दोष - सुधारणा नाही - Good शेरा मिळाला!

मला माझं खूप कौतुक वाटलं. मी मला हुकूम दिला - रवी करंदीकर, उद्या पहाटे लोटून दे ही इंग्रजी इमेलची होडी सोशल मीडियाच्या अथांग महासागरात आणि अजस्त्र शार्क माशाची शिकार करूनच परत ये‌.

नाही नाही. Not at all!
या वर्षी - २०२४ मध्ये - मी मिंग्रजीत - मराठी + इंग्रजी - लिहणार आहे.
कोथरूडमधल्या Co-Operative Housing Societies च्या redevelopment वर.
इंग्रजीत ईमेल लिहिणं हा केवळ timepass होता.

#रवीकरंदीकर #कोथरुड #पुणेकर #पुणेशहर #मराठी #पुणे #मिंग्रजी #रीडेव्हलेपमेंट

*कोण श्रेष्ठ? माझ्या बायकोचा मित्र का माझा?*काल सहकार नगर २ मध्ये गेलो होतो. गेलो होतो एका बिल्डरची रिडेव्हलपमेंटची स्की...
08/01/2024

*कोण श्रेष्ठ? माझ्या बायकोचा मित्र का माझा?*

काल सहकार नगर २ मध्ये गेलो होतो. गेलो होतो एका बिल्डरची रिडेव्हलपमेंटची स्कीम बघायला.

बघून झाल्यानंतर माझी बायको म्हणाली - माझा एक वर्गमित्र इथे जवळच राहतो - त्याच्याकडे चक्कर मारू.

मित्राला भेटायला - गेले ८ दिवस हंथरुणाला खिळलेल्या नवऱ्याला - फरफटत चालत घेऊन जायला तुला काहीच वाटत नाही का? असं मी बायकोला विचारलं.

तुला यायचं नसेल तर येऊ नकोस. पण इतक्या जवळ येऊन त्याला न भेटता मी काही घरी येणार नाही. बायको म्हणाली.

मला चालणं शक्य नाही. रिक्षा मिळाली तर जाऊ. मी तडजोड केली.

कोपऱ्यावर मिळाली तर मिळेल असं ती म्हणाली म्हणून थोडं चाललो. पण मिळाली नाही. आणखी पुढे गेलो‌. तिथे रिक्षा सॅंड होता. चारही रिक्षावाल्यांनी इतक्या जवळ यायला नकार दिला.

माझं सगळं तारुण्य माझ्या बायकोच्या मित्रांशी स्पर्धा करण्यात - लढण्यात - झगडण्यात गेलं.

वाटलं होतं की उतार वयात तरी सुटका होईल. पण ती शक्यता नाहीये हे स्विकारून मी चालत राहिलो.

सन्माननीय रवी करंदीकरांचे पाय माझ्या घराला लागल्यामुळे मी आज धन्य झालो!

असं अत्यंत कुत्सितपणे बोलत बायकोच्या मित्रानं आमचं स्वागत केलं.

एक जिवंत माणूस त्याच खोलीत आहे हे विसरून ते दोघे त्यांच्या ५० वर्गमित्रांच्या बद्दल बोलत बसले.

शेवटी न राहवून मी विचारले की तुमची शाळा किती वाजता सुटते?

तेंव्हा आता आपलं लग्न झाले आहे आणि आपल्याला नवरा आहे हे माझ्या बायकोच्या लक्षात आलं.

अरे, रिक्षा बोलवता येइल का? रवीला चालणं शक्य नाहीये - असं बायको तिच्या मित्राला म्हणाली.

बोलवतो की - असं म्हणून बायकोच्या मित्रानं फोन लावला.

काय दुपारची विश्रांती घेताय काय? बरं ठीक आहे - असं म्हणून त्यानं फोन ठेवला.

त्याची विश्रांतीची वेळ आहे - पण कोपऱ्यावर मिळेल - रस्त्याला उतार आहे - सहज जाशील - पाय न उचलता - उभ्या उभ्या - घरंगळत थेट कोपऱ्यावरच्या रिक्षात जाऊन पडशील या थाटात - बायकोचा मित्र हसत हसत मला म्हणाला.

तुझ्या मित्राला भेटून झालं - आता माझ्या मित्राला भेटू - रिक्षात बसल्या बसल्या मी बायकोला म्हटलं.

कोण? बायकोनं विचारलं.

कोण ते सांगितलं तर तू लगेच तयार होशील! मी म्हटलं.

असा कोणीही तुला मित्र नाहिये - खरं तर तुला एकही मित्र नाहीये. बायको म्हणाली.

रविंद्र मंकणी! इथंच कुठं तरी राहतो. मी म्हटलं.

मला माहितीय त्यांचं घर - घेऊ का तिकडं? - रिक्षावाल्याने मागं वळून विचारलं.

काही नको - तुम्ही समोर बघून रिक्षा चालवा आणि सांगितल़ं आहे तिकडं चला - माझी बायको रिक्षावाल्याला म्हणाली.

याला म्हणतात मित्र! नाहीतर तुझा मित्र - मी बायकोला म्हटलं.

तर मग सांगा. कुणाचा मित्र श्रेष्ठ आहे? माझा का माझ्या बायकोचा?

#रवीकरंदीकर #कोथरुड #मराठी #पुणे #पुणेकर #पुणेशहर #सहकारनगर #मैत्री #बायको #बायकोचामित्र #शाळासोबती #वर्गमित्र #रविंद्रमंकणी

*काय केविलवाणी अवस्था झालीय माझी.*असं आज सकाळी उठल्या उठल्या मला वाटलं.काही दिवसांपूर्वी माझा डेस्कटॉप काॅम्पुटर इतका बि...
07/01/2024

*काय केविलवाणी अवस्था झालीय माझी.*

असं आज सकाळी उठल्या उठल्या मला वाटलं.

काही दिवसांपूर्वी माझा डेस्कटॉप काॅम्पुटर इतका बिघडला की तो दुरुस्त करून वापरणं अशक्य झाल्याने टाकून द्यावा लागला.

आणि काल माझा लॅपटॉप चालेना म्हणून दुरुस्तीला दिला तर तो म्हणाला की याच्यावर खर्च करण्यापेक्षा नविन घेतलेला बरा होईल.

त्यामुळे आता माझ्याकडे डेस्कटॉप काॅम्पुटरही नाहीये आणि लॅपटॉपही नाहिये.

नाही. गैरसमज करून घेऊ नका.
ही अवस्था केविलवाणी नाहीये.

खरं तर हा अतिशय आनंदाचा प्रसंग आहे. दोन्ही गोष्टी नव्या आणि अत्याधुनिक घेण्याची ही सुवर्णसंधी आहे.

गोड बातमी आहे हे कळल्यावर - मुलगा का मुलगी? - असं आईनं विचारल्यावर जसं माझं झालं होतं - तसं काहीसं - डेस्कटॉप हवाय का लॅपटॉप? - असं विकीनं विचारल्यावर माझं झालं. ‌

हुरळून जाऊन - दोन्ही! - असं मी विकीला - माझ्या काॅम्पुटर कन्सल्टंटला सांगितलं.

अडोब क्रिएटिव्ह क्लाउड वापरण्यालायक काॅनफ्युगृरेशनचे जर दोन्ही घेतले तर बजेट ४ - ५ लाखावर जाईल - विकी म्हणाला.

मग? काय झालं! आत्तापर्यंत नेहमीच माझ्याकडे दोन्ही असायचंच की - मी म्हटलं.

हो. पण यापुढे तितका वापर होणारंय का? नाहीतर नुसते पडून राहायचे - विकी म्हणाला‌.

म्हणजे काय? मी संपलोय - असं वाटतंय का तुला? - मी चिडून विचारलं.

संपलाय असं नाही - पण संपत तर आला आहातच की - ७० म्हणजे अजून किती राहिलंय - विकी म्हणाला‌.

७० नाही - ६९ running - ही दोन्ही मशिनं काय २ - ३ वर्षांत बंद पडतील तरी मी चालूच असेन - असं मी हसत हसत म्हटलं.

पण खरं सांगू? माझा कंठ दाटून आला होता. डोळे पाणावल्यासारखे वाटत होते. क्षणभर पाय लटपटल्या सारखे वाटले होते.

मी असून नसल्यासारखा आहे - असं, साला, माझ्या तोंडावर सांगतो‌य.

पण राग यायच्या ऐवजी - मला गहिवरून का आलं आहे?

मला ही तसंच काहीसं वाटतंय की काय?

#रवीकरंदीकर #कोथरुड #मराठी #म्हातारपण #अंत #मरण #वेध #निवृती #जीवन

Do you believe in “collective prayer”?सगळ्यांनी एका वेळी एका ठिकाणी जमून आजारी माणूस बरा व्हावा याकरता प्रार्थना करणे - ...
07/01/2024

Do you believe in “collective prayer”?

सगळ्यांनी एका वेळी एका ठिकाणी जमून आजारी माणूस बरा व्हावा याकरता प्रार्थना करणे - collective prayer - या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे का?

असं मी का विचारतो आहे?
सांगतो!

आज सकाळी उठल्यावर - दररोज सारखं - युट्युब उघडले.
ॐ सर्च केलं.
सर्च रिझल्ट मध्ये पहिला जो व्हिडिओ आला तो लावला.
https://youtu.be/ijfLsKg8jFY?si=umkqF5D6FWa4294g
सवयीप्रमाणे कॉमेंट्स कडे माझी नजर गेली.
पहिलीच कॉमेंट अशी होती -

My son is seriously affected by anxiety disorder, please, pray for his recovery. I have heard that collective prayer brings positive results.

या कॉमेंट वर 23 हजार लाईक्स आणि 500 रिप्लायज् होती.

कॉमेंट, लाईक्स आणि रिप्लायज् - सगळंच बघून मी खूप चकित झालो.

Anxiety disorder या मानसिक आजारा मुळे करोडो लोक आजारी आहेत हे मी ऐकून आहे.

सतत चिंता वाटत असल्याने - सतत कशाची तरी भयंकर भीती वाटत असल्याने - येणाऱ्या Panic attacks मुळं - त्रस्त होऊन दररोजचं जीवन जगणं करोडो लोकांना मुश्किल झाले आहे हे मी ऐकून आहे.

त्यामुळेच हल्ली सेल्फ केअर - स्वतःची काळजी घेणे - सिगरेट दारू सोडून देणे, व्यायाम करणे, संतुलित आहार घेणे, मानसिक ताणतणाव कमी करणे वगैरे गोष्टींना इंस्टाग्राम वरही खूप महत्त्व आलेले आहे.

पण, सगळ्यांनी मिळून एखाद्याचा मानसिक रोग बरा व्हावा याकरता प्रार्थना करणे - हा उपाय मी कधी ऐकला नव्हता.

इतकच काय, कलेक्टिव्ह प्रेयर - ही ख्रिश्चन धर्मातली रीत आहे अशी माझी ठाम समजूत आहे.

सनातन धर्मात प्रत्येक व्यक्ती स्वतःची काळजी घ्यायला समर्थ आहे - परमात्म्याशी तो डायरेक्ट कनेक्ट होऊ शकतो - असे मानले जाते - असे मला वाटते.

त्यामुळे ॐ च्या जपावर श्रद्धा असणाऱ्या सनातन लोकांनी collective prayer ला दिलेला प्रतिसाद बघून मी चकित झालो.

तर सेल्फ केअर - cognitive behavioral therapy - औषधे - यांच्या इतकी - सगळ्यांनी मिळून केलेली प्रार्थना - collective prayer - anxiety disorder या मानसिक आजारावर परिणामकारक उपाय आहे - असं तुम्हाला वाटतं का?

मानसिक आणि शारीरिक आजारावर सगळ्यांनी मिळून प्रार्थना करणे या उपचार पद्धतीवर तुमचा विश्वास आहे का?

कॉमेंट करून सांगा - किंवा 9860044110 वर फोन करून सांगा - अशी मी प्रार्थना करतो 🙏
#प्रार्थना #उपचार #रवीकरंदीकर #कोथरुड #मराठी #पुणे

Om Chanting | Meditation Music | Sleep Music | Yoga Music | Meditation Music Relax Mind Body | Om MeditationOm (Aum) when chanted properly is attributed with...

Address

12, Sumedha, Shivtirthnagar, Paud Road Kothrud
Pune
411038

Opening Hours

Monday 8am - 7pm
Tuesday 8am - 7pm
Wednesday 8am - 7pm
Thursday 8am - 7pm
Friday 8am - 7pm
Saturday 8am - 7pm
Sunday 8am - 7pm

Telephone

+919860044110

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पुण्यात फ्लॅट बुक करण्याआधी माझ्याशी बोला posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to पुण्यात फ्लॅट बुक करण्याआधी माझ्याशी बोला:

Share

Category