मनात आल ते लिहील

मनात  आल ते लिहील मला कधी खूप छान सूचत पण लिहू कुठे ते इथ लिहितो,

24/06/2026

जीवनातल्या संघर्षाने तर दिलाच आहे,
आता हा मोडलेल तंगड पण रोज त्रास देतय,
आता त्रासामुळे जगण्याचं जीवावर येतंय,
माझा त्रास पाहून मन दुखू नाही कोणाचे,
म्हणून हास्या मागे मी त्याला लपवतोय,
माझ्या घरच्या पाई आयुष्य खपतोय,
पण लपवल्या मुळे माझ्या त्रासाचा घरच्यांना विसर पडलाय,
हाच एक अपराध माझ्याकडून घडलाय,
जरा आळस केला कोणत्या कामाचा मी,
तर मी कामचुकार ठरतो,
शरीर सुटत चाललय गोळ्या अवषधानी,
टोमणे तरी असतात काय नुसता चरतो,
कधी टोमण्याचा वैताग आल्यावर,
मी आठवण करून देतो माझ्या त्रासाची,
त्या दिवशी सगळे काळजी घेतात माझ्या प्रत्येक श्वासाची,
या मुळे प्रेम माझं सर्वांवर वाढत जात,
म्हणून तर मला प्रत्येक जण जगायला धीर देत

31/12/2025
24/12/2025

कवितेच शीर्षक, बॉस

बॉस म्हणजे, बॉस म्हणजे, बॉस असतो.
काम करणाऱ्यांना खास,
आळश्यांसाठी त्रास असतो.

आतून समजुद्दार आणि मायाळू असून,
वरुण कठोर, रागीट, शिस्तबद्ध दिसतो.
बॉस म्हणजे, बॉस म्हणजे, बॉस असतो.
काम करणाऱ्यांना खास,
आळश्यांसाठी त्रास असतो.

चुकांवर बॉसने बोलायला पाहिजे ,
त्यावर कारवाई पण करायला पाहिजे,
चुकांमाघचा संदर्भ ही समजून घ्यायचा असतो,
बॉस म्हणजे, बॉस म्हणजे, बॉस असतो.
काम करणाऱ्यांना खास,
आळश्यांसाठी त्रास असतो.

बॉस बोलका असला की चुकीचे समज होत नाही,
कोणाला मागे बोलायची संधी मिळत नाही,
नाहीतर काही बॉसची प्रतिमा चुकीची मांडतात,
न घडलेले किस्से पण कान भरण्यासाठी सांगतात,
या मुळे मोठा गैरसमज पसरुन बसतो,
बॉस म्हणजे, बॉस म्हणजे, बॉस असतो.
काम करणाऱ्यांना खास,
आळश्यांसाठी त्रास असतो.

लेखक, प्रणव सूर्यकांत काफरे

09/10/2025

शीर्षक ,,, अलका चे मनोगत,

जवळपास रोज वाद भांडण आमची व्हायचे,
पण आवडीच त्यांच खायला मी मीच करून द्यायचे,

माझ्या मुलांना आमच हे रोजच हेच वागणं आठवतंय
त्यांचा खूप जीव होता माझ्यावर हेच मी माझ्या मनात साठवलय,

कोणी केली होती करणी, कुठून दुर्बुद्धी त्यांना आठवली,
कुस्ती ची स्पर्धा खेळायची इच्छा त्यांनी जतवली,

मुलगा नाही म्हणाला, नाही म्हणाली माझी लेक,
तरी त्यांना हवी होती नवी बंडी कुस्ती खेळायला एक,

नका जाऊ म्हणून आम्ही खूप त्रागा केला,
पण ते ऐकतात का कोणाच, ते माणूस न ऐकता गेला,

म्हणे कुस्ती मध्ये ते जिंकले पण होते,
पण यायला उशीर झाला म्हणून आमचे मन व्याकुळ होते,

संध्याकाळी बातमी आली त्याचा म्हणे पाय मोडलाय,
मी म्हणाले म्हातारपणात ह्या माणसाला काय कुस्तीचा नाद जुडलाय,
मनात न माझ्या ना कोणाच्या, कसलीच चुकचुकली पाल ,
मला काय माहित त्यांच्या मागे मुलाचे होतील हाल,

देवा रोज भक्ती केली तुझी रोज हात जोडलं,
कारे तू अस माझ्या सौभाग्याच लेन ओरबडल,

तुझ्या पाई माथा टिकवायला पाई येणार माझं पोर,
घरातल्या देवाऱ्या पासून ही झालं रे दूर,

आजही मी मनो भावे तुझी भक्ती करतीये,
ह्यावयात ही सर्व व्रत उपास धरती ये,

माझं झालं ते झालं, माझ्या लेकरांना सुखी कर,
नाही केलं तर कोणाचा विश्वास राहील तुझ्यावर,

माझ्या भक्तीचा तू पाणउतारा केला,
त्या निष्पाप माणसाला का एव्हढा लवकर नेला,

मी तुझ्या सदा, रोज पाया पडते,
माझ्या लेकरांच सुख जर हिरावल तू, तर मीच तुझ्या नावाने बोट मोडते,
तर मीच तुझ्या नावाने बोट मोडते,

लेखक: प्रणव सूर्यकांत काफरे

02/08/2025

आज चा स्वतंत्रता दिवस,

15 अगस्त 1947 ला अपला भारत देश स्वतंत्र झाला,
सोन्याचा दिवस आपल्या जीवनी आला,

पण या स्वतंत्रते साठी हुतात्म्यांचे बलिदान विसरुण चालेल का,
आज काल जे देशात घडत आहे त्यावर कोणी काही बोलेल का,

का ह्याच दिवसा साठी त्यानी बलिदान दिले,
अनेक हुतात्मे हसता हसता फाशी गेले,

आज त्याच हुतात्म्यांना तुम्ही राजनीतीत ओढताय,
त्यांच्या नावावर कट कारस्थान घडवताय,

मान्य आहे आज देश प्रगती करतोय,
त्याचा डंका आपण जगभर मिरवतोय,

ज्यांच्या बलिदानावर देश उभा आहे,
आज आपल्याला मोकळं वावरायला मुभा आहे,

त्याची नावे उधळताना वाईट का नाही वाटत,
त्याची बलिदान आठवून ऊर का नाही दाटत,

आज काल जो तो नेता स्वतःचा डंका मिरवतो,
आणि समोरच्याची 4 चौघात जिरवतो,

एक मेकांचे पाय खेचण्या पेक्षा एक मेकांना हात द्या,
देशाच्या प्रगती साठी एकजुटींनी साथ द्या,

आम्ही विश्वासाने देशाची बागडोर तुमच्या हातात दिली,
त्या विश्वासाची कायम तुम्ही माती केली,

अरे आता तरी सुधारा स्वतःला,
एकजुटी आपली दिसू द्या जगाला,

जातीभेद आणि संविधानाची राजनीती बंद करा,
ह्या देशाच्या इतिहासाचा आवाज बुलंद करा,

ह्या देशात एकता तेव्हाच असेल,
जेव्हा धर्माच्या रकान्यात भारतीय लिहिलेलं असेल,

जय भारत

लेखक प्रणव काफरे

14/12/2024

मोठी बहिन ही जीवनात गरजेची असते,
आईची माया तिच्या हि नज़रेत दिसते,

स्वतःचा प्रपंच सावरता सावरता भावंडांची ही काळजी करते,
जीवनात तिच्या कीतीही कष्ट असोत तरी भावंडांसाठी ही झूरते,

चुकल्यावर समजवते कधि कधि ओरडते,
कोनत्या करेक्रमात आपमान झाला भावंडांचा, एकांतात जाऊन रडते,

जीवनात हिच्या समोर आलो की तीच हसु कधी मावळत नाही,
कितीही अडचणी येऊ दे संसारात कधीही भावंडांना कळवत नाही,

कायम मी आनंदी आहे असंच दाखवायचा प्रयत्न करते,
सगळ्यांना नात्यांना जपण्यासाठी मर मर मरते,

सगळ्यांच्या प्रगतीसाठी हिनी हिची जिद्द पणाला लावली,
अन वाईट याचाच वाटतं त्यामुळे हीची तब्येत खालावली,

सतत द्यायला हात पुढे घ्यायला कधी धी कळलच नाही,
दुसऱ्याच्या सुखासाठी राबता राबता स्वतःसाठी जगणं वळलच नाही,

माहिती आहे आम्हाला दिलेल्या प्रत्येक शब्दालाही कायम जागेल,
पण स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला कदाचित आम्हाला शिकवावं लागेल,

स्वतःसाठी नाही पण आमच्यासाठी का होईना तब्येतीची काळजी घे ग!
आयुष्यभर असाच तुझा मायेचा हात आमच्या माथी राहू दे ग!

तुझ्या सुखासाठी आमचाही ग जीव झुरतोय!
मोठ्या बहिणी शिवाय मग जीवणाला कायच अर्थ उरतोय!

सगळ्यांनी मला वचन द्या मी मोठा भाऊ आणि तुम्ही लहान बहिणी व्हायचं ह!
मी जेवढा त्रास दिलाय तुम्हाला त्याहूनही जास्त मला द्यायचा ह!

माहिती आहे या जीवनात मी खूप खूप चुकत गेलोय,
तुमचं मन कायम दुखवत गेलोय,

पण अशा चुका मी आता नाही होऊन देणार,
जेव्हा मी मोठा वाघ होईल तुम्हाला तेव्हाही खूप प्रेम देणार ,

माहितीय वाचताना तुमच ही मन हळवं झालंय,
पण पटणार नाही तुम्हाला लिहिताना माझ्याही डोळ्यात पाणी आलेय,

लेखक तुझाच लाडका भाऊ

प्रणव काफरे

Address

A303 Silverstone Residence
Pune
411028

Opening Hours

9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मनात आल ते लिहील posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category