24/02/2022
थोडा वेळ काढून नक्की पुर्ण वाचा...✍️
रियल इस्टेट एजंट.......🤔
_रियल इस्टेट मधला,_
_रियल माणूस._
1) या क्षेत्रातला कायमचा उपेक्षित माणूस. ह्या माणसाचं काम फार मोठं आणि महत्वाचं पण त्याला कायम दुय्यम दर्जाचा समजलं गेलंय.
2) नवरा नवरीचं लग्न लावताना भटजींच काम जेवढ्या वेळाचं असतं तेवढ्याच वेळाचं काम एजंटच व्यवहारात असतं. पण उभयतांच्या संसार आयुष्यभर टिकावा म्हणून तो मनोमन प्रार्थना करत असतो. दक्षिणा त्याला मिळणारच असते पण त्याबरोबर मिळणारे आशिर्वाद त्याच्यासाठी खूप महत्वाचे असतात..
3) तुम्हाला काय हवंय आणि तुमचं काय विकायचंय ह्याच बरोब्बर नॉलेज ठेऊन एजंट तुम्हाला हवं ते दाखवतो आणि ज्याला हवं त्यालाच दाखवतो..
4) घर असो की बंगला, बाग असो की एन ए प्लॉट, कमर्शिअल स्पेस असो की इंडस्ट्रियल जागा कोणाला काय सुचवायचं आणि कश्या प्रकारे दाखवायचं हे त्याला नेमकं माहीत असतं..
5) एजंट व्हायला खूप पेशंस हवेत..लोकांना वाटत की एजंट नुसते बोट दाखवायचे पैसे घेतो..पण तसं नसतं..तुमच्या व्यवहाराच्या सुरुवाती पासून ते तो पूर्ण होईपर्यंत दोन्ही बाजूच्या लोकांची मन सांभाळत, व्यवहारातले खाच खळगे बघत, कायदेशीर अडचणी असतील तर त्या सोडवून देऊन..ही सगळी तारे वरची कसरत करत हा माणूस तो व्यवहार तडीस नेण्याचं पाहत असतो..
6) व्यवहार पूर्ण झाल्यावर सुद्धा त्याचं काम संपत नसतं..पुढे दिलेल्या जागेच भाडं येतंय की नाही..किंवा जागा नावावर होतेय की नाही..कायदेशीर पूर्तता झाली की नाही हे सगळं सगळं तो लक्ष ठेऊन पाहत असतो आणि काम करत असतो..
7) व्यवहार सुरू केल्यापासून ते पूर्ण होईपर्यंत खूप मोठा टाईम स्पॅन असतो..त्यासाठी हा माणूस आपला दिवस भराचा सगळा वेळ त्याला देत असतो...त्याने दिलेला वेळ त्याने घेतलेली मेहनत ह्या सगळ्यांवर त्याचं कमीशन ठरत असतं..
8) पण जेव्हा व्यवहार पूर्ण होऊन कमीशन देण्याची वेळ येते तेव्हा बऱ्याच वेळा लोकांच्या कपाळावर आठ्या असतात.. नाकं मुरडली जातात..व्यवहार मनासारखा होऊन देखील आणि जादा पैसे मिळून देखील कमीशन देताना रडणारी किंवा काही वेळा ने देणारी सुद्धा लोक याच दुनियेत आहेत..पाहिलेली आहेत..
9) एजंट म्हणजे रिकामटेकडा माणूस नव्हे..त्याचं काम दिवस रात्र सुरूच असत..बऱ्याच वेळा फोन वरून आणि प्रत्यक्ष जागा पाहण्यात त्याचा रोजचा दिवस संपून जात असतो..दिवसभरात शेकडो निरर्थक फोन त्याला घ्यावे लागत असतात..लोकं फुकट चौकश्या करत असतात..घेणं देणं नसताना माप काढत असतात..नुस्ता किंमतीचा अंदाज घ्यायला फोन करत असतात..ह्यातून कुठे दोन चार व्यवहार महिन्याला होतात आणि त्यावर त्याची रोजी रोटी चालते..त्याच्या नॉलेजला सुद्धा किंमत असते..कारण त्याने ते स्वतःच्या अनुभवावर कमावलेलं असतं..त्याने घेतलेल्या मेहनती वर त्याला ते उमगलेलं असतं..लोकांना ते खिरापती सारखं फुकट वाटतं येत नाही..आणि त्याने ते वाटू ही नये
10) हा व्यवसाय काही लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळे बदनाम झालेला आहे.. एजंट कडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांच्या नजरेत वाईट झालेला आहे..आमच्याच व्यवसायातील लोकांनी केलेल्या चुकीच्या व्यवहारामुळे ती प्रतिमा मलीन झालेली आहे..त्यामुळे ह्या माणसाकडे आदराने पाहिलं जात नाही..
11) आमच्या व्यवसायात पारदर्शकता हा सगळ्यात मोठा यू एस पी आहे. व्यवहार करताना दोन्ही बाजूच्या लोकांना अंधारात न ठेवता जागे बद्दल असलेल्या सगळ्या गोष्टी सांगणे, दाखवणे अडचणी येणार असतील तर सांगणे, कागदपत्रे उघडपणे दाखवणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मालकाची जी अपेक्षित किंमत आहे ती खरी खुरी आहे तशी गिऱ्हाईक पुढे मांडणे..या सगळ्या गोष्टींमुळे पारदर्शकता तयार होते आणि तयार होतो कायमचा विश्वास..
12) एजंट नुसता मिळणाऱ्या कमिशनचा विचार करून काम करत नसतो..कुणाचं होणारं नवं घर असतं..कुणाचं नव दुकानं असतं..व्यवसायाची सुरुवात असते..आम्ही गाळा देतो..दुकानं सुरू होत..कुणाचा गृहप्रवेश होतो
ह्या सगळ्यात एजंट मुहूर्तमेढ रोवयला मोठा हातभार लावत असतो..तो विकणाऱ्या मालकाची आणि घेणाऱ्या गिऱ्हाईकची व्यवहार करण्याची मानसिकता तयार करत असतो..की ज्यातून दोघांचं भलं होतं आणि लोकं मनापासून शुभेच्छा देतात..ते त्याच्यासाठी कमीशन पेक्षा मोठं असतं..त्याची किंमत पैशात कधीही होणारी नसते..
13) बऱ्याच वेळा लोकांना आपल्याच जागेचा भाव माहीत नसतो..
करता आला तरी व्यवहार कसा करायचा कळत नसतं.. कागदपत्रं काय पहायची ते कळतं नसत..कायदेशीर अडचणी माहीत नसतात..पैशाची अॅडजेस्टमेंट कशी करायची समजत नसतं..ह्या सगळ्या किचकट गोष्टीत हा एजंट तुम्हाला सहीसलामत व्यवहार पार पाडून देत असतो..
14) एजंट कमीशन एकदाच घेतो पण दोन्ही बाजूच्या लोकांचा शाश्वत फायदा करून देत असतो..
15) म्हणून हा एजंट ह्या रियल इस्टेट मधला एकदम खरा खुरा रियल दुवा असतो..
14) आता ह्या व्यवसायाला सरकारने अधिकृत मान्यता देऊन नवीन रेरा कायद्याने परवाना देऊ केला आहे..त्यामुळे ह्या व्यवसायाला आता अधिक कायद्याचं बळ आलं आहे..
15) त्यामुळे कमीशन एजंट कडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांनी आता बदलायला हवा..
16) तो नुसतं बोट दाखवून पैसे घेत नाही..तो दोन्ही बाजूच्या लोकांची बोटात बोट धरून ठेवण्याचे पैसे घेतो
धन्यवाद ...🙏🏻