26/05/2015
घर म्हणजे केवळ चार भिंती नव्हे, तर त्यात विसावलं जाणारं नातं असतं.
रोजच्या धावपळीत देखील चार क्षण स्वतःशी संवाद साधायला मिळणं काहीसं कठीण झालंय खरं...म्हणूनच, तुम्हाला विश्वासाची ऊब, स्नेहाची सावली देणाऱ्या घरांची खरी गरज आहे. म्हणूनच, आम्ही प्रत्येक घराची निर्मिती करताना इथे राहू पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात डोकावतो आणि त्यातूनच कृपासिंधू सारखी सुंदर निर्मिती घडते. पुण्यात बाणेरसारख्या मोक्याच्या तरीही तितकीच शांतता लाभलेल्या परिसरात दिमाखात उभ्या राहिलेल्या कृपासिंधू या मोजक्या घरांच्या प्रकल्पाची हाक, कदाचित तुमच्या मनाचीही असू शकते....एकदा येऊन तर पाहा....खिशाला सहज परवडणाऱ्या, उत्कृष्ठ दर्जाच्या आणि सुरेख वास्तूरचना लाभलेल्या घरांचा शोध इथे येऊन थांबतो....