Malvani Blog's - मालवणी गजाली.

Malvani Blog's - मालवणी गजाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवीन प्रकल्प, सुरू असलेले प्रकल्प, नवीन येणारे प्रकल्पाविषयी

02/04/2026

🚨 कोकणचा आक्रोश : आमच्या घरात आम्हीच उपरे..?? आम्हाला मडगाव (गोवा) ला जाणाऱ्या गाड्या नकोच! 🚨
:- सर्व लोकप्रतिनिधींना आणि रेल्वे प्रशासनाला कळकळीची विनंती.

मुंबईहून मडगावपर्यंत धावणाऱ्या गाड्यांमुळे सातत्याने कोकणी माणसावर अन्याय होत आहे. *"गोवा म्हणजे कोकण नव्हे!"* गोव्याला जाणाऱ्या गाड्यांना आता आमचा तीव्र विरोध आहे. कोकण भूमीवरून परराज्यात जाणाऱ्या गाड्यांना विरोधच.

काय आहे कोकणवासीयांची व्यथा?

😡 गोव्याचा पर्यटकांची चंगळ आणि कोकणी माणसाची फरफट!: गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांचा प्रचंड ओढा असल्यामुळे मडगाव आणि थिवीम स्थानकावर नेहमीच अलोट गर्दी असते. या पर्यटकांमुळे *'कोकणकन्या' आणि 'मांडवी'* एक्सप्रेसमध्ये कोकणच्या स्थानिक जनतेला साधी तिकिटेही मिळत नाहीत. *सणासुदीला तर 'Waiting List' कधीच क्लिअर होत नाही.*

❌ नावापुरत्या जलद गाड्या:
प्रशासनाने *'तेजस' आणि 'वंदे भारत'* सारख्या अत्याधुनिक गाड्या सुरू केल्या, *पण त्याचा कोकणी माणसाला काय उपयोग? या गाड्यांना कोकणात जेमतेम २-३ थांबे दिले जातात.* या *गाड्या फक्त आणि फक्त गोव्याच्या पर्यटकांसाठीच चालवल्या जातात का?*

आमच्या प्रमुख मागण्या:
✅ कोकण मर्यादित गाड्या सोडा: -
गाड्या केवळ रत्नागिरी आणि सावंतवाडीपर्यंतच सोडण्यात याव्यात.
✅ 'तुतारी' सारखी गाडी हवी:
दादर ते सावंतवाडीपर्यंत धावणारी 'तुतारी एक्सप्रेस' ही खऱ्या अर्थाने कोकणची जीवनवाहिनी आहे. ही गाडी कोकणातील सर्व महत्त्वाच्या स्थानकांवर थांबते. अशा प्रकारच्या कोकण मर्यादित जास्तीत जास्त गाड्या सुरू करा, जेणेकरून कोकणी माणसाला आपल्या हक्काची आणि खात्रीशीर जागा मिळेल.
✅सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्ण करा:
कोकणी लोकांसाठी सावंतवाडी टर्मिनस हा आमचा हक्क आहे! या टर्मिनसचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करून तेथूनच गाड्यांचे संचलन सुरू करा, जेणेकरून गोव्यावर अवलंबून राहावे लागणार नाही.

कोकणी माणसाच्या हक्कासाठी हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवा! 🚩

*विचार करा..!!*
*आता नाही तर पुन्हा कधीच नाही.*

#कोकण_रेल्वे #कोकणचा_हक्क

28/03/2026

🚨 पुणे-कोकण रेल्वेला 'खो' आणि बिहारच्या गाड्यांना 'ओ'! मध्य रेल्वेचा मराठी माणसावर उघड अन्याय! 🚨

रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्राची आणि विशेषतः कोकणी चाकरमान्यांची सतत फसवणूक सुरूच आहे. दादर रत्नागिरी पॅसेंजर नंतर आता पुण्यातून कोकणासाठी गाडी नाकारून, मध्य रेल्वेने आता थेट बिहारसाठी 'अमृत भारत एक्सप्रेस' सुरू करत मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

काय आहे मध्य रेल्वेचा नवा डाव ?

१. खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पुणे-कोकण दरम्यान रोजची ट्रेन सुरू करण्याची मागणी केली असता, मध्य रेल्वेने पुण्यात 'टर्मिनलची अडचण' आणि 'मार्गाची अडचण' (Path constraints) असल्याचे कारण सांगून कोकणच्या गाडीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या.

२. पण संतापाची बाब म्हणजे, याच 'अडचणी' असलेल्या पुणे स्टेशनवरून ११४३१/११४३२ पुणे-दानापूर (बिहार) अमृत भारत एक्सप्रेस मंजूर करण्यात आली आहे. जी आधी स्पेशल म्हणून सुरू होती.

३. विशेष म्हणजे ही गाडी 'मध्य रेल्वेच्या मालकीची' (CR Owning) आहे. याचा सरळ अर्थ असा की, या बिहारला जाणाऱ्या गाडीचे मेंटेनन्स (देखभाल) पुण्यातच होणार आहे.

४. पुण्यात आधीच जागा नसताना हा मेंटेनन्स आणि पार्किंगचा स्लॉट बिहारच्या गाडीला दिल्यामुळे, आता भविष्यात महाराष्ट्रातील किंवा कोकणातील गाड्यांसाठी मध्य रेल्वेकडे क्षमताच उपलब्ध राहणार नाही! हा कोकणवासीयांवर अन्याय नाही तर काय आहे?

*पैसा महाराष्ट्राचा, फायदा परप्रांतीयांचा?*
कोणत्याही नवीन रेल्वे प्रकल्पात महाराष्ट्र राज्य शासन ५०% आर्थिक वाटा उचलते. मग या रेल्वे प्रकल्पांचा आणि पायाभूत सुविधांचा पहिला फायदा राज्यातील जनतेला, इथल्या भूमिपुत्रांना व्हायला नको का? आपल्याच घामाच्या पैशातून उभ्या राहिलेल्या सुविधांचा लाभ उत्तरेकडील राज्यांना का?

*महाराष्ट्रातील गाड्यांना सापत्न वागणूक!*
हा दुजाभाव केवळ कोकणापुरता मर्यादित नाही. महाराष्ट्रांतर्गत धावणाऱ्या 'नांदेड-पुणे' आणि 'पुणे-हरंगुळ' एक्सप्रेस यांसारख्या हक्काच्या गाड्या मुख्य पुणे स्टेशनवरून चक्क बाहेर 'हडपसर'ला फेकल्या गेल्या. स्वतःच्याच राज्यातील प्रवाशांना अशी दुय्यम वागणूक का? परराज्यात जाणाऱ्या गाड्यांना मुख्य स्टेशनवर रेड कार्पेट आणि महाराष्ट्राच्या गाड्यांना मात्र हद्दपारी? मध्य रेल्वे महाराष्ट्रावर आणि मराठी माणसावर एवढा दुजाभाव का करत आहे?
मराठी माणसाची आणि कोकणी चाकरमान्यांची ही गळचेपी आता सहन करण्यापलीकडे गेली आहे. हा अन्याय असाच खपवून घ्यायचा का?

(हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करा आणि या अन्यायाविरुद्ध तमाम मराठी बांधवांनी एकत्र आवाज उठवा!) 📢🚆🚩

Ministry of Railways, Government of India
Central Railway

Mahesh Baliram Sawant
Avinash Jadhav MNS
Abhijeet Desai MNS - अभिजित देसाई

16/03/2026
10/03/2026

सावंतवाडी रेल्वे स्थानकाचा गळा कुणी आवळला? 😡💢
कोकणच्या विकासावर घाला घालणाऱ्या प्रशासनाचा जाहीर निषेध! 🚩📢

​कोकणातील 'दक्षिण द्वार' समजले जाणारे सावंतवाडी रेल्वे स्थानक आज अन्यायाचे बळी ठरत आहे.
कोरोना काळाचे निमित्त करून येथील महत्त्वाचे थांबे काढून घेण्यात आले, ते अद्याप पूर्ववत का झाले नाहीत? हा प्रश्न प्रत्येक कोकणवासीयाने विचारण्याची वेळ आली आहे!

🛑 रेल्वे प्रशासनाकडे आमचे मुख्य प्रश्न:
१. कोरोना काळात बंद झालेले थांबे अजून सुरू का नाहीत?
२. सावंतवाडीच्या विकासाचा मार्ग कुणी रोखला?
३. वंदे भारत सारख्या आधुनिक गाड्यांना येथे थांबा का नाही?
४. देशाच्या राजधानी दिल्लीला जोडणारी एकही गाडी सावंतवाडी सारख्या ऐतिहासिक, संस्थानकालीन तालुक्यात का थांबत नाही?
५. वंदे भारत, राजधानी, दूरंतो, तेजस सारख्या एकाही प्रीमियम गाडीला सावंतवाडी थांबा का नाही?

✊​आमच्या प्रमुख मागण्या - त्वरित अंमलबजावणी करा! 🚂
१. ​राजधानी एक्सप्रेस (१२४३१/३२): पूर्वीचा थांबा तातडीने पूर्ववत करा! (कोरोना काळात हा थांबा काढण्यात आला.)
२. ​गरीब रथ एक्सप्रेस (१२२०१/०२): सर्वसामान्यांची ही गाडी पुन्हा सावंतवाडीत थांबवा! (कोरोना काळात हा थांबा काढण्यात आला.)
३. ​वंदे भारत एक्सप्रेस (२२२२९/३०): आधुनिक कनेक्टिव्हिटीसाठी मुंबई-मडगाव वंदे भारतला येथे थांबा द्या! (दुसऱ्या टप्प्यात ही गाडी सावंतवाडीत थांबणार ही घोषणा)
४. ​मुंबई-मंगलोर एक्सप्रेस (१२१३३/३४): कोकणच्या प्रवाशांसाठी हा थांबा अत्यंत आवश्यक!

​हा लढा का महत्त्वाचा आहे? ❓
⛱️💵​रोजगार आणि पर्यटन: पर्यटकांची संख्या वाढल्यास स्थानिक हातांना काम मिळेल.
🧑‍🔧🧑‍💻​विद्यार्थ्यांचे भविष्य: शिक्षणासाठी बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जलद प्रवासाची सोय हवी.
👫🕺​चाकरमान्यांची सोय: मुंबईत राहणाऱ्या कोकणी माणसाचा प्रवास कमी खर्चात आणि वेळेत व्हावा.

​सावंतवाडीच्या विकासाचा मार्ग रेल्वे प्रशासनाने रोखला आहे, तो मोकळा होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही! ✊🔥

Ministry of Railways, Government of India
Konkan Railway Corporation Ltd

06/03/2026

🚌 खुशखबर! नवीन बस सेवा सुरू! 🚌

*बांदा - सावंतवाडी रेल्वे स्थानक - सावंतवाडी शहर* दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

बांदा पंचक्रोशीत राहणाऱ्या सर्व स्थानिक नागरिकांनी आणि गावी येणाऱ्या-जाणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांनी कृपया या सुविधेची नोंद घ्यावी आणि आपला प्रवास अधिक सोयीस्कर करावा.

*🕒 नवीन बस फेरीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:*
१) बांदा - सकाळी ७:१५ (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी - सकाळी ८:००
२) सावंतवाडी - सकाळी ९:०० (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा - सकाळी ९:४५
३) बांदा - सकाळी ९:५० (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी - सकाळी १०:३५
४) सावंतवाडी - सकाळी ११:३० (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा - दुपारी १२:१५
५) बांदा - सकाळी ११:३० (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी - दुपारी १२:१५
६) सावंतवाडी - दुपारी १२:२५ (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा - दुपारी १३:१० (१:१०)
७) बांदा - दुपारी १३:२० (१:२०) (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी - दुपारी १३:४५ (१:४५)
८) सावंतवाडी - दुपारी १४:०० (२:००) (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा - दुपारी १४:४५ (२:४५)
९) बांदा - दुपारी १४:५५ (२:५५) (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी - दुपारी १५:४० (३:४०)
१०) सावंतवाडी - सायं. १७:०० (५:००) (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा - सायं. १७:४५ (५:४५)
११) बांदा - सायं. १७:५५ (५:५५) (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी - सायं. १८:४० (६:४०)

🙏 सर्व प्रवाशांनी या नवीन बस सेवेचा आणि वेळापत्रकाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही विनंती.

ही सेवा सुरू करण्यासाठी अथक परिश्रम करणारे निगुडे गावचे माजी उपसरपंच श्री गुरुनाथ गवंडे यांचे कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी कडून जाहीर अभिनंदन.!

(हा मेसेज आपल्या मित्र-परिवाराला आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांना नक्की शेअर करा!) 📲

सागर तळवडेकर
उपाध्यक्ष, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी.

Konkan Railway Corporation Ltd
to #सावंतवाडी via #रेल्वे #स्टेशन
Sawantwadi

*🚂 सावंतवाडी रेल्वे टर्मिनस: फक्त घोषणांचा 'पाऊस' की विकासाचा दुष्काळ? 🚂*प्रति,सन्माननीय लोकप्रतिनिधी,सावंतवाडीच्या विका...
02/02/2026

*🚂 सावंतवाडी रेल्वे टर्मिनस: फक्त घोषणांचा 'पाऊस' की विकासाचा दुष्काळ? 🚂*

प्रति,
सन्माननीय लोकप्रतिनिधी,

सावंतवाडीच्या विकासाचे स्वप्न आम्ही गेली अनेक वर्षे पाहत आहोत, पण दुर्दैवाने ते अजूनही कागदावरच आहे.

*१५/०२/२०२५ च्या पोस्टचा संदर्भ घेता, आज वर्ष उलटून गेले तरी परिस्थिती "जैसे थे" आहे.*

*🗓 मे २०१९:* 'रेलोटेल हॉटेल'चे थाटामाटात भूमिपूजन झाले (हस्ते: तत्कालीन विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू, या प्रकल्पाची घोषणा जून २०१५ ला केली होती).

*🗓 फेब्रुवारी २०२५:* तेच हॉटेल पुन्हा बांधणार अशी नवी घोषणा झाली (सन्माननीय स्थानिक आमदार).

*पण साहेब,प्रश्न तोच आहे... प्रत्यक्ष काम कधी दिसणार?*

*🔹 तिलारीचे पाणी: टर्मिनससाठी पाणीपुरवठा करणारी निविदा प्रक्रिया कुठे अडकली? याचे उत्तर आजही अनुत्तरित आहे.*
*🔹 सुविधा: नवीन प्लॅटफॉर्म, रेल्वे रूळ आणि हॉटेलच्या घोषणा या केवळ 'पोकळ' ठरल्या आहेत का?*

*🙏 सावंतवाडीकरांची एकच कळकळीची विनंती:*
आता केवळ आश्वासने नकोत. आता घोषणा न करता, 'परिपूर्ण रेल्वे कोचिंग टर्मिनस' साठी तातडीने आणि जोमाने निधीची तरतूद करावी. कोकणच्या रेल्वे विकासाला खऱ्या अर्थाने गती द्यावी.

केंद्रीय अर्थसंकल्प काल मांडण्यात आला, भारतीय रेल्वे करिता 2.81 लाख करोड रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली. त्यात कोकणाला किती हा प्रश्न अनुत्तरित आहे.

राज्याचा अर्थसंकल्प तोंडावर आहे त्याआधीच या टर्मिनस करिता निधीची तरतूद होणे अत्यावश्यक आहे.

आणि हो,
*मत हवे तर टर्मिनस द्या..!!*
*हाच जनतेचा आवाज,*
*एक जागरूक सावंतवाडीकर 🛤️✨*

https://www.facebook.com/share/1DQzLYApZW/

सावंतवाडी रेल्वे स्टेशनवरील विकासकामांसाठी ‘रत्नसिंधू’ योजनेतून सुमारे ३९ कोटी रुपये खर्चाच्या कामाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. लवकरच या ठिकाणी रेल हॉटेल, नवे प्लॅटफॉर्म व छोट्या निवासी खोल्या उभारण्यात येणार असून तिलारी धरणाचे पाणी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला देण्याची निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. रत्नसिंधू योजनेचा अध्यक्ष या नात्याने मी काल (बुधवार) सुमारे दोन तास सावंतवाडी-मळगाव रेल्वे टर्मिनसच्या जागेची पाहणी केली. तसेच तुतारी एक्सप्रेसमध्ये बसून नवीन आराखड्याची चर्चा केली.

या वेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, स्टेशन मास्टर कृष्णकांत परब, रेल्वेचे अधिकारी जे. पी. प्रकाश, ए. बी. फुले, सूरज परब, सुनील परब, श्री. गाड, योगेश तेली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वैभव सगरे उपस्थित होते.

27/01/2026

📢 कोकणचा आक्रोश! माननीय मुख्यमंत्री साहेब, लक्ष द्या! 📢

​विषय: सावंतवाडी 'टर्मिनस' की फक्त स्वप्न..? १० वर्षे झाली, 'हक्काची गाडी' कधी मिळणार?🚆
जिल्ह्यातील पत्रकारांनी आतातरी आवाज उठवावा.

​कोकणवासियांनो, 🙏

उद्या राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस कणकवली दौऱ्यावर येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या गदारोळात आपल्या सावंतवाडी टर्मिनसचा वनवास विसरून चालणार नाही.

आज १० वर्षे झाली, पण आमचं टर्मिनस अजूनही 'तहानलेलं' आहे!

​🚂 १० वर्षांचा वनवास आणि प्रशासकीय चेष्टा!
२०१५ मध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते भूमिपूजन झालं, पण आज कोकण रेल्वेचे अधिकारी विचारतात, "हे टर्मिनस आहे याचा पुरावा काय?" हा राष्ट्रपतींच्या मंजुरीचा आणि कोकणवासीयांचा अपमान नाही का? कोकणवासीयांनी पाहिलेल्या स्वप्नांचा चुराडा नाही का..??

💧 पाणी योजना फक्त 'कागदावरच'!
सावंतवाडी टर्मिनस साठी पाण्याची व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे, तरच खऱ्या अर्थाने टर्मिनस कार्यान्वित होईल. त्यामुळे सावंतवाडी टर्मिनस प्रकल्पाला तिलारी आंतरराज्य धरणातून पाण्याची योजना प्रस्तावित करण्यात आली होती.
पण सत्य काय? 👇
आजही ही योजना केवळ कागदावरच आहे असे दिसते. कारण १५ कोटींची ही योजनेला अजून मंजुरी मिळालीच नाही.
म्हणजे १० वर्षे फक्त गप्पा? १५ कोटींची योजना लाल फितीत अडकली आणि आमचं टर्मिनस कोरडं पडलं!

🏢 रेलटेल आणि टर्मिनस इमारतीचे भविष्य काय ..?
सावंतवाडी रेल्वे स्थानकात २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागांतर्गत MTDC मार्फत रेल्वे बजेट हॉटेल बांधण्यात येणार होते. त्यातच वर हॉटेल आणि खाली टर्मिनस इमारत असा प्लॅन तयार करण्यात आला. त्यासाठी त्यावेळची चांदा ते बांदा योजने अंतर्गत (आता सिंधुरत्न समृद्धी योजना) ३.५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. परंतु कोकण रेल्वे सोबत समन्वयाअभावी हा मंजूर निधी MTDC ने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग येथे जमा केला. आणि रेलोटेलचे स्वप्न देखील भंगले.

🚩 आदरणीय फडणवीस साहेब, आमची एकच विनंती:
आपण कोकणातील ज्या पहिल्या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते तो प्रकल्प आपल्याच हस्ते सुरू व्हावा ही विनंती.*
आतापर्यंत विविध विभागामार्फत या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करण्यात आला. परंतु शासकीय विभागातील समन्वयाअभावी निधी चा विनियोग होत नसल्याने हा प्रकल्प मित्रा या संस्थेकडे देणे उचित ठरेल. त्यासाठी आपण कोकण रेल्वे महामंडळाला निधी द्या किंवा ह्या महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीन करा, *पण तिलारीचं पाणी सावंतवाडी रेल्वे स्थानकात पोहोचवा आणि सावंतवाडीला खऱ्या अर्थाने 'टर्मिनस' बनवा.*

🙏🏻 कोकणची जनता आता आश्वासन नाही, ॲक्शन मागत आहे! राज्याच्या येणाऱ्या अर्थसंकल्पात हा १० वर्षे प्रकल्प रखडलेला प्रकल्प मित्रा (MITRA) कडे हस्तांतरित करा.🙏🏻

​जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या पत्रकार मित्रांना हे प्रश्न विचारायला सांगा!

CMOMaharashtra श्री Devendra Fadnavis साहेब. आपल्या माहितीसाठी.

#स्थानिक #स्वराज्य #संस्था #निवडणूक
#जिल्हापरिषद #पंचायतसमिती
#वेंगुर्ला

10/01/2026

*तात्पुरती ‘बस’ नको, हक्काची ‘ट्रेन’ हवी! - सावंतवाडी रेल्वे टर्मिनससाठी एक आर्त हाक 🚂📣*
- कोकणी चाकरमान्याचा काळजातून टाहो 🚂💔

प्रति,
तमाम भावी नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी,

हात जोडून एकच विनंती आहे... यावेळी मतांचा जोगवा मागायला येण्याआधी, दोन मिनिटं आमचं हे दुःख समजून घ्या. 🙏

*साहेब, निवडणुका आल्या की कोकणी माणसाची आठवण येते.* दरवर्षी गणेशोत्सवात आपल्या वॉर्डातील लोकांसाठी ‘मोफत बस सेवा’ 🚌 सुरू करण्याची चढाओढ लागते. तुमच्या या प्रेमाबद्दल आणि मदतीबद्दल नक्कीच आदर आहे. पण एक विचारू? दरवर्षी ही मलमपट्टी करण्यापेक्षा, त्या जखमेवर कायमचा इलाज का केला जात नाही?

साहेब, आम्ही मुंबईत राबराब राबतो, पण आमचा आत्मा 'कोकणात' असतो. वर्षातून एकदा गणपतीला किंवा शिमग्याला गावी जायची वेळ येते, तेव्हा आनंदापेक्षा आमच्या वाट्याला येतात त्या 'यातना'. 😢

ही तात्पुरती मलमपट्टी आम्हाला आता नकोय! 🚫

आम्ही भिकारी नाही, आम्ही कष्टाळू कोकणी चाकरमानी आहोत. आम्हाला फुकटचा प्रवास नको, आम्हाला सन्मानाचा आणि हक्काचा रेल्वे प्रवास हवा आहे!

आमच्या सुरक्षित आणि सुखकर रेल्वे प्रवासासाठी परिपूर्ण सावंतवाडी टर्मिनस होणे अत्यावश्यक आहे तर ते होण्यासाठी नगरसेवक म्हणून आपण लक्ष द्यायला हवे.
अन्यथा रेल्वे प्रवासात आम्हाला धक्के खावे लागत असतील, तर हे आमचं दुर्दैव की तुमचं अपयश?

जर कोकणात परिपूर्ण सावंतवाडी रेल्वे टर्मिनस उभारले गेले तर ...
१. 🔥 कल्याण, वसई आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून थेट सावंतवाडीसाठी नियमित गाड्या सोडणे शक्य होईल.*
२. 🔥 सणासुदीला जादा गाड्यांचे नियोजन याच टर्मिनसवरून करणे शक्य होईल.*

कोकणी बाणा हा आहे की, जो आमच्या हक्कासाठी लढेल, त्याच्या पाठीशी हा समाज खंबीरपणे उभा राहील. भावी नगरसेवक म्हणून आम्हाला तुमच्याकडून ‘बसेस’ची अपेक्षा नाही, तर ‘ट्रेन’च्या रुळावर धावणाऱ्या प्रगतीची अपेक्षा आहे.

तुम्ही सभागृहात आणि प्रशासनासमोर सावंतवाडी टर्मिनससाठी आवाज उठवाल, तरच कोकणी चाकरमान्याचा प्रवास सुखाचा होईल.

आता तात्पुरती सोय नको, तर कायमचा उपाय हवा! आम्हा मुंबईकर कोकणी चाकरमान्याला न्याय हवा.

आमच्या डोळ्यांतील ही 'तळमळ' समजून घ्या आणि आम्हाला आमची हक्काची 'कोकण रेल्वे' द्या!

आपलाच,
मुंबईतील एक व्यथित कोकणी चाकरमानी 😔🌴

वरील फोटो क्रेडिट - अजय धवल.

#चाकरमानी #मुंबईकर #कोकण #महानगरपालिका #निवडणूक #ठाणे #भांडुप #दादर #दहिसर #कुडाळ #दिवा #डोंबिवली
आदी...!!

कोकणी चाकरमान्यांची गैरसोय टाळावी आणि अत्यावश्यक असलेले कोकणातील हे टर्मिनस पूर्ण करावे ही विनंती.

मेकॅनिक   दोन वर्षांपुर्वी मी मुरुड मार्गे श्रीवर्धनला गेलो होतो. मुरूडच्या पुढे आगरदांड्याहून रो रो (अशी बोट ज्यामध्ये ...
09/01/2026

मेकॅनिक
दोन वर्षांपुर्वी मी मुरुड मार्गे श्रीवर्धनला गेलो होतो. मुरूडच्या पुढे आगरदांड्याहून रो रो (अशी बोट ज्यामध्ये कार आणि बस देखील वाहून नेल्या जातात) मध्ये गाडी चढवून पुढे दिघी आणि दिवेआगर मार्गे श्रीवर्धनला पोचलो होतो. दुसऱ्या दिवशी मी दुपारी थोडं उशीरा निघालो आणि जेव्हा मी मुरुडमधून बाहेर पडून अलिबागकडे निघालो तेव्हा अंधार पडायला सुरुवात झाली होती. मुरूडपासून पुढे नांदगांव गेल्यावर रस्त्यावर गडद अंधार पडला होता.
काशिदचा समुद्र किनाऱ्यावरून जात असताना मागून एक फोर व्हीलर वेगाने मला ओवरटेक करून पुढे निघून गेली. पुढे काशिद गेल्यावर बारशिव गाव लागतं. बारशिव गेल्यावर रस्त्याच्या कडेला काही मिनिटांपुर्वी मला ओवरटेक करून गेलेली गाडी उभी दिसली. त्या गाडीतून उतरून दोघांनी मला रस्त्यात आडवे येऊन थांबवले. गाडीवर एम एच बारा पासून सुरू होणारा नंबर होता. त्यांची स्कॉर्पिओ बंद पडली होती. गाडीत आणखीन चार जण बसलेले होते.
मला त्यांनी विचारले इथे रस्त्यात कुठे गॅरेज आहे का? मी म्हटले मला काही कल्पना नाहीये. गॅरेज असले तरीही आता आठ वाजायला आले आहेत तिथं कोणी मिळणार नाही. इकडे लवकर बंद करून जातात.
बरं आमच्यापैकी दोघं जण तुमच्यासोबत गाडीत येतो रस्त्यात गॅरेज असेल तर मेकॅनिकला घेऊन येऊ. रस्त्यावर अंधार पडलेला होता. इतर वाहनांची पण वाहतूक तुरळकच होती.
एकाचे गॅरेज वाल्या पर्यंत लिफ्ट द्या म्हणून सांगून झाल्यावर दुसरा म्हणाला की, नाहीतर असं कराल का, आम्हाला अलिबाग पर्यंत ड्रॉप कराल का तुम्ही.
मी त्यांना विचारले आता काही वेळापुर्वी तुम्ही वेगाने मला ओव्हरटेक करून आलात आणि लगेच गाडी कशी काय बंद पडली. काय झालं आहे गाडीला.
आता गाडीत बसलेले चौघेही गाडीतून खाली उतरले. दारू पिऊन झिंगले होते पण गाडी चालवणारा आणि त्याच्यासोबत अगोदर उतरलेला दोघांनी दारू प्यायल्या सारखी वाटत नव्हती.
सगळ्यांचे वय एकवीस बावीस वर्षे असावं. एकाच कॉलेज मधील ते सगळे अलिबाग मुरुड फिरायला आलेले पर्यटक वाटत होते.
गाडी चालवणारा मुलगा बोलला की गाडी बंद पडली आहे आणि आता चालूच होत नाहीये काहीच कळत नाही काय झालंय.
मी विचारले काय करता तुम्ही सगळे जण, त्यांनी सांगितलं की आम्ही इंजिनियरिंग करतो आहोत. तिसऱ्या वर्षाला आहोत.
मला त्या सगळ्यांची मजाच वाटली, ऑटोमोबाईल इंजिनियरिंग करत आहेत आणि गाडीला काय झालं आहे ते या सगळ्यांपैकी कोणालाही कळत नाहीये.
मी गाडी जवळ गेलो तर गाडीचे बोनेट गरम झाल्याचे जाणवले. तरीही गाडीला चावी लावून फिरवायला सांगितली, गाडीच्या पॅनल वर हाय टेम्परेचरचा इंडिकेटर दिसला. माझ्या अंदाजाप्रमाणे गाडी गरम होऊनच बंद पडली होती.
गाडी चालवणाऱ्याला विचारले, तुला इंजिन टेम्परेचर वाढले ते दिसले नाही का, त्यावर तो म्हणाला आजपर्यंत कधी बघितलेच नाही आणि टेम्परेचर बघायचं म्हणून कोणी सांगितलं पण नाही. आज पहिल्यांदाच असं झालं.
मी मनात म्हटलं मीच बरं यांना सांगतोय की गाडी चालवताना इंजिन टेंपरेचर वगैरे बघायचं असतं.
गाडीचे बोनेट उघडायला सांगितले, बोनेट उघडल्यावर त्यातून गरम वाफा निघायला लागल्या त्यातून जळलेल्या ऑइलचा वास येऊ लागला.
त्या बघून झिंगेलेल्या चौघांची दारू उतरली. बाप रे इंजिन जाळलं की काय रव्याने गाडी जोरात पळवून. काय रे रव्या लावलीस का आता वाट असे बोलून एकजण गाडी चालवणाऱ्या कडे रागाने बघू लागला.
त्यांना सांगितले इंजिन वगैरे काही जळलं नाही, इंजिन गरम झाल्याने त्याच्यावर लीक झालेले ऑईल गरम होऊन त्याचा जळाल्या सारखा वास येतो आहे.
रेडिएटर मध्ये कुलंट आहे का बघा, सांगितल्यावर सगळे माझ्या तोंडाकडे बघू लागले. त्यांना बोटाने रेडिएटर आणि कुलंटचा टँक दाखवला. कुलंटचा टँक रिकामाच होता, एकजण रेडिएटरचे झाकण उघडायला गेला तर त्याच्या हाताला चटका बसला, त्याला सांगितले गाडी पुसायच्या फडक्याने उघड ते झाकण. रेडिएटर मध्ये बिलकुल कुलंट नव्हते. गाडीच्या खाली मोबाईल ची बॅटरी ऑन करून बघितले तर कुलंटचे थेंब ठिपकत होते.
रेडिएटर आणि इंजिनला जाणारा रबरी पाईप लीक झाला होता. रव्या बोलला आता हा पाईप कुठे आणि कधी मिळायचा. गाडी आता रात्रभर इथेच ठेवावी लागणार आणि उद्या टोविंग करून न्यावी लागणार.
ते सगळे मला बोलायला लागले. आम्ही एकमेकांच्या मांड्यांवर बसतो आम्हाला प्लीज अलिबाग पर्यंत घेऊन जाल का?
मी मनात म्हटलं यांची आता थोडी गंमत करू या.
त्यांना बोललो, हे बघा गाडी अलिबाग पर्यंत टोविंग करायचे तीन चार हजार जातील, इंजिन गरम होऊन गाडी बंद पडल्याने ते दुरुस्त करायला सात आठ हजार जातील आणि मेकॅनिक काम करायचे चार पाच हजार घेईल. दहा पंधरा हजार तर जातीलच शिवाय रात्रभर गाडी इथे रस्त्यावर बेवारस म्हणून पडून राहील. दोघांनी हो दादा तुम्ही सांगताय ते बरोबर आहे पण आता काय करणार.
मी तुमची गाडी आता पंधरा मिनिटांत चालू करून देतो पण मला पाच हजार द्यावे लागतील.
दोघांनी एकदम पाचच हजार ना मग दिले असं समजा आणि एकदाची गाडी चालू करून दया असं सांगितलं.
मी माझ्या गाडीतून स्वीस नाईफ काढला, त्यांच्या गाडीचा रबरी पाईप जिथून लीक झाला होता त्याचा रेडिएटर वरील चिमटा काढून , लीक झालेला भाग कापून रेडिएटरला जोडला, पाईप ची लांबी कमी झाल्याने लावताना थोडी ओढाताण आणि त्रास झाला पण पाईप लागला, त्यावर घट्ट बसणारा चिमटा लावला.
त्यांच्यापैकी एकजण विचारू लागला आता कुलंट कुठून टाकणार तुम्ही, कुलंट शिवाय गाडी कशी चालू होणार ?
मी त्यांच्याकडे गाडीतील पाण्याच्या बाटल्या काढायला सांगितल्या गाडीत पिण्याचे पाणी कमी आणि बिअरचे कॅन जास्त असल्याचे त्यांनी दात दाखवत सांगितले. मी माझ्या गाडीतून पाण्याची दीड लिटर ची बाटली काढली. रेडिएटर मध्ये आणि कुलंट टँक मध्ये पाणी भरले. रेडिएटरचे झाकण उघडे ठेऊन रव्याला गाडी स्टार्ट करायला सांगितली.
रव्या गाडी स्टार्ट करण्यासाठी चावी फिरवू लागला, इंजिनची थोडी घर घर पण गाडी स्टार्ट झाली नाही.
माझी फजिती झाली असं वाटून एकजण दुसऱ्याच्या कानात कुजबुजला बघ मी बोलत होतो ना हा आपल्याला चूत्या बनवतो आहे.
मी रव्याला बोललो खाली उतर आणि सगळ्यांना धक्का मारायला सांग, माझ्या पण लक्षात नव्हते आणि गाडीची लाईट सुरूच ठेवल्याने बॅटरी डाऊन झाली होती. मी गाडीत बसून त्यांना सगळ्यांना धक्का मारायला लावला, गाडी थोडी पुढे गेली आणि गिअर मधे टाकून लगेच चालू झाली. रेडिएटर चे झाकण उघडे होते त्यातून हवा बाहेर आल्यावर पाण्याची आणखीन भर घालून झाकण लावून बंद केले.
त्यातील एकजण विचारू लागला आता गाडी बंद तर नाही ना पडणार आणि कुलंट ऐवजी साधं पाणी टाकलं आहे त्याच्याने नुकसान तर नाही ना होणार.
मला हसायला आलं. त्यांना बोललो माझे पाच हजार द्या मग काय ते सांगतो.
त्यावर एकाने मोबाईल वर जी पे ॲप ओपन करून
माझा जी पे नंबर मागितला.
तुमची गाडी आता बंद पडणार नाही फक्त चाळीस पन्नासच्या स्पीड ने चालवा. कुलंट मध्ये ऐंशी टक्के पाणीच असतं इंजिन मध्ये गंज लागू नये आणि कुलिंग आणखीन चांगले व्हावे म्हणून त्यात केमिकल असतात. गाडी हळू चालवली तर काही बिघडणार नाही.
उद्या सकाळी अलिबाग मध्ये कुलंट विकत घ्या आणि रेडिएटर मधील दोन लिटर पाणी काढून त्यात कुलंट टाकून घ्या. रेडिएटर मधील पाणी कुठून काढायचं ते पण त्यांना दाखवले.
त्यांना विचारले इंजिनियरिंगच्या तिसऱ्या वर्षाला आहात, तिथं कॉलेज मध्ये काही शिकवत नाही का रे तुम्हाला.
नाही दादा आम्ही कॉलेजमध्ये नुसतं टाईमपास करतो लेक्चर बंक मारतो आणि लेक्चर मधे असलो तरी अर्ध लक्ष मोबाईल मध्ये असतं. लाख लाख रूपये भरून क्लासेस लावतो आणि परीक्षा पास होतो.
मोबाईल मध्ये जी पे उघडलेल्याने माझ्याकडे पुन्हा एकदा पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी माझा मोबाईल नंबर मागितला.
मला एकही रुपया नकोय तुमचा. मी तुमची मस्करी केली होती, गाडी चालू करायचे पैसे द्यावे लागतील म्हणून.
एकाने गाडीतून चिल्ड बॉक्स मधून बिअरचे दोन थंडगार कॅन आणले, आणि हे तर घ्या म्हणून पुढे केले. मी डोक्याला हात मारून ते परत त्यांच्याच गाडीत ठेवायला लावले.
मी माझ्या गाडीत बसत असताना तुम्ही मेकॅनिक आहात का म्हणून एकाने विचारले.
लाखो टन क्षमता असलेल्या एका तेलवाहू जहाजाच्या चीफ इंजिनिअरला रस्त्यात बंद पडलेली गाडी चालू करून दिल्याबद्दल मेकॅनिक आहात का म्हणून विचारल्याने मला हसावं की रडावं असं झालं.
हो मी एक मेकॅनिक असून माझं खोल समुद्रात तरंगणारे गॅरेज आहे.
गाडी हळू हळू चालवा इथून एक तासा ऐवजी सव्वा तासात अलिबागला पोहचाल पण चाळीस च्या पुढे स्पीडने पळवू नका. असं सांगून मी माझ्या गाडीचा स्टार्टर देऊन निघालो.
इंजिनिअरिंग म्हणजे नुसतं पुस्तकी ज्ञान मिळवणे किंवा परीक्षा पास होणे एवढंच नाही.
रट्टा मारून क्लासेस मध्ये दिल्या जाणाऱ्या अनेक सराव प्रश्नपत्रिका सोडवत राहून सगळेच पास होतात.
कॉमन सेन्स नावाचं ज्ञान कुठल्याही शाळेत कॉलेजात किंवा पुस्तकात मिळत नाही. हल्ली सगळं रेडीमेड मिळत असल्याने, काही बिघडलं की एकतर नवीन घ्या किंवा सर्व्हिस सेंटरला कॉल करा. एखादा प्रकार कशाने झाला किंवा काय केल्याने त्यातून मार्ग निघेल याचा स्वतःहून शोध घेण्याची वृत्तीच दिसत नाही.
इंस्टा फेसबुकवर मध्ये रमणाऱ्याना शंभर गुणिले सहा करायला कॅल्क्युलेटर लागतो, पाचा पाचा पंचवीस असतात याचा पण काहीजणांना विसर पडतो, इतकी वाईट अवस्था बघायला मिळते.
घरात गळणारा नळ बदलण्यासाठी प्लंबर आणावा लागतो, लाईटचा बल्ब बदलण्यासाठी इलेक्ट्रिशियन बोलावावा लागतो, गाडी धुवायला पैसे देऊन माणूस ठेवावा लागतो नाहीतर सर्व्हिस सेंटर वर जावे लागते अशी सध्याच्या कॉलेजला जाणाऱ्या युवकांची परिस्थिती आहे.

© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनिअर
कोन, भिवंडी, ठाणे.

09/01/2026

📣 सावंतवाडी रेल्वे टर्मिनससाठी मुंबईकर चाकरमान्यांचे भव्य उपोषण आंदोलन! 🚆

मुंबईस्थित महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाद्वारे कोकण रेल्वे महामंडळाला बजावण्यात आली उपोषणाची नोटीस.

तमाम कोकणवासी आणि चाकरमान्यांनो,
आपले ६७ वर्षीय मुंबईकर चाकरमानी आजोबा कोकणात रेल्वे टर्मिनस होण्याकरिता आमरण उपोषण करत आहेत.
ही निव्वळ शोकांतिका आहे ..!!

कोकणी तरुणांनो आपल्या मुला बालांकरिता एक म्हातारा व्यक्ती आमरण उपोषण करतोय ही आपल्यासाठी शरमेची बाब नाही का..??

आता वेळ आली आहे आपल्या हक्कासाठी एकत्र येण्याची! सावंतवाडी येथे 'परिपूर्ण रेल्वे टर्मिनस व कोचिंग डेपो' व्हावे, यासाठी आपण सर्वजण एकत्र यायलाच हवे.

आता केवळ आश्वासने नकोत, आता कृती हवी!

सावंतवाडी टर्मिनस पूर्ण क्षमतेने कार्यान्वित व्हावे आणि कोकणी चाकरमान्यांची गैरसोय दूर व्हावी, याकरिता हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

प्रमुख मागण्या:
✅ सावंतवाडी टर्मिनसचे काम तातडीने पूर्ण करा.
✅ आम्हा मुंबईकर चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करा.

🗓️ तारीख: २६ जानेवारी २०२६
⏰ वेळ: सकाळी ०९ वाजल्यापासून
📍 ठिकाण: मुख्य कार्यालय,कोकण रेल्वे महामंडळ, कोकण भवन, बेलापूर. नवी मुंबई.

😔 जरा विचार करा..!

ज्या वयात नातवंडांशी खेळायचे, निवांत आयुष्य जगायचे, त्या वयात आपल्या हक्काचे 'सावंतवाडी टर्मिनस' पूर्ण व्हावे म्हणून आपले ६७ वर्षांचे आजोबा आमरण उपोषणाला बसत आहेत.
त्यांच्या थरथरत्या हातांना आणि म्हाताऱ्या शरीराला कशाची आस आहे? स्वार्थाची? नाही!

फक्त यासाठी की, "माझ्या कोकणातल्या पोराबाळांचा, माझ्या मुंबईकर चाकरमान्यांचा प्रवास सुखाचा व्हावा!"

जास्तीत जास्त ग्रुपवर शेअर करा आणि सहभागी व्हा! 🙏

येतलस ना..??

#चाकरमानी #मुंबई
#दिवा #भांडुप
#दादर #लालबाग #परळ #शिवडी #चेंबूर #माहीम #मुलुंड
#माटुंगा #ठाणे #बोरिवली #अंधेरी #डोंबिवली
#सावंतवाडी #कुडाळ #कणकवली #राजापूर #रत्नागिरी #संगमेश्वर #चिपळूण #खेड #माणगाव

"श्रीवर्धनची खरी श्रीमंती आणि भविष्यातील वाटचाल....श्रीवर्धनच्या हिरव्यागार सावलीत दडलेला 'सायलेंट' धोका...✍️ Vivek S. P...
03/01/2026

"श्रीवर्धनची खरी श्रीमंती आणि भविष्यातील वाटचाल....
श्रीवर्धनच्या हिरव्यागार सावलीत दडलेला 'सायलेंट' धोका...✍️ Vivek S. Potphode

कोकणच्या किनारपट्टीवर वसलेले श्रीवर्धन म्हणजे निसर्गाची एक अनमोल कलाकृती आहे. इथल्या समुद्रकिनारी डोलणाऱ्या माडा-पोफळीच्या वाड्या, हापूस-पायरीचा मोहक सुवास, अथांग समुद्र आणि त्यातून मिळणारी अफाट मत्स्यसंपत्ती पाहिली की वाटते, 'काय नशिबवान आहेत ही इथली माणसं!' पण या सुखाच्या आणि समृद्धीच्या हिरव्यागार पडद्याआड एक अत्यंत शांत, संथ पण तितकाच गंभीर असा आर्थिक पेच निर्माण होत आहे. हा बदल कोणा एका व्यक्तीमुळे घडत नसून, तो आपल्या बदलत्या अर्थव्यवस्थेच्या आणि मानसिकतेच्या रचनेतच मिसळून गेला आहे. श्रीवर्धन तालुका आज अशा वळणावर उभा आहे जिथे आज दिसणारी श्रीमंती ही केवळ एक 'भास' ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.

श्रीवर्धनची खरी ओळख इथल्या दर्जेदार 'रोठा' सुपारीत, रसाळ आंब्यात आणि ताज्या मासळीत आहे. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, इथला बागायतदार आणि मच्छिमार आजही केवळ 'कच्चा माल पुरवणारा' म्हणूनच मर्यादित राहिला आहे. आपल्या वाडीत कष्ट करून पिकवलेली सुपारी असो किंवा जिवाची बाजी लावून समुद्रातून आणलेली मासळी; जेव्हा हा माल इथून बाहेर पडतो, तेव्हा त्याचे मूल्य प्रक्रिया उद्योगामुळे अनेक पटींनी वाढते. ब्रँडिंग, मार्केटिंग आणि कोल्ड स्टोरेजचे हे जाळे स्थानिक मातीत रुजण्याऐवजी मोठ्या शहरांमध्ये विस्तारले आहे, ज्यामुळे मोठा नफा आणि शाश्वत रोजगार बाहेरच्यांच्या वाट्याला जातो आणि स्थानिक हातांना उरते ती फक्त हंगामी मजुरी. आपण निसर्गाची श्रीमंती प्रत्यक्ष बाजारात मांडतोय, पण त्यातून पिढ्यानपिढ्या टिकणारी 'शाश्वत संपत्ती' निर्माण करण्यात आपण कुठेतरी कमी पडत आहोत.

पर्यटन आणि फळबागांच्या हंगामात श्रीवर्धनमध्ये पैशांची रेलचेल दिसते, होम-स्टे हाऊसफुल्ल असतात आणि लोकांच्या हातात रोख रक्कम खेळते. तेव्हा असं वाटतं की सगळं काही ठीक आहे, पण हाच तो खरा फसवा खेळ आहे. वर्षाचे उरलेले आठ महिने या आर्थिक गणितातून अनेकदा गायब असतात. हंगामात आलेला पैसा वर्षभराच्या घरगुती खर्चात कधी विरघळून जातो, हे समजतही नाही. आज श्रीवर्धनच्या जमिनीला सोन्याचा भाव आला आहे आणि बाहेरून येणारे गुंतवणूकदार इथली जमीन विकत घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस दाखवत आहेत. जमिनीचे भाव वाढले की आपल्याला आपण श्रीमंत झाल्यासारखं वाटतं, पण हा विचार करायला हवा की आपण आपली 'उत्पन्न देणारी कायमस्वरूपी मालमत्ता' विकून केवळ एकदाच मिळणारा पैसा पदरात पाडून घेत आहोत का? आपली 'वाडी' ही पिढ्यानपिढ्या आधार देणारी असते, ती विकून आपण दुसऱ्याच्या श्रीमंतीचा मार्ग मोकळा करून देत आहोत, ही जाणीव होणे गरजेचे आहे.

"इथे काय होणार? नोकरीसाठी बाहेर जावंच लागणार," हे वाक्य आज श्रीवर्धनच्या घराघरात स्थिर झाले आहे. या मानसिकतेमुळे इथली तरुण आणि कल्पक पिढी शहरांकडे वळत आहे. हे चित्र बदलायचे असेल तर केवळ वैयक्तिक प्रयत्न पुरेसे नाहीत, तर सरकारी पातळीवरही ठोस पावले उचलली जाणे अनिवार्य आहे. स्थानिक स्तरावर मत्स्य प्रकिया उद्योग (Fish Processing Units), अत्याधुनिक कोल्ड स्टोअरेज आणि फळ प्रक्रिया केंद्रांसाठी विशेष सवलती आणि सोयीसुविधा सरकारने उपलब्ध करून द्यायला हव्यात. स्थानिक तरुणांना स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देणे, कृषी आणि मत्स्य पर्यटनाला व्यावसायिक दर्जा मिळवून देणे आणि जमिनीच्या हस्तांतरणाबाबत कडक धोरण आखणे आवश्यक आहे. शासनाने जर इथेच रोजगाराच्या संधी आणि पायाभूत सुविधा निर्माण केल्या, तर श्रीवर्धनची तरुण पिढी नोकरीसाठी मुंबई-पुण्याकडे न धावता स्वतःचे साम्राज्य इथेच उभे करेल.

हा 'सायलेंट' पेच थांबवायचा असेल तर लोकांना आता व्यावसायिक विचार करावा लागेल. केवळ उत्पादक राहून चालणार नाही, तर 'उद्योजक' बनावे लागेल. कच्चा माल विकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून दर्जेदार वस्तू बाजारपेठेत आणण्याकडे कल हवा. सहकारी तत्वावर प्रक्रिया उद्योग, स्वतःचे ब्रँडिंग, सरकारी योजनांचा प्रभावी वापर आणि आपल्या जमिनींचे जतन हीच या परिस्थितीवर मात करण्याची प्रभावी साधनं आहेत. निसर्ग भरभरून देत आहे आणि आपण कष्टही करत आहोत; गरज आहे ती फक्त योग्य दिशा पकडण्याची आणि हक्कासाठी शासन दरबारी आवाज उठवण्याची. श्रीवर्धनच्या निसर्गरम्य भूमी चा फायदा इतरांना घेऊ द्यायचा की आपली आपली ताकद बनवायची, याचा निर्णय इथल्या नागरिकांनीच घ्यायचा आहे. अन्यथा, या हिरव्यागार वाड्या उद्या फक्त फोटों पुरत्या उरतील.

पोस्ट क्रेडिट : Vivek S. Potphode

#श्रीवर्धन #कोकण #आपलं_श्रीवर्धन #कोकणचा_विकास #जनजागृती
#कोंकण #गावंवाचवा #रत्नागिरी #कोकण #लांजा #कोकणकर

Address

Sawantwadi
Savantvadi
416531

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Malvani Blog's - मालवणी गजाली. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Malvani Blog's - मालवणी गजाली.:

Share

Category