09/12/2025
मी अनिता मुरलीधर शेळके, लिपिक - टंकलेखक, मंत्रालय, मुंबई येथे सन २०२४ पासून कार्यरत आहे. माझ्या MPSC स्पर्धा परीक्षेच्या प्रवासाबद्दल सांगायच झालं तर स्व. हरी दादा गारे वाचनालयामुळे मला गावामध्येच अभ्यास करण्याची सुवर्ण संधी मिळाली त्यामुळे माझ्या प्रवासातील वेळेची बचत तर झालीच तसेच, वाचनालयातील उपलब्ध पुस्तकांचा मी पुरेपूर वापर करून आजच्या या छोट्याशा यशाला गवसणी घातली.
माझ्या या यशामध्ये कुठेतरी गारे वाचनालयाची महत्वपूर्ण भूमिका आहे. या सर्वासाठी मी गारे वाचनालयाचे मनःपूर्वक आभार मानते.
धन्यवाद!
स्वर्गीय हरि दादा गारे सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका दातली यांच्याकडून हार्दिक अभिनंदन 💐