06/10/2022
-:🏵️-:🌼-:🌺-:🌼-: नवरात्रोत्सव :-🌼:-🌺:-🌼:-🏵️:-
|| कधी आहे घटस्थापना ? यंदाचा शुभ मुहूर्त,
|| तिथी, शुभ योग आणि महत्त्व जाणून घ्या
|| चातुर्मासातील गणेशोत्सवानंतर महत्त्वाचा उत्सव
|| म्हणजे नवरात्रोत्सव. नवरात्रात दुर्गा देवीच्या विविध
|| स्वरुपांचे पूजन केले जाते. देवीचे पूजन, नामस्मरण,
|| भजन उपासना करण्यासाठी नवरात्राचा काळ सर्वोत्तम
|| मानला जातो. वास्तविक पाहता संपूर्ण मराठी वर्षात चार
|| नवरात्र साजरी केली जातात. पैकी दोन नवरात्र गुप्त
|| पद्धतीने केली जातात.
|| मात्र, दोन मोठ्या प्रमाणावर साजरी केली जातात,
|| त्यापैकी एक अत्याधिक महत्त्व असलेले नवरात्र म्हणजे
|| शारदीय नवरात्र. यंदा २०२२ रोजी २६ सप्टेंबर ते ०४
|| ऑक्टोबर या कालावधीत नवरात्र साजरे केले जाणार
|| आहे. यंदाच्या नवरात्राचे विशेष, शुभ मुहूर्त, शुभ तिथी
|| आणि शुभ योग कोणते, याबाबत जाणून घेऊया.
|| यावर्षी शारदीय नवरात्र २६ सप्टेंबरपासून सुरू होत
|| असून, ०५ ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजेच दसऱ्याने
|| नवरात्रीची सांगता होईल. ०४ ऑक्टोबर रोजी नवमी
|| पूजन केले जाणार आहे. यंदा अतिशय विशेष आणि शुभ
|| मानल्या जाणाऱ्या नवरात्रीमध्ये असा योगायोग घडला
|| आहे,
|| तो म्हणजे नवरात्र संपूर्ण ९ दिवस साजरे केले जाणार
|| आहे. नवरात्रात एकही तिथी क्षय होणार नाही. जेव्हा
|| नवरात्र ९ दिवस साजरे केले जाते, ते कल्याणकारी,
|| शुभ ठरणारे असते, अशी मान्यता असल्याचे सांगितले
|| जाते. याशिवाय नवरात्रीच्या ९ दिवसांत अनेक शुभ
|| योगही तयार होत आहेत.
-:♦ घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त :------------
|| नवरात्राच्या पहिल्या दिवशी कार्याच्या संपन्नतेसाठी
|| प्रार्थना करून घटस्थापना करण्याची प्राचीन परंपरा
|| आणि पद्धत आहे. देशातील कोट्यवधी घरांमध्ये
|| घटस्थापना करण्याची पद्धत रुढ आहे.
|| तर काही ठिकाणी मोठ्या मंडळांमध्येही दुर्गादेवीसह
|| घटस्थापना केली जाते. घरातील सुख, शांतता समृद्ध
|| होण्यासाठी नवरात्रातील संपूर्ण दिवस घटस्थापना
|| करून दुर्गा देवीचे पूजन केले जाते.
-:🔸 घटस्थापना :------------
|| सोमवार, २६ सप्टेंबर २०२२
-:🔹 प्रतिपदा आरंभ :------------
|| पहाटे ०३ वाजून २३ मिनिटे
-:🔸 राहु काळ आरंभ :------------
|| सकाळी ०७ वाजून ३० मिनिटे ते ०९ वाजेपर्यंत.
-:🔹 अमृत चौघडिया मुहूर्त :------------
|| सकाळी ०६ वाजून ११ मिनिटे ते ०७ वाजून ४१ मिनिटे.
-:🔸 शुभ चौघडिया मुहूर्त :------------
|| सकाळी ०९ वाजून १२ मिनिटे ते १० वाजून ४२ मिनिटे.
|| अशा परिस्थितीत सकाळी ०६ वाजून ११ मिनिटांपासून
|| ते ०७ वाजून ३० मिनिटे आणि पुन्हा सकाळी ०९ वाजून
|| १२ मिनिटे ते १० वाजून ४२ मिनिटांपर्यंत नवरातरी
|| घटस्थापना करणे खूप शुभ राहील.
|| जर या विशेष शुभ मुहूर्तावर कलश बसू शकत नसेल
|| तर अभिजित मुहुर्तावर म्हणजे सकाळी ११ वाजून ४८
|| मिनिटे ते दुपारी १२ वाजून ३६ मिनिटे या वेळेत कलश
|| पूजन केले जाऊ शकते.
-:♦ नवरात्रोत्सवात अनेक शुभ योग :------------
|| या वेळी नवरात्रात अश्विन शुक्ल प्रतिपदा तिथीला
|| सकाळी सूर्योदयाच्या वेळी सर्वार्थ सिद्धी नामक शुभ
|| योग होईल. यासोबतच अमृत सिद्धी योगही प्रभावी
|| होणार आहे. या सर्वांमध्ये उत्तम योगायोग असा की,
|| या दिवशी हस्त नक्षत्र संपूर्ण दिवस राहील.
|| यंदाच्या वर्षी दुर्गा देवी हत्ती वाहनावर आरुढ होऊन
|| पृथ्वीवर येईल. याच वाहनावर आरुढ होऊन दुर्गा देवी
|| परत जाईल, असे सांगितले जात आहे. दुर्गा देवीचे हत्ती
|| वाहन अतिशय शुभ मानले जात असून, याचा अत्यंत
|| सकारात्मक परिणाम देश-दुनियेवर पाहायला मिळू
|| शकेल असे सांगितले जात आहे.