श्री स्वामी समर्थ - Shree Swami Samarth

  • Home
  • India
  • Thane
  • श्री स्वामी समर्थ - Shree Swami Samarth

श्री स्वामी समर्थ - Shree Swami Samarth Infrastructure News

26/05/2026

🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

स्वामींच्या मठात जा…
स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा… ✨
जीवनातील कितीही मोठी अडचण असो, स्वामी प्रत्येक भक्ताला त्या संकटातून बाहेर काढतात. ❤️

घाबरू नका…
स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात… 🙏
स्वामी सांगतात —
“भिऊ नकोस… मी तुझ्या पाठीशी आहे…” ✨

हा माझा स्वामींवरील विशेष व्हिडिओ नक्की बघा… 🎥
व्हिडिओ आवडल्यास लाईक 👍 करा आणि जास्तीत जास्त शेअर 📲 करून स्वामींचा आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा… 🙏

#श्रीस्वामीसमर्थ

Respected Mayor Ritu Tawde Tai,You are doing commendable work for Mumbai, and citizens truly appreciate your efforts. We...
19/05/2026

Respected Mayor Ritu Tawde Tai,

You are doing commendable work for Mumbai, and citizens truly appreciate your efforts. We request you to encourage BMC officers, corporators, and MLAs to work with the same dedication and to conduct regular surprise visits across all civic departments so that real ground-level conditions can be monitored and discipline can be maintained.

We humbly request the administration to establish Municipal English and Marathi medium schools in every major city area, ideally based around railway station zones for easy accessibility. Today, many private schools are putting a huge financial burden on common families through excessive fees, books, uniforms, tuition classes, and other expenses. Quality government education should be strengthened so that every child can receive affordable and equal education.

Strict regulation should be implemented on unauthorized private tuition classes, and officially managed educational support classes should be introduced by the administration. Free self-defense training programs for women and girls should also be started, along with the establishment of dedicated women police stations in every division.

Self-defense education should be made compulsory for girls, women, and female teachers in all school standards. Education for girls from 5th to 12th standard should be made completely free. Many schools fail to provide proper benefits to RTE students even after admission, and strict surprise inspections and legal action should be taken against such institutions.

For student safety and eco-friendly travel, dedicated cycle tracks should be developed alongside major roads so that school students can safely commute by bicycle.

School toilets must be regularly inspected for hygiene and maintenance. Character verification should be mandatory for all third-party staff working in schools. CCTV cameras should be compulsory in every school, and authorities must physically verify whether these systems are properly installed and operational, instead of existing only on paper.

Strong and transparent decisions are necessary to make Mumbai and Maharashtra safer, more disciplined, educated, and secure for women and future generations. Taxpayers and common citizens fully support every honest effort toward public welfare and better governance. 🙏





PMO India






रितूताई तावडे
Ritu Tawde
CMOMaharashtra

21/04/2026

महिला आरक्षणाच्या नावाखाली देशभर सुरू असलेल्या राजकारणाचा आणखी एक प्रकार वरळीमध्ये पाहायला मिळाला…

भाजपकडून जांभोरी मैदान, वरळी येथे काढलेल्या मोर्चामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. अनेक सामान्य नागरिकांना तासन्‌तास अडकून राहावे लागले.

याच दरम्यान एका संतप्त महिलेने थेट मोर्चामध्ये जाऊन भाजप नेत्यांना जाब विचारला. तिच्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री Girish Mahajan यांची चांगलीच गोची झाली.

सत्ताधाऱ्यांनी सामान्य नागरिकांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करून फक्त राजकारण करणे योग्य आहे का?

सर्वसामान्यांचा आवाज कधी ऐकणार?

21/04/2026

भाजपचे राजकारण महिलांच्या नावावर, पण त्रास मात्र सामान्य महिलांनाच!

आज वरळी येथे भाजपाच्या मोर्चामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. या गोंधळात अडकलेल्या एका संतप्त स्थानिक महिलेने थेट भाजप नेत्यांना जाब विचारत आपला रोष व्यक्त केला.
महिलांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी आधी त्यांच्या रोजच्या अडचणी समजून घ्यायला हव्यात, हीच जनतेची भावना आहे.

21/04/2026

📢 *सामान्य नागरिकांसाठी न्यायाची हाक*

मा. मुख्यमंत्री Devendra Fadnavis साहेब आणि मा. उपमुख्यमंत्री Eknath Shinde साहेब,

आपणांस नम्र विनंती आहे की, नवी मुंबईतील ऐरोली, रबाळे, घणसोली ते तुर्भे या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्य नागरिक (अधिकृत / अनधिकृत) चाळीत वास्तव्यास आहेत. आजही हजारो कुटुंबे अत्यंत असुरक्षित परिस्थितीत जीवन जगत आहेत. त्यांच्या डोक्यावर कायमच भीतीची टांगती तलवार आहे — कधीही घर तुटेल, कधीही बेघर व्हावे लागेल, अशी भीती त्यांना रोज त्रास देत आहे.

ही गोरगरीब जनता रोजंदारीवर काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी संघर्ष करते. मात्र, राहण्यासाठी सुरक्षित घर नसल्याने त्यांचे जीवन अत्यंत कठीण झाले आहे.

👉 त्यामुळे आपणांस मनापासून विनंती आहे की:

* या सर्व परिसरातील चाळींचा *त्वरित पुनर्विकास* करण्यात यावा
* सर्वसामान्यांना *सुरक्षित व कायदेशीर घरे* उपलब्ध करून द्यावीत
* वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्न *प्राधान्याने सोडवावा*

ही केवळ घरे नाहीत, तर हजारो कुटुंबांचे स्वप्न, भविष्य आणि जगण्याचा आधार आहे. कृपया या जनतेला न्याय द्या आणि त्यांना चाळ संस्कृतीतून मुक्त करून सन्मानाने जगण्याची संधी द्या.

🙏 *आपल्या सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे.*

#न्याय_मिळालाच_पाहिजे
#नवीमुंबई_पुनर्विकास
#सामान्यांचा_आवाज
ा_हक्क_आहे




11/04/2026

महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा प्रकल्प सध्या गंभीर अडचणीत सापडले आहेत. राज्य कंत्राटदार संघटनेने टप्प्याटप्प्याने बंद आंदोलन सुरू केल्यामुळे ७ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत रस्ते व शासकीय इमारतींचे काम मंदावणार किंवा पूर्णपणे थांबणार आहे.

यामागचे प्रमुख कारण म्हणजे तब्बल ₹९६,००० कोटींची थकबाकी. या प्रचंड थकबाकीमुळे जवळपास तीन लाख कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले असून, देयकांबाबत कोणताही स्पष्ट आराखडा सरकारकडून समोर आलेला नाही.

पुणे, मुंबई आणि ठाणे यांसारख्या महत्त्वाच्या शहरांतील विकासकामांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यांपासून सातत्याने सूचना व बैठका घेऊनही शासनाकडून ठोस प्रतिसाद न मिळाल्यामुळे कंत्राटदारांनी हा कठोर निर्णय घेतला आहे.

या परिस्थितीचा परिणाम केवळ कंत्राटदारांपुरता मर्यादित राहणार नाही, तर सार्वजनिक प्रकल्पांमध्ये विलंब होऊन लाखो नागरिकांच्या दैनंदिन प्रवासावर आणि सुविधांवरही त्याचा परिणाम होणार आहे.

राज्याच्या विकासाच्या दृष्टीने ही परिस्थिती चिंताजनक असून, तातडीने सकारात्मक तोडगा काढण्याची गरज आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी नवे ऑनलाईन पोर्टल सुरू 🏥💻सर्वसामान्य रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या मुख्यमंत्री सहायता निधी...
10/04/2026

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी नवे ऑनलाईन पोर्टल सुरू 🏥💻

सर्वसामान्य रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या अर्ज प्रक्रियेत आता मोठा बदल करण्यात आला आहे. दि. ७ एप्रिल २०२६ पासून जुनी पद्धत पूर्णपणे बंद करून नवीन ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.

👉 यापुढे सर्व अर्ज फक्त ऑनलाईन माध्यमातूनच स्वीकारले जाणार
👉 रुग्णालयांसाठी अधिकृत ई-मेल नोंदणी, युजर आयडी-पासवर्ड आणि E-KYC अनिवार्य
👉 रुग्णांना वेळेवर मदत मिळण्यासाठी प्रक्रिया त्वरित पूर्ण करणे आवश्यक

या निर्णयामुळे नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने मदत मिळणार आहे 👍

सर्वसामान्यांच्या हितासाठी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण आणि लोकाभिमुख निर्णयाबद्दल मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांचे मनःपूर्वक आभार 🙏




10/04/2026

कालचा एक साधा प्रसंग… पण मनाला अस्वस्थ करून गेला.

बायकोची शाळा लवकर सुटल्यामुळे तिला घेण्यासाठी गेलो आणि “चल काहीतरी खाऊया” म्हणून जवळच्या वडापावच्या दुकानात गेलो. तिथे काही मजूर बसून वडापाव खात होते. साधे कपडे, थकलेले चेहरे… पण शांतपणे आपला वेळ घालवत होते.

वडापाव घेतला, पण लक्षात आलं—किंमत ५ रुपयांनी वाढलेली. आपल्यासाठी कदाचित ही छोटी गोष्ट असेल… पण त्या मजुरांसाठी? तेच विचार करत बसलो असताना एका मजुराशी (रमेश) बोलणं झालं.

त्याचं एक वाक्य मनाला भिडलं—
“दुपारचं जेवण परवडत नाही म्हणून वडापाव खातो… पण आता वडापावही महाग झाला आहे.”

विचार करा… ५ रुपये वाढ आपल्याला किरकोळ वाटते, पण कष्टकरी माणसासाठी ती रोजच्या जगण्यावर परिणाम करणारी असते.
कमी पगार, वाढती महागाई, आणि पोट भरण्यासाठी करावी लागणारी तडजोड… ही वास्तव परिस्थिती आहे.

आज अनेक मजूर, विद्यार्थी आणि गरजू लोक पूर्ण जेवणाऐवजी वडापाववर दिवस काढत आहेत. पण जेव्हा तोही महाग होतो, तेव्हा त्यांच्या समोर प्रश्न उभा राहतो—“जगायचं कसं?”

महागाई ही फक्त आकड्यांची गोष्ट नाही… ती थेट माणसाच्या पोटाशी आणि आयुष्याशी जोडलेली आहे.

आपण सगळ्यांनी याकडे फक्त चर्चा म्हणून न पाहता, संवेदनशीलतेने विचार करण्याची गरज आहे.


#महागाई Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे CMOMaharashtra श्री स्वामी समर्थ

नवी मुंबईतील गोठिवली गावामध्ये ग्रामदैवत मरी आई मातेच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचा सन्मान ला...
10/04/2026

नवी मुंबईतील गोठिवली गावामध्ये ग्रामदैवत मरी आई मातेच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचा सन्मान लाभला. परमपूज्य बालयोगी सदानंद महाराज यांच्या पावन हस्ते आज विधीवत आणि भक्तिमय वातावरणात मरी आई मातेची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली.

माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे आणि अनिकेत म्हात्रे यांच्या मार्गदर्शनातून या सुंदर व भव्य मंदिराची उभारणी करण्यात आली असून मंदिराची रचना अत्यंत आकर्षक आणि देखणी आहे.

या प्रसंगी गोठिवली गावाचे अध्यक्ष तुळशीदास बापू पाटील यांनी मनापासून स्वागत करून सन्मान केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.


09/04/2026

Address

Shree Swami
Thane
400611

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री स्वामी समर्थ - Shree Swami Samarth posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category