30/03/2026
सर्वांना एक मनापासून विनंती… 🙏
या धावत्या जीवनात आपण इतके व्यस्त झालो आहोत की आपल्या आजूबाजूला काय घडत आहे हे पाहण्यासही वेळ उरत नाही…
परंतु कधी थांबून सरकारी रुग्णालयात जाऊन पाहिले आहे का?
, तसेच अशा अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये दररोज हजारो गरजू रुग्ण उपचारासाठी येतात…
परंतु त्यांच्या सोबत असलेल्या कुटुंबीयांची परिस्थिती अत्यंत हृदयद्रावक असते… 😔
अनेकांकडे औषधांसाठी आवश्यक पैसा नसतो…
अनेकांना दोन वेळचे अन्नही मिळत नाही…
रुग्णांसोबत राहणारे नातेवाईक स्वतःची भूक, तहान आणि विश्रांती विसरून केवळ आपल्या प्रिय व्यक्तीसाठी झगडत असतात…
👉 आपण काय करू शकतो?
✔️ एक दिवस वेळ काढून अशा रुग्णालयांना भेट द्या
✔️ गरजूंना अन्न, पाणी व फळांचे वाटप करा 🍱💧
✔️ औषधांसाठी आपल्या क्षमतेनुसार आर्थिक मदत करा
✔️ त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधा – त्यांना मानसिक आधार मिळतो ❤️
ही केवळ मदत नाही… ही खरी माणुसकी आहे!
आपण रोज मोबाईल व सामाजिक माध्यमांवर वेळ घालवतो…
त्यातील एक दिवस माणुसकीसाठी द्या… सेवेसाठी द्या…
आपल्या छोट्याशा सहकार्यामुळे एखाद्याचे आयुष्य बदलू शकते.
आज आपण केलेली मदत उद्या आपल्या आयुष्यात नक्कीच परत येईल…
चला, एकमेकांना आधार देणारी संवेदनशील आणि माणुसकीची मुंबई पुन्हा घडवूया! 💙