Shobha Realty & Financial Services P Ltd

Shobha Realty & Financial Services P Ltd Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shobha Realty & Financial Services P Ltd, Property management company, mafco Road, Vashi.

15/03/2023
हर करम अपना करेंगे, ए वतन तेरे लिये, दिल दिया हे, जान भी देंगे  ए वतन तेरे लिये
07/08/2021

हर करम अपना करेंगे, ए वतन तेरे लिये,
दिल दिया हे, जान भी देंगे ए वतन तेरे लिये

 #क्रेडिट_कार्ड_कसे_वापरावे?क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर तुम्ही त्याचा कसा आणि किती जास्त वेळा वापर करता, त्यावर तुम्हाला म...
19/02/2021

#क्रेडिट_कार्ड_कसे_वापरावे?

क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर तुम्ही त्याचा कसा आणि किती जास्त वेळा वापर करता, त्यावर तुम्हाला मिळणारे लाभ आणि रिवॉर्ड पॉईंट्स अवलंबून असतात. त्यामुळे त्याचा वापर प्रभावीपणे करता येणे महत्त्वाचे आहे. कधी कोणत्या प्रकारच्या खरेदीवर क्रेडिट कार्ड वापरावे हे माहित असणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हालाही स्मार्ट बनावे लागेल. त्यासाठी या काही टिप्स पाहूया..

क्रेडिट कार्ड वापरण्याची योग्य पद्धत

१.क्रेडिट कार्डची सर्वात उच्चतम मर्यादा माहित करुन घ्यावी
प्रत्येक व्यक्तीसाठी क्रेडिट कार्डवरील मर्यादा भिन्न-भिन्न असते. तुम्ही पहिल्यांदा कार्ड घेत आहात, की अशा सेवेचे नियमित ग्राहक असून दुसऱ्या किंवा तिसऱ्यांदा प्रिमिअम कार्ड घेत आहात यावर तुमचे क्रेडिट अवलंबून असते. त्यामुळे तुम्ही घेत असलेल्या कार्डची उच्चतम मर्यादा किती आहे, हे जरूर विचारावे.

२. रिवॉर्ड पॉईंट्स, बक्षिसे आणि अन्य लाभांची वेळोवेळी माहिती करुन घ्यावी
क्रेडिट कार्ड आपल्याला विशिष्ट प्रकारच्या खर्च आणि खरेदीवर विविध ऑफर्स आणि रिवॉर्ड्स देत असतात.
जास्त मर्यादा असणारी कार्ड देखील खात्रीशीर गिफ्ट व्हाउचर आणि लाभ मिळवून देतात. त्यासंदर्भातील माहिती नेहमी तुमच्या मोबाईल नंबर किंवा ई-मेलवर मिळत असते. तसेच आपण विविध खरेदीवर जमवलेले गुण रोख स्वरूपात किंवा कोणत्याही अन्य प्रकारात परत केले जाऊ शकतात. मात्र फसव्या मेसेजना किंवा ई-मेल ला बळी पळू नका.

३. तुमच्या क्रेडिट कार्डची सर्व बिले वेळेवर भरा
क्रेडिट कार्ड च्या बाबतीत ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. याकडे थोडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण बिल वेळेवर न भरणे ही सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. तसेच अनेकदा तुम्ही बिलाची शेवटची तारीख चुकवत असाल तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. बिल वेळेवर न भरल्याने दंड म्हणून जादा रक्कम तर भरावीच लागते दुसरीकडे सतत बिल भरण्यात अनियमितता तुम्हाला डिफॉल्ट लिस्ट मध्ये टाकले जाते जेणेकरुन तुमचा स्कोअर खराब होवू शकतो आणि तुम्हाला मिळणारे लाभही कमी होऊ शकतात.

४. थकबाकीवर किमान देयक भरणे हा नेहमी उपाय असू शकत नाही
आपल्या कार्डाच्या थकबाकीवर किमान देय देणे पुरेसे असते आणि जरी शेवटची तारीख चुकली तरी किमान रक्कम भरून दंड टाळू शकतो असा एक चुकीचा समज आहे. बिलाची तारीख चुकल्यानंतर केवळ दंडच नाही तर जेवढे दिवस तुम्ही उशिर कराल तितके व्याज देखील भरावे लागते. त्यामुळे दंड आणि व्याज असा जादा भार तुम्हाला सोसावा लागतो. हे टाळण्यासाठी नेहमी सर्व बिले वेळेवर भरा त्यासाठी शेवटच्या तारखेआधी एक तारीख तुम्हीच निश्चित करा.

५. एटीएम मध्ये क्रेडिट कार्ड वापरू नका
काही बँका क्रेडिट कार्डद्वारे तुम्हाला एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा देतात. मात्र शक्यतो ही सुविधा वापरणे टाळा. जरी परवानगी असेल तरीही क्रेडिट कार्डद्वारे एटीएममधून पैसे काढण्यावर जादा शुल्क आकारले जाते. तसेच महिन्यातून केवळ एकदा किंवा दोनदा अशाप्रकारे पैसे काढण्याची सुविधा असते. त्यामुळे पैसे काढण्यासाठी केवळ डेबिट कार्डचा वापर करा.

६. को-ब्रँडेड कार्डची तुम्हाला खरंच गरज आहे का?
बाजारात अनेक ब्रँड्स त्यांच्याशी जोडलेली आणि त्यांच्या खरेदीवर विशेष सवलती देणारी को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड घेण्यासाठी नेहमीच ग्राहकांना मोहात पाडतात.
मात्र अशा विशेष कार्डांचा जर वापर करणार असाल तर त्या ब्रँडच्या गोष्टी तुम्ही नेहमी विकत घेता का आणि वर्षातून किती वेळा तुम्ही असे ब्रँडेड वस्तू, कपडे खरेदी करता याचा विचार करा.
अशी कार्ड म्हणजे केवळ कार्ड नसून क्लब असतात. एका छताखाली मिळणारे अनेक लाभ या स्वरुपात ही क्लब कार्ड असतात मात्र तुम्ही तशा प्रकारच्या उच्चभ्रू श्रेणी तील (हाय क्लास सोसायटी) ग्राहक आहात का आणि याचे किती लाभ तुम्ही वर्षभरात घेता याचा विचार करुनच अशी को-ब्रँडेड क्लब कार्ड घ्यावी.

७. आपल्या क्रेडिट कार्डचे सर्व तपशील सुरक्षित ठेवा
डिजिटल जगात वावरत असताना सुरक्षितता ही नेहमीच पहिल्या क्रमांकाची जबाबदारी असली पाहिजे. बँकिंग आणि आर्थिक सर्व व्यवहार अत्यंत सुरक्षितपणेच केले पाहिजे. यातील सर्व धोक्यांची जाणीव करून घेऊनच व्यवहार करावे. तुमच्या डेबिट असो की क्रेडिट.. सर्व कार्डाचे सुरक्षा पिन, सीव्हीव्ही क्रमांक, ओटीपी, तुमची जन्मतारीख, पत्ता, कार्डची कालबाह्य होण्याची तारीख या सर्व गोष्टी सुरक्षित ठेवल्या पाहिजे. तुमच्या व्यतिरिक्त त्या कोणालाही समजता कामा नये.
अगदी एटीएम मशिनमध्ये देखील कार्ड वापरताना सर्व खबरदारी घ्यावी. अगदी दुकानात, मॉलमध्ये खरेदी नंतर बील देताना जर पीओएस मशीन विषयी तुम्हाला खात्री नसेल, तर डिजिटल पेमेंट न करता, रोखीने व्यवहार करा. हल्ली कार्ड क्लोन करण्याचे प्रमाण ही खूप वाढले आहे त्याविषयी योग्य खबरदारी घ्यावी. जेणेकरून तुमच्या कार्डचा गैरवापर टळेल.

८. आवश्यकता असल्यास क्रेडिट कार्डवर कर्ज मिळवू शकता
तुम्ही बँकेचे किती नियमित आणि क्रेडिटेबल ग्राहक आहात, यावर तुम्हाला मिळणाऱ्या सुविधा अवलंबून असतात.
तुमच्या क्रेडिट कार्डाचा एकूण इतिहास जर खुपच चांगला असेल तर कधी खुपच आवश्यकता असल्यास तुम्हाला क्रेडिट कार्डच्या बदल्यात ठराविक रकमेचे कर्ज मिळू शकते. त्यासाठी काही किमान कागद पत्रांवर सही करून आणि काही अटी मान्य करुन बँक तुम्हाला असे कर्ज देऊ शकते. मात्र त्यासाठी तुमचा ग्राहक म्हणून इतिहास (Credit history) खूपच चांगला असला पाहिजे.

९. क्रेडिट कार्डचे बिल वेळोवेळी तपासून पहा
जेव्हा तुम्हाला बिलाची प्रत मिळेल तेव्हा पैसे भरण्यापूर्वी सर्व बिलाची सखोल छाननी करा.
तुम्ही खरेदी केलेल्या तेवढ्याच वस्तुंचे बिल आहे की अन्य काही चुकीची रक्कम दाखवली आहे ते पहा.
खरेदी व्यतिरिक्त अन्य कोणते शुल्क त्या बिलात आहे का ते तपासून पहा.
कोणतीही विसंगती आढळल्यास तसे त्वरीत संबंधित कंपनीला कळवा.

समर्पित

'आपलं घर' हा शब्द उच्चारण्यासाठीच माणसाचे आयुष्य खर्च होते नाही का? पण खऱ्या अर्थाने तुम्ही म्हणू शकता 'आपलं घर' !होय, ज...
19/02/2021

'आपलं घर' हा शब्द उच्चारण्यासाठीच माणसाचे आयुष्य खर्च होते नाही का? पण खऱ्या अर्थाने तुम्ही म्हणू शकता 'आपलं घर' !
होय, ज्या घराला असेल उत्तम सुरक्षा आणि अप्रतिम सुंदरता...
फ्लॅट नाही तर तब्बल १४ 'लक्झरी' बंगल्यांचा प्रकल्प आता द्रोणागिरी हिल्स च्या पायथ्याशी, उरण मध्ये.
* २४ तास पाणी * तुमची स्वतःची पार्किंग स्पेस
* प्रायव्हेट गार्डन * घराभोवती वॉल कंपाउंड
* २४*७ चोख सुरक्षा * गेटेड कम्युनिटी
* जॅग्वार सॅनिटरी फिटिंग्ज * डिझायनर नेमप्लेट
आणि अशा खूप काही गोष्टी ज्या तुमच्या घराला बनवतील 'स्वप्नातील घर' !
केवळ रू. २५.९९ लाख
त्वरित संपर्क साधा 9867110110/9702110110/9146110110

 #क्रेडिटकार्डद्वारे_कर्ज_घेताना_खालील_गोष्टी_लक्षात ठेवा !क्रेडिट कार्ड ही बँकेद्वारे ऑफर केलेली सुविधा आहे जी आपल्याला...
08/02/2021

#क्रेडिटकार्डद्वारे_कर्ज_घेताना_खालील_गोष्टी_लक्षात ठेवा !

क्रेडिट कार्ड ही बँकेद्वारे ऑफर केलेली सुविधा आहे जी आपल्याला पहिले पैसे खर्च करण्यास आणि नंतर पैसे देण्यास परवानगी देते. आपण क्रेडिट कार्डसह ऑनलाइन किंवा ऑफलाइन पेमेंट देऊ शकता. आजकाल क्रेडिट कार्डचा वापर खूप होत आहे. बहुतेक लोकांनी त्याचा वापर सुरू केला आहे. हे वेळेवर पैशांच्या गरजा पूर्ण करते.

बँका क्रेडिट कार्डवर कर्ज देखील देतात. हे कर्ज वैयक्तिक कर्जासारखेच आहे. वेगवेगळ्या बँका त्यांच्या ग्राहकांना क्रेडिट कार्डवर कर्ज देतात. सामान्यत: क्रेडिट कार्डावरील वार्षिक व्याज दर हे 35 ते 40 टक्क्यांच्या दरम्यान असतो. म्हणूनच, जर तुम्ही आधीच क्रेडिट कार्डवर कर्ज घेतलं असेल किंवा कर्ज घेण्याचा विचार करत असाल.

==================================
Shobha Realty & Financial Services Pvt Ltd ही नवी मुंबई मधील एक विश्वसनीय कंपनी आहे. आम्ही प्रॉपर्टीविषयक (Property), बांधकाम विषयक (Construction) आणि सर्व कर्जविषयक आर्थिक सेवा राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत (Financial Services) व गुंतवणूक व करविषयक सल्ला ( Investment & Tax Planning ) देण्याचे कार्य करतो. आम्ही गेल्या 8 वर्षांपासून 2200+ पेक्षा जास्त समाधानी ग्राहकांच्या आयुष्यात मौल्यवान योगदान दिलेले आहे व त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करून त्यांचे आयुष्य अर्थपूर्ण केलेले आहे*
==================================

म्हणून आपण व्याज दरापासून लेट फीस यासारख्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

आपण वेळेवर पैसे न दिल्यास काय करावे?
आपण वेळेवर कर्ज भरण्यास सक्षम नसल्यास आपल्यास टॉप-अप कर्ज मिळण्याची शक्यता कमी होईल. वेळेवर पैसे न दिल्यास आपला सिबिल स्कोअर बिघडू शकतो.

पेमेंट चुकल्यावर काय होते?
जर आपण क्रेडिट कार्डवर घेतलेल्या कर्जाचा हप्ता वेळेत भरला नाही तर ते डीफॉल्ट मानले जाईल. ईएमआय वेळेवर न भरल्यास कार्डधारकाच्या क्रेडिट स्कोअरवर वाईट परिणाम होतो. म्हणून कर्जाचा हप्ता वेळेवर परत करा.

प्रोसेसिंग चार्ज लक्षात ठेवणे आवश्यक आहे
जेव्हा क्रेडिट कार्डसाठी कर्ज निवडले जाते तेव्हा कर्जाच्या रकमेवर प्रोसेसिंग चार्ज आकारले जाते. क्रेडिट कार्ड कर्जासाठी प्रोसेसिंग फीस सहसा 1-5% असते. कार्डधारक कर्जाचा कालावधी निवडू शकतात. हे 24 महिन्यांसाठी जास्तीत जास्त आहे. तसेच प्री-क्लोजरची सुविधा आहे. आपल्याला प्री-क्लोजर फीस भरावी लागेल.

रेकॉर्ड चांगले असावे
क्रेडिट कार्डधारकांना आपत्कालीन परिस्थितीत प्री-अप्रूव्ड लोन देखील सहजपणे मिळते. परंतु यासाठी आपला रेकॉर्ड चांगला असावा आणि त्यासाठी आपण जुनी बिले वेळेवर भरली पाहिजे. प्री-अप्रूव्ड लोन मध्ये कोणत्याही प्रकारची कागदपत्रे लागत नाहीत, म्हणूनच लवकरात लवकर त्यावर प्रक्रिया केली जाते आणि कर्ज काही तासांत उपलब्ध होते.

==================================
आम्ही आपल्यासाठी वरील माहिती आपली मातृभाषा मराठीतून लेख स्वरूपात सादर केली आहे, उपयुक्त वाटल्यास लाईक व शेअर करा आमच्या फेसबुक पेज ला सुध्दा जरूर लाईक करा आणि अशीच नवीन उपयोगी मिळवत राहा. ==================================
आम्हाला संपर्क करु शकता
मोबाईल व व्हाट्सअप 9867110110/9702110110
9769110110/9146110110

समर्पित

 #यूपीआय_विरुद्ध_पेटीएम बऱ्‍याच लोकांचा युपीआय, पेटीएम, गुगल पे, फोनपे अशा शब्दांमुळे पुरता गोंधळ उडून जातो. या सर्व गोष...
08/02/2021

#यूपीआय_विरुद्ध_पेटीएम

बऱ्‍याच लोकांचा युपीआय, पेटीएम, गुगल पे, फोनपे अशा शब्दांमुळे पुरता गोंधळ उडून जातो. या सर्व गोष्टी एकसारख्याच आहेत, असे त्यांना वाटणे स्वाभाविकसुद्धा आहे. म्हणूनच याचा नेमका खुलासा होणे आवश्यक आहे.
'युपीआय'विषयी आपण बोललो आहोतच. गुगल पे, फोनपे, भीम ही सगळी 'युपीआय' तंत्रज्ञान उपलब्ध करून देणारी अॅप्स झाली. म्हणजेच आपल्या फोनमध्ये यामधील कोणतेही अॅप असेल तर आपल्या फोनमध्ये 'युपीआय' आले. ते वापरून आपल्याला आपल्या बॅंकेतून इतर कोणाच्याही बॅंक खात्यात पैसे पाठवणे किंवा इतर कोणाच्याही बॅंक खात्यातून आपल्या खात्यात पैसे स्वीकारणे शक्य होते. ही सर्व अॅप्स हेच काम आपल्याला साध्य करून देतात.
त्यांचा वापर करताना आपल्याला त्यांच्यात काही फरक जाणवतील; पण म्हणून त्यांच्या कामाच्या स्वरूपात अजिबात फरक पडत नाही.
'युपीआय'हून 'पेटीएम' वेगळे आहे. 'युपीआय' हे थेट आपल्या बॅंक खात्याला जोडलेले असते; पण 'पेटीएम' मात्र स्वत:चे 'वॉलेट' तयार करते. त्या 'वॉलेट'चा आपल्या बॅंक खात्याशी काहीही संबंध नसतो. म्हणजेच 'युपीआय' ही आपल्या बॅंक खात्याला जोडलेली एक जोडणी असे आपण मानले, तर ही जोडणी 'पेटीएम'ला अजिबात नसते. उलट, आपण आपल्या बॅंक खात्यातून ऑनलाइन पैसे काढून ते आपल्या 'पेटीएम वॉलेट'मध्ये भरतो. या फरकामुळे काय घडते? समजा, आपण कोणाला ऑनलाइन पैसे पाठवू इच्छित असलो, तर 'युपीआय' वापरून हे पैसे आपण ते आपल्या बॅंक खात्यातून भरू शकतो; पण 'पेटीएम' वापरायचे तर त्यासाठी आधी आपल्या 'पेटीएम वॉलेट'मध्ये पैसे असले पाहिजेत. तसेच कोणी आपल्याला 'युपीआय' आयडीवर पैसे पाठवले तर ते थेट आपल्या बॅंक खात्यात येतील; पण जर ते आपल्या 'पेटीएम' आयडीवर पाठवले तर ते आपल्या 'पेटीएम वॉलेट'मध्ये येतील.
एकूण काय; तर 'युपीआय' वापरून थेट बॅंकांचे व्यवहार शक्य होत असत आणि 'पेटीएम' वापरून ते शक्य होत नसत. यामुळे 'पेटीएम'चा वापर कमी होत असल्याचे लक्षात घेऊन 'पेटीएम'ने आपले धोरण बदलले. आता 'पेटीएम'चा वापर करताना आधीप्रमाणेच 'पेटीएम वॉलेट' वापरायचे, की 'पेटीएम' वापरत असूनही आपले बॅंक खाते वापरायचे, हे आपण निवडू शकतो. थोडक्यात, म्हणजे 'पेटीएम'ने आता 'वॉलेट'बरोबरच 'युपीआय'चीसुद्धा सोय करून दिली आहे. त्यामुळे 'युपीआय' आणि 'पेटीएम' यांच्यामधील फरक आता अगदी धूसर झाला आहे.

समर्पित

 #क्रेडिट_कार्ड_चे_बिल_वेळेत_न_भरण्याचे_परिणाम !डिजिटल पेमेंटच्या काळात क्रेडिट कार्ड (Credit Card) चा वापर सामान्य झाला...
08/02/2021

#क्रेडिट_कार्ड_चे_बिल_वेळेत_न_भरण्याचे_परिणाम !

डिजिटल पेमेंटच्या काळात क्रेडिट कार्ड (Credit Card) चा वापर सामान्य झाला आहे. कॅश किंवा खात्यात पैसे नसले तरी क्रेडिट कार्डद्वारे पैसे दिले जाऊ शकतात. परंतु जर आपण क्रेडिट कार्डचा अति वापर केल्यास आणि त्याचे बिल वेळेवर न भरल्यास आपल्यासाठी ते हानिकारक असल्याचे सिद्ध होऊ शकते. आपण वेळेवर क्रेडिट कार्ड बिल (Credit Card Bill) न भरल्यास आपल्यास कोणते नुकसान सोसावे लागू शकेल ते जाणून घ्या.

आपला क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो
आपले क्रेडिट कार्ड बिल वेळेवर न भरल्यास आपली क्रेडिट स्कोअर खाली येईल. क्रेडिट स्कोअर पुन्हा तयार करण्यासाठी बराच वेळ लागेल.

क्रेडिट स्कोअरवर परिणाम होण्याशिवाय याचा कर्जावरही परिणाम होतो. त्यामुळे क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरणे गरजेचे आहे.

2. लेट फी भरावी लागेल
जर तुम्ही क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरले नाही तर तुम्हाला उशीरा भरण्याचा दंड अर्थात लेट फी देखील भरावी लागेल. हे पुढील बिलिंग तपशीलात लेट फी जोडली जाईल. प्रत्येक बँकेप्रमाणे हे शुल्क वेगवेगळे असते

3. कर्ज मिळण्यात समस्या
जर क्रेडिट कार्ड वेळेवर बिल भरले नसेल तर आपले क्रेडिट प्रोफाइल कमी होते. याचा फटका तुम्हाला सहन करावा लागेल कारण जर तुम्हाला बॅंकेकडून कर्ज घ्यायचे असेल तर तुमचा खराब क्रेडिट प्रोफाइल/स्कोअर पाहून बँक तुम्हाला कर्ज देण्यास नकार देऊ शकते.

4. व्याज द्यावे लागेल
जर क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरले नाही तर तुम्ही रिवॉर्ड पॉईंटचा फायदा घेण्यास सक्षम राहणार नाही. तुम्ही ठराविक मुदतीत पैसे न भरल्यास व्याज देखील वाढते. त्यामुळे क्रेडिट कार्ड युजर्सना बिल वेळेत भरले नाही तर केवळ लेट फीच द्यावी लागते असे नाही, तर तुमच्या व्याजात देखील वाढ होते.

समर्पित

केंद्रीय बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) शुक्रवारी झालेल्या द्वि-मासिक चलनविषयक बैठकीत दर कायम ठेवण्याचा निर्णय घे...
07/02/2021

केंद्रीय बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) शुक्रवारी झालेल्या द्वि-मासिक चलनविषयक बैठकीत दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. मध्यवर्ती बँकेच्या निर्णयानुसार रेपो दर पूर्वीप्रमाणे 4 टक्के राहील. याशिवाय रिव्हर्स रेपो दरही 3.35 टक्के राहील.

या दरांचा सर्वसामान्य माणसांवर चांगला परिणाम होतो कारण त्या आधारे कर्जाचे दर निश्चित केले जातात. गृह कर्जाबद्दल बोलायचे झाल्यास ही वेळ घर घेण्यास योग्य आहे कारण तुम्हाला 7 टक्केपेक्षा कमी दराने गृह कर्ज मिळत आहे. देशातील खासगी आणि सार्वजनिक बँक क्षेत्रातील कोटक बँक आणि एसबीआय कडून 6.75 टक्के पर्यंत सर्वात कमी दराने गृह कर्ज दिले जात आहे.

सरकारी बँक होम लोन :-
SBI :- देशातील सर्वात मोठी सरकारी बँक 6.75%ने होम लोन देत आहे.
UBI :- युनियन बँक ऑफ इंडिया 6.80% ते 7.35% दराने गृह कर्जे देत आहे.
BOI:- बँक ऑफ इंडिया 6.80% ते 7.60% दराने गृह कर्ज उपलब्ध करुन देत आहे.

खासगी बँक होम लोन :-
Kotak Bank : - 6.75 ते 8.45%
ICICI Bank : - 6.8 ते 8.05 %
HDFC Bank : - 6.8 ते 8.02%

समर्पित

 #अर्थसंकल्प_२०२१अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्प २०२१ मधील काही महत्वाच्या मुद...
03/02/2021

#अर्थसंकल्प_२०२१

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्प २०२१ मधील काही महत्वाच्या मुद्द्यांचे सखोल परीक्षण -

भारत नावाच्या १३६ कोटींच्या महाकाय देशाच्या अर्थसंकल्पाकडे आपण कसे पाहतो? कोरोना संकटामुळे सर्व काही संपले अशी भावना निर्माण झाली असताना या अर्थसंकल्पाने अनेकांच्या आशा पल्लवित का झाल्या आहेत? या आणि अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न.

कोरोना साथीमुळे अर्थव्यवहार थंडावले असताना अर्थसंकल्पाने अनेकांच्या आशा पल्लवित का झाल्या आहेत?

अ र्थव्यवस्था कोणत्या दिशेने निघाली आहे, याचा एक निकष मानला जाणारा शेअर बाजार का उधळला आहे?

अनेक वर्षांत झाला नाही, असा यावेळचा अर्थसंकल्प असेल, असे अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी म्हटले होते, तसे खरोखरच या अर्थसंकल्पात काही आहे का?

काही अर्थतज्ज्ञ या अर्थसंकल्पाची तुलना १९९१ च्या आर्थिक सुधारणांशी का करत आहेत?

भारताच्या जीडीपीची वाढ वर्षभरात कमी झाली असताना पुढील दोन वर्षे त्यात चांगली वाढ होईल, असे सरकारच नव्हे तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि इतर जागतिक अर्थसंस्था का म्हणत आहेत?

सरकारी तिजोरी सावरण्यासाठी नागरिकांवर करांचा नवा बोजा लादला जाईल, अशी भीती व्यक्त केली जात असताना प्रत्यक्ष करांत कोणताही वाढ न करणे अर्थमंत्र्यांना कसे शक्य झाले आहे?

एकीकडे अर्थसंकल्प भारताच्या व्यापक विकासाला वेग देईल, असे म्हटले जाते तर दुसरीकडे हा अर्थसंकल्प मोजक्या समूहांचे हित साधणारा आहे, अशी टोकाची मते का व्यक्त केली जात आहेत? अशा सर्व पार्श्वभूमीवर सर्वसामान्य भारतीय नागरिकाने या अर्थसंकल्पाचा काय बोध घ्यायचा?

अर्थसंकल्प २०२१: आपल्याला चष्मा बदलावा लागेल

आज आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी केवळ राजकीयच नाहीतर सर्व पातळ्यांवर दोन टोकाची मते व्यक्त केली जात असताना वरील कळीच्या प्रश्नांची उत्तरे देणे अवघड आहे.

आकडेवारीचा विषय अर्थतज्ज्ञांमध्येही एवढा वादाचा होऊ शकतो, यातच निरपेक्षतेची किती वानवा आहे, हे सिद्ध होते.

अर्थसंकल्पात आकडेवारीचा साहजिकच भडीमार असतो, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्याचा डोक्याला त्रास करून घेत नाही.

चांगला पगार घेणाऱ्या नोकरदारांच्या दृष्टीने कर किती वाढला आणि करसवलती किती मिळाल्या, याची गणिते, एवढाच तर अर्थसंकल्प असतो. पण माध्यमांमध्ये नोकरदारांचे स्थान वरचे असल्याने अनेक माध्यमे त्यावरून अर्थसंकल्पाचे मूल्यमापन करण्याची घोडचूक करत आले आहेत. यावेळी ती संधी नव्हती.

कोणत्या वस्तू महाग झाल्या आणि कोणत्या स्वस्त झाल्या, याची चर्चा काही नागरिक करतात, पण अशी चर्चा फारतर दोन दिवस टिकते.

याचा अर्थ, १३६ कोटी नागरिकांच्या या महाकाय देशाचे आर्थिक व्यवहार ज्यावर अवलंबून आहेत, अशा अर्थसंकल्पाकडे पाहताना आपल्याला चष्मा बदलला पाहिजे, एवढे नक्की. तसा तो बदलून, आपण आपल्या वैयक्तिक बेरीजवजाबाकीतून काहीकाळ बाहेर पडून या अर्थसंकल्पाकडे पहायचे तर वरील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. तसा प्रयत्न आपण करून पाहू यात.

अर्थसंकल्प २०२१: आशा का पल्लवीत झाल्या?

अर्थसंकल्पामुळे आशा का पल्लवीत झाल्या, हा पहिला प्रश्न आहे. कोरोनाने जी प्रचंड आर्थिक हानी केली, त्या पार्श्वभूमीवर गाडी रुळावर येऊ शकते, असा जो आत्मविश्वास अर्थसंकल्पाने दिला, हे त्याचे कारण आहे.

अशा अभूतपूर्व स्थितीत सरकार किती कर्ज काढते, हे महत्वाचे ठरले नाही.

लागेल तेवढे कर्ज काढून अर्थव्यवहारांना गती देण्याची सरकारची इच्छा त्यात दिसल्याने आणि सरकार खर्च करण्यास मागेपुढे पहाणार नाही, हे स्पष्ट झाल्याने तो आत्मविश्वास मिळाला.

एरवी जागतिक आर्थिक संस्था भारताच्या कर्जाकडे बोट दाखविण्यास टपून बसलेल्या असतात, त्याकडे दुर्लक्ष करून हा निर्णय घेतला गेला, याला महत्व आहे.

प्रचंड संसाधने, मागणी - पुरवठ्याचे गणित जुळण्यासाठी लोकसंख्येचा लाभांश आणि अर्थव्यवहार स्वच्छ तसेच संघटीत होत असताना अर्थसंकल्पाचा आकार वाढविण्यास सरकार यावेळी कचरले नाही.

एवढ्या मोठ्या संकटातही करसंकलनाला मोठा धक्का बसला नसल्याने, सरकारला धाडस करण्यास बळ मिळाले. थोडक्यात, कर्तेकरविते सरकार भविष्याविषयी आश्वस्त आहे, हे लक्षात आल्याने आशा पल्लवीत झाल्या आहेत.

अर्थसंकल्प २०२१: शेअर बाजार का उधळला?

दुसरा प्रश्न आहे, तो शेअर बाजार का उधळला? कोरोनामुळे झालेली आर्थिक हानी भरून काढण्यासाठी गुंतवणूकदारांवर नवे कर लावले जाणार, हे गृहीतच धरले गेले होते. पण तसे काहीच झाले नाही.

उलट सेबीसारख्या आर्थिक संस्थांचे, परकीय गुंतवणुकीचे नियम सुलभ केल्याने बाजारात आणखी पैसा येणार, याची खात्री झाली.

उद्योग व्यवसायांवरही नवे कर न लावल्याने त्यांचे ताळेबंद चांगले असतील, अशी अटकळ बाजाराने लावली.

पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा या क्षेत्रावरील भांडवली खर्च इतर क्षेत्राच्या खर्चात कपात न करता वाढविण्यात आला, याचा अर्थ विकासकामे वेग घेणार, हा संदेश बाजाराने घेतला.

अनेक वर्षातील वेगळा अर्थसंकल्प असा हा अर्थसंकल्प ठरला का, या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे, अर्थसंकल्पात तेवढे क्रांतिकारक काही नाही. त्यामुळे १९९१ च्या बदलाशी त्याची तुलना ही अतिशोयोक्तीच ठरते.

दिशादर्शन म्हणून त्याच्याकडे पाहिले, तर आर्थिक सुधारणांचा वेग आणखी वाढणार, जेथे आवश्यक असेल तेथे खासगीकरण होणारच आणि 'आत्मनिर्भर'ला आणखी बळ, हा जो ठामपणा दिसला, तेच अर्थसंकल्पाचे वेगळेपण म्हणता येईल.

अर्थात, ज्या संघटीत समूहांचा आवाज मोठा आहे, त्यांना सांभाळण्याचे काम याही अर्थसंकल्पाने केले आहे.

एमएसपीमध्ये वाढीसारख्या शेतीसाठीच्या तरतुदी, शेती सेस, आणखी एक कोटी सिलेंडरला सबसिडी, वन नेशन - वन रेशन कार्ड अशा मार्गाने खालच्या आर्थिक समूहाला काही देण्याच्या संकल्पामुळे काही प्रमाणात संतुलन साधले आहे.

देश आर्थिकदृष्ट्या स्थिर

भारताच्या जीडीपीची वाढ नजीकच्या भविष्यात चांगली राहील, असे अंदाज सरकार आणि सर्व आर्थिक संस्था का करत आहेत, असा चौथा प्रश्न आहे.

गेली सहा वर्षे ज्या आर्थिक सुधारणा सुरु आहेत, त्याचे परिणाम दिसायला आता सुरवात झाली आहे, हे त्याचे उत्तर आहे.

उदा. बँकिंगला आणि डिजिटल आर्थिक व्यवहारांना नोटबंदीसारख्या सुधारणांनी मिळालेली गती, जीएसटी पद्धतीमुळे अप्रत्यक्ष कर देणाऱ्यांची वाढलेली विक्रमी संख्या, अशा सुधारणांमुळे करसंकलन वाढत चालले असून त्यामुळेच सरकार सर्व क्षेत्रांत भांडवली खर्च वाढवीत आहे.

उत्पादनात चीनने आघाडी घेतलेली असली तरी चीनविषयीच्या जगभरातील नाराजीचा फायदा घेण्याची क्षमता राजकीय स्थर्यामुळे भारतात आहे, याविषयी परकीय गुंतवणूकदारांना खात्री वाटू लागल्याने ते भारतात पुढेही गुंतवणूक चालू ठेवणार आहेत.

कोरोनाच्या संकटातून भारत सर्वात आधी बाहेर पडतो आहे, याचाही फायदा आपल्याला मिळतो आहे. शेतीत होत असलेले विक्रमी उत्पादन, ग्रामीण भागात आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येत मध्यमवर्गीयांची वाढत चाललेली क्रयशक्ती, याचा परिमाण म्हणजे मागणी कायम राहण्याची खात्री.

तेलाचे दर कमी झाल्याने आणि देशातील सोने खरेदी घटल्याने परकीय चलनाची बचत झाली, शिवाय निर्यातीचा आणि रीमिटन्सचा वाटा अबाधित असल्याने सध्या परकीय चलनाचा विक्रमी साठा भारताकडे आहे.

देश आर्थिकदृष्ट्या स्थिर असण्याचे असे जे काही निकष आहेत, त्यात देश कोठेही कमी नसल्याने जीडीपीचा असा अंदाज केला जातो आहे.

अर्थसंकल्प २०२१: सर्वाचे समाधान कसे शक्य आहे?

विपरीत आर्थिक स्थितीत नवे कर न लावता अर्थसंकल्प कसा शक्य झाला, हा पाचवा प्रश्न आहे.

वर म्हटल्याप्रमाणे आर्थिक सुधारणांमुळे करदात्यांची संख्या सातत्याने वाढते आहे. शिवाय याकाळात नागरिकांवर नवा बोजा टाकण्याऐवजी सरकारी कंपन्यांच्या अंशत: खासगीकरणाचा मार्ग निवडला आहे.

विवाद से विश्वाससारख्या योजनांत एक लाख कोटींच्या घरात करमहसूल मोकळा झाला, असे काही प्रयत्न होत असल्याने हे शक्य झाले, हे त्याचे उत्तर आहे. अर्थसंकल्पावर टोकाची मतमत्तांतरे का व्यक्त होत आहेत, हा सहावा प्रश्न आहे.

त्याचे पहिले कारण आहे, प्रत्येक गोष्टीकडे राजकारण म्हणून पाहिले तर देशाच्या कोणत्याच प्रश्नाविषयी एकमत होऊ शकणार नाही.

अर्थसंकल्पातील तरतुदीबाबतही तेच होते आहे. उदा. सरकारी कंपन्यांच्या अंशतः खासगीकरणाची अपरिहार्यता सर्व पक्ष मान्य करतात आणि सत्तेवर आल्यावर सर्वच पक्ष ते करत आलेले आहेत, पण अर्थसंकल्पात अशी तरतूद असली की त्याला 'देश विकायला काढला', असे नाव दिले जाते. ही टीका कितीही लोकप्रिय वाटत असली तरी त्याला पर्याय नाही, हे सर्वजण जाणून आहेत.

टोकाच्या मतांचे दुसरे कारण म्हणजे आपल्या हिताचे संरक्षण केले, असे सर्व समूहांना कधीच वाटू शकत नाही.

आर्थिक विषमतेमध्ये तर सर्वाचे समाधान होणे, ही अशक्यकोटीतील बाब आहे. त्यामुळे देश म्हणून आपण पुढे जात आहोत ना आणि त्यात खालच्या आर्थिक थराची काळजी घेतली जाते आहे ना, एवढेच आपण पाहू शकतो.

अर्थात, लोकशाही शासन पद्धती त्याचे सर्वात चांगले संतुलन सातत्याने करत असतेच.

नागरिकांनी काय बोध घ्यावा?
सर्वसामान्य नागरिकांनी अर्थसंकल्पातून काय बोध घ्यावा, हा आपला सातवा प्रश्न आहे. त्याचे उत्तर आपण काही मुद्दे समोर ठेवून घेऊ.

भारतीय अर्थव्यवस्था वेगाने संघटीत होते आहे, त्यामुळे संघटीत क्षेत्र घेत असलेल्या लाभांत आपण भागीदार झाले पाहिजे. (उदा. बँकिंग, शेअर बाजार, जीवन विमा, वैद्यकीय विमा, पिक विमा या मार्गाने)

परकीय गुंतवणूकदारांचा जर भारताच्या आर्थिक विकासावर विश्वास असेल तर आपल्यालाही तो ठेवला पाहिजे.

डिजिटल व्यवहार आणि इंटरनेटच्या मार्गाने होत असलेल्या बदलांकडे दुर्लक्ष करता कामा नये.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी सरकारने अतिरिक्त कर्ज काढण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आर्थिक शिस्त मोडली असली तरी ती तूर्तास देशाच्या विकासासाठी ते आवश्यक असून मुळात देशाचा आर्थिक पाया पक्का असल्याने अशा कर्जाची चिंता करण्याचे कारण नाही.

कोणतेही सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचेच काम करत असते, त्यामुळे आर्थिक निर्णय घेताना टोकाच्या राजकारणापेक्षा देशाचे अर्थकारण कोठे चालले आहे, याकडे लक्ष दिले पाहिजे.

समर्पित

Apply MSME LOANS and Secured BUSINESS Loans @ 7.8 % and above for Traders and Manufacturers !Hasslefree Processing !!Spe...
30/01/2021

Apply MSME LOANS and Secured BUSINESS Loans @ 7.8 % and above for Traders and Manufacturers !
Hasslefree Processing !!
Speedy Approvals !!!
Personalized Services !!!!
T&C*

Address

Mafco Road
Vashi
400705

Telephone

+919146110110

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shobha Realty & Financial Services P Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share